– डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

एका मोठ्या सभेत बाबासाहेब उभे होते. लाखो लोक त्यांच्या पाठीशी उभे होते. हातात संविधान, डोळ्यात स्वप्नं आणि ओठावर धगधगणारे शब्द.
बाबासाहेब म्हणाले –
“मी आयुष्यभर झुकलो नाही, कारण जर मी झुकलो असतो तर आज तुम्हा लाखो लोकांना सरळ उभं राहण्याचा अधिकार मिळाला नसता.जर मी झुकलो असतो,तर तुमचं पाणी प्यायचं स्वातंत्र्य,शाळेत बसायचा हक्क,नोकरीचा दरवाजा – हे सगळं कायमच बंद राहिलं असतं.जर मी झुकलो असतो,तर तुमचं आयुष्य गुलामीत आणि अंधारातच गेलं असतं.”
ही वाक्यं ऐकून गर्दीतील डोळे पाणावले.
लोकांना जाणवलं – बाबासाहेबांनी स्वतःच्या सुखासाठी, कीर्तीकरता किंवा पदासाठी कधीही तडजोड केली नाही. ते झुकले नाहीत, म्हणूनच आज आपण उभे आहोत डोकं उंच करून.
बाबासाहेब झुकले नाहीत म्हणून आज आपण माणूस म्हणून जगतो.
त्यांनी हार मानली नाही म्हणून आज आपल्या हातात हक्क आहेत.
त्यांनी गुलामी नाकारली म्हणूनच आपण स्वाभिमानानं श्वास घेतो.
त्यांच्या न झुकण्यामध्येच आपला स्वातंत्र्याचा विजय दडलेला आहे.

संकलन सागर तायडे
