
जुईनगर नवी मुंबई, विशेष प्रतिनिधी – खरे राष्ट्रपिता आणि लोहपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.कारण १५ ऑगस्ट १९४७ झाली देश स्वातंत्र्य झाला.तेव्हा देशाची घटना नव्हती.ब्रिटिश घटने नुसार देशात कारभार सुरु होता.भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळी प्रचंड हिंसाचार जातीय दंगली वाढल्या होत्या त्या शांत करणे ब्रिटिशाच्या भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन ला शक्य होत नव्हते. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन ला महात्मा गांधीला मार्ग काढण्याची विनंती केली तेव्हा महात्मा गांधी उपोषणाला बसले.त्यानंतर देशात शांतता निर्माण झाली.त्यामुळेच महात्मा गांधी पेक्षा खरे राष्ट्रपिता बाबासाहेब आंबेडकर ठरतात.असे दिलीप पवार अध्यक्ष ऑल इंडिया जनरल इन्शुरन्स एससी एसटी वेलफेअर असोशीयशन यांनी सांगितले.
दिनांक 11 मे २०२६ सोमवार रोजी बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळ मुंबई च्या वतीने तथागत गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंती व विचाराचा महाउत्सवाचा कार्यक्रम दि पीपल्स इम्प्रूवमेंट ट्रस्ट संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता भवन जुईनगर नवी मुंबई येथे संपन्न झाला.शाहिर शितल भंडारे व संच यांचा “प्रबोधन कला मंच शाहिरी जलसा” गायकांनी वामनदादाच्या गाण्यातून प्रभावी प्रबोधन केले. मंडळाच्या वतीने शासन प्रशासनात राहून ज्यांनी समाजाचे प्रतिनिधित्व केले सामाजिक बांधिलकी जपली त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून अशा १४ मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दयानंद इंगळे अध्यक्ष बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवासी समाज मंडळ मुंबई हे होते तर प्रमुख पाहुणे मान.दिलीप पवार (अध्यक्ष ऑल इंडिया जनरल इन्शुरन्स एससी एसटी वेलफेअर असोशीयशन) प्रमुख व्याख्याते- डॉ.निखिल रेखा संजय अडसुळे पीएच.डी,आय आय टी,दिल्ली यांनी महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांची प्रभावीपणे मांडणी केली व्याख्यान खूपच प्रभावी होते अनेक इतिहासाचे दाखले देत मांडणी करत होते. संपूर्ण हॉल मंत्रमुग्ध आणि भारावून गेला होता,

भारताचे ‘पोलादी पुरुष’ किंवा ‘लोहपुरुष’ (Iron Man of India) म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते.पण खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर हे पोलादी पुरुष होते.कारण देशाचे एकत्रीकरण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील ५६० पेक्षा जास्त लहान-मोठ्या संस्थानांचे (Princely States) भारतात विलीनीकरण करून एकात्म भारत घडवण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची होती.त्याला निजाम मीर उस्मान अली खान यांच्या हैदराबाद संस्थान स्वतंत्र राष्ट्र म्हणून विरोध केला.होता तेव्हा काय करावे यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सल्ला घेण्याचे सांगितले होते.कारण १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तरी निजाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाच्या ‘इत्तेहादुल मुसलमीन’ संघटनेचा प्रमुख कासिम रझवी याने ‘रझाकार’ नावाची निमलष्करी संघटना तयार करून प्रजेवर प्रचंड अत्याचार केले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की लष्करी कारवाई केल्यास हैदराबाद संस्थान हातात येणार नाही म्हणून पोलिस कारवाई केली पाहिजे.
भारतीय सैन्याने हैदराबाद संस्थानावर १३ ते १७ सप्टेंबर १९४८ दरम्यान पोलीस बळाचा वापर केला. या कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ (Operation Polo) किंवा ‘पोलीस ॲक्शन’ असे म्हटले जाते.या कारवाईनंतर हैदराबाद संस्थान भारतात अधिकृतपणे विलीन झाले.असे दिलीप पवार साहेबांनी आपल्या अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषणात सांगितले. संघटन चालवताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय महापुरुषांचे दाखले देत मोलाचे मार्गदर्शन केले,या ऐतिहासिक कार्यक्रमाला खालील मान्यवरांनी हजेरी लावली.एच बी तायडे सेवा निवृत जॉईंट सेक्रेटरी गृहमंत्रालय,उत्तमराव बोदवडे सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त मुंबई,गणेश झिने ओ एस डी,नगर विकास मंत्रालय,व्ही जी जाधव सेवानिवृत्त व्हाईस प्रेसिडेंट कॉटन फेडरेशन भारत सरकार,वनश्री खंडारे अवर सचिव एम.पी.एस.सी महाराष्ट्र शासन,मोनिका साळवे मॅडम कमांडंट सीआरपीएफ,एकनाथ शिंदे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मुंबई,संजय जाधव व्हाईस प्रेसिडेंट मल्टिनॅशनल कंपनी दिल्ली,उद्योजक ब्रह्मानंद खाडे,उद्योजक देवानंद रंगारी अशा अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वामन मोरे सरांनी प्रभावीपणे केले.मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य रामभाऊ वानखडे सरांनी सर्व मान्यवरांचे पाहुण्याचे व मंडळाच्या दानशूर दानदात्या सभासदांचे हार्दिक आभार मानले.
सागर तायडे यांस कडून

