श्री.संतोष हेरोडे साहेब यांची परिवहन सेवेच्या भरारी पथक प्रमुख पदी निवड 

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवा भरारी पथक प्रमुख पदी श्री.संतोष हेरोडे यांची पदी निवड झाली.कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन केडीएमटीच्या सेवेत श्री.संतोष हेरोडे  १९९९ साली वाहक या पदावर रुजू झाले होते. वाहक ते प्रभारी वाहतूक नियंत्रक, प्रभारी मार्ग तपासणीस आणि आज “भरारी पथक प्रमुख” हा प्रवास सोपा नव्हता.प्रत्येक पावले कठीण होती म्हणूनच आजच्या वळणांना किंमत आली आहे. परिवहन व्यवस्थापक व आगार व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाने संतोष हेरोडे यांनी प्रत्येक अडथळा पार केला. २०२६ च्या कारकिर्दीत परिवहन व्यवस्थापक व आगार व्यवस्थापक यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे संतोष हेरोडे यांचा २७ वर्षांच्या सेवा काळातील सर्वात मोठा सन्मानाचा,गौरवाचा व “अविस्मरणीय सुवर्ण क्षण” आहे.ही जबाबदारी मला सदैव प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम करील.असे संतोष हेरोडे म्हणाले.

केडीएमटीने १९९९ साली शून्यातून विश्व निर्माण केले,त्या ऐतिहासिक प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. आज आपण दिलेली ही जबाबदारी केडीएमटीला पुन्हा एकदा “भरारी” घ्यायला लावण्यासाठी मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रामाणिकपणे काम करीन.या निवडीबद्दल सन्माननीय परिवहन व्यवस्थापक डॉ.विजयकुमार व्दासे सर यांनी आपल्या अथक परिश्रमाची,निष्ठेची आणि कर्तव्यदक्षतेची दखल घेतली, मा.आगार व्यवस्थापक श्री.दीपक चौधरी साहेब यांनी ही माझ्या कामाची दखल घेतली ही खरी पावती आहे.श्री.संतोष हेरोडे यांची परिवहन सेवेच्या भरारी पथक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल केडीएमटी चे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

   श्री.संतोष हेरोडे आपत्कालीन परिस्थिती असो वा कोरोना महामारीचा कठीण काळात सदैव परिवहन सेवेसाठी तत्पर राहिलात.आजपर्यंत आपण केलेल्या अनेक उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत,आपणास ‘उत्कृष्ट कर्मचारी’ म्हणून गौरवण्यात आले होते.आपली कामाप्रती असलेली तळमळ,शिस्त आणि नेतृत्वगुण बघूनच आज भरारी पथक प्रमुख ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे.विश्वास आहे की,आपल्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नव्या उंचीवर पोहोचेल.आणि प्रवासी सेवा उत्कृष्ट दर्जाची होईल.व शिस्त,सुरक्षितता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आपले योगदान मोलाचे ठरेल.नूतन जबाबदारीसाठी मा.डॉ.विजयकुमार व्दासे साहेब,परिवहन व्यवस्थापक तथा अतिरिक्त आयुक्त,क.डों.म.पा.परिवहन उपक्रम,कल्याणयांनी निवड पत्र देतांना मनापासून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सह…! आपल्या हातून परिवहन सेवेचा नावलौकिक अधिक उंचावो,आणि आर्थिक उत्पन्नात अधिकाधिक भर पडो हीच सदिच्छा व्यक्त केली.

समाधान मोरे कल्याण यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *