
भारतीय बौध्द महासभा कार्याध्यक्ष आद.भीमराव यशवंत आंबेडकर यांनी दिनांक २३ सप्टेंबर,२०२० रोजी पत्रकाद्वारे बौध्द समाजाला खालीलप्रमाणे आवाहन केलेले होते.
पहिल्या धर्माच्या काॅलममध्ये “बौध्द” लिहावे, दुसर्या काॅलममध्ये “अनुसूचित जात” आणि तिसर्या काॅलममध्ये अनुसूचित जातीतील जात म्हणजेच पूर्वाश्रमीची- धर्मांतरापूर्वीची जात लिहावी. (उदा.महार, मांग,चांभार, ढोर वगैरे) त्याचबरोबर भारतीय बौध्द महासभेच्या धम्मयान दिनदर्शिका २०२१,२०२२, २०२३, २०२४ ,२०२५ व २०२६ मध्येसुध्दा जनगणनेत बौध्द समाजाने धर्म बौध्द व जात हिंदू महार लिहावे. अशी तळटीप टाकलेली आहे.
MINISTRY OF HOME AFFAIRS (Office of Registrar General India) NOTIFICATION New Delhi, the 22nd January, 2026 रोजी प्रसिध्द केलेल्या गॅझेटनुसार सदरहू आवाहन आणि तळटीप कालबाह्य/गैरलागू झालेली आहे. बौध्दजनांना ह्या गॅझेटनुसार ते फक्त अनुसूचित जातीचे आहेत की, नाहीत एवढीच माहिती द्यायची आहे.
(12)Whether the head belongs to Scheduled Caste/Scheduled Tribe/Other.) The Ministry of Home affairs(MHA) has notified the official 33-questions for the Phase I Houselisting and Housing Census 2027. View the full list including questions on internet access, cereal consumption and more.(News dated 23/01/2026) Census 2027 Phase I: Full List of The 33-Question The Ministry of Home Affairs (MHA) has officially released the questionnaire for the first phase of the Census of India 2027, which allows census officers to collect data according to a scheduled digital timetable. The Questionnaire highlights India’s new digital world, changing food trends, and rising standard of living.
According to a gazette notification issued by the Registrar General and Census Commissioner of India (RG&CCI), the first phase will comprise houselisting and a housing census. It would include a comprehensive 33-question survey aiming at mapping the living conditions, amenities, and assets of Indian families.
What Are the 33 Questions for First Phase of Census 2027?
The questionnaire comprises housing infrastructure, domestic amenities, and assets. Notably, the government has included questions on internet access and cereal consumption while deleting the previous question on financial services.Here is the full list of 33-Questions
घरांच्या यादीत ३३ प्रश्न विचारले जातील. जनगणना ३३ प्रश्न: पहिल्या टप्प्यात,घरे आणि घरगुती सुविधांशी संबंधित एकूण ३३ प्रश्न विचारले जातील.यामध्ये घराची मालकी,वापर,भिंत,छप्पर आणि फरशीचे साहित्य आणि खोल्यांची संख्या यांसारखे प्रश्न असतील.तुम्हाला याची यादी येथे मिळेल:
जनगणनेत विचारले जाणारे ३३ प्रश्न
1) Building number (Municipal or local authority or census number). १) इमारत क्रमांक (नगरपालिका/स्थानिक संस्था/जनगणना क्रमांक)
2) Census house number. २) जनगणना घर क्रमांक
3) Predominant material of floor of the census house. ३) घराच्या मजल्याचे मुख्य बांधकाम साहित्य
4) Predominant material on the wall of the census house. ४) घराच्या भिंतीचे मुख्य बांधकाम साहित्य
5) Predominant material of roof of the census house. ५) घराच्या छताचे मुख्य बांधकाम साहित्य
6) Ascertain use of census houses. ६) घराचा वापर (निवासी/व्यवसाय इ.)
7) Condition of the census house. ७) घराची स्थिती
8) Household number. ८) घराची संख्या
9) Total number of persons normally residing in the household.९) घरात सहसा राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या
10) Name of the head of the household. १०) घराच्या प्रमुखाचे नाव
11) Sex of the head of the household. ११) घराच्या प्रमुखाचे लिंग
12) Whether the head belongs to Scheduled Caste/Scheduled Tribe/Other. १२) घराचा प्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर श्रेणीचा आहे काय ?.
13) Ownership status of the census house. १३) मालकीची स्थिती (मालकीचा/भाड्याने घेतलेला, इ.)
14) Number of dwelling rooms exclusively in possession of the household. १४) घरातील खोल्यांची संख्या संख्या
15) Number of married couple(s) living in the household. १५) घरात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या
16) Main source of drinking water. १६) पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत
17) Availability of drinking water source. १७) पिण्याच्या पाण्याची उपलब्धता
18) Main source of lighting. १८) मुख्य स्रोत प्रकाश
19) Access to latrine. १९) शौचालयाची उपलब्धता
20) Type of latrine. २०) शौचालयाचा प्रकार
21) Waste water outlet. २१) सांडपाणी निचरा व्यवस्था
22) Availability of bathing facilities. २२) आंघोळीच्या सुविधांची उपलब्धता
23) Availability of kitchen and LPG/PNG connection. २३) स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शनची उपलब्धता
24) Main fuel used for cooking. २४) स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन
25) Radio/Transistor. २५) रेडिओ/ट्रान्झिस्टरची उपलब्धता
26) Television. २६) टेलिव्हिजनची उपलब्धता
27) Access to the internet. २७) इंटरनेटची उपलब्धता
28) Laptop/Computer. २८) लॅपटॉप/कॉम्प्युटरची उपलब्धता
29) Telephone/Mobile Phone/Smartphone. २९) टेलिफोन/मोबाइल/स्मार्टफोनची उपलब्धता
30) Bicycle/Scooter/Motorcycle/Moped. ३०) सायकल/स्कूटर/मोटरसायकल/मोपेडची उपलब्धता
31) Car/Jeep/Van. ३१) कार/जीप/व्हॅनची उपलब्धता
32) Main Cereal consumed in the household.३२) घरात वापरल्या जाणाऱ्या मुख्य अन्नधान्याची उपलब्धता
33) Mobile Number (for census related communications only). ३३) मोबाईल नंबर (केवळ जनगणनेशी संबंधित संपर्कासाठी)जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात धर्म व अनुसूचित जात हा रकाना नाही. त्यामुळे धर्म व अनुसूचित जात रकान्यात जात लिहिण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही.
जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी धर्म व अनुसूचित जात रकान्यात काहीतरी सुधारणा होईल. उदाहरणार्थ धर्म: बौध्द व अनुसूचित जात: क्र ३७ अशी आशा करू या!
Compiled and Edited by
Sharad Adhav,9833175669,Mumbai

