कु.हर्षदा यादव हिचे 95 टक्के गुण घेऊन दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश!

बातमी शेअर करा.

स्थानिक राधाबाई खेडेकर विद्यालय चिखली जिल्हा बुलडाणा येथील विद्यार्थीनी कु,हर्षदा सुनिल यादवने अभ्यासात अथक परिश्रम घेऊन नुकत्याच पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.कु,हर्षदा यादव ही एका शेतकरी कुटुंबातील हुशार मुलगी असून शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून त्या दिशेने वाटचाल करीत आहे.सुरवाती पासूनच अभ्यासात हुशार असणारी कु.हर्षदा यावर्षीच्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.सतत अभ्यास करून शालांत परीक्षेत चांगले गुण मिळवायचे तिचे स्वप्न आज या निमित्ताने पूर्ण झाल्याचा आनंद यादव कुटुंबाला झालेला आहे.कु.हर्षदा यादव हिच्या यशासाठी शिक्षक वृंद याचे अनमोल मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले तसेच यादव परिवाराचे सुध्दा प्रोत्साहन आहे.
या निमित्ताने कु.हर्षदा यादव हिचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे कु.हर्षदा यादवला शिक्षण क्षेत्रात उंच भरारी गाठायची असं तिचे स्वप्न आहे.हर्षदाला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
संकलन:-प्रमोद सूर्यवंशी,८६०५५६९५२१.चिखली,मातृतीर्थ बुलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *