
विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्मसंस्था मांडवी कोळीवाडा (स्थापना १८३०) या संस्थेच्या सभागृहात ११ मे १८८८ रोजी मुंबईतील कष्टकरी कामगाराच्या वतीने ज्योतीराव फुले यांना “महात्मा” ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याला ११ मे २०२६ रोजी १३८ वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने मुंबई ठाणे जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे वैचारिक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी ११ मे महात्मा ज्योतीराव फुले उत्सव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.या ऐतिहासिक घटनेचा उत्सव क्रांतिकारी विचारांचे समाजसुधारक ज्योतीराव गोविंदराव फुले यांना ११ मे १८८८ रोजी मुंबईतील मांडवी कोळीवाड्यात (मसजीद बंदर) आयोजित सभेत जनतेने ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली होती.रावबहादूर वंडेकर यांनी या सभेचे आयोजन केले होते.स्त्रीशिक्षण, जातिव्यवस्थेचा विरोध आणि शोषितांसाठी केलेल्या कार्यमुळे त्यांना हा सन्मान मिळाला होता.त्या निमित्ताने ११ मे २०२६ रोजी,१३८ व्या उत्सव दिनी त्याचं ठिकाणी महात्मा फुलेची प्रतिमा,पगडी व त्यांच्या जीवन संघर्षावर लिहलेले पुस्तकांची मांडणी करून अभिवादन करण्यात आले.

ज्योतीराव गोविंदराव फुले यांच्या प्रतिमेला कामगार नेते श्री.सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना.व श्री.सुरेश ढोबळे ट्रस्टी सरचिटणीस मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्मसंस्था मांडवी कोळीवाडा यांनी पुष्पहार अर्पण करून पगडीला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.त्यावेळी श्री सुदाम गाडेकर लेखक (महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित) श्री.श्रीकांत माळी निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते,श्री.सदानंद मंडलिक अध्यक्ष अखिल भारतीय म फुले समता परिषद मुंबई, श्री.सुधीरशेट कांडपिळे अध्यक्ष फुल माळी समाज पनवेल,श्री.गोपीनाथ लोखंडे (रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे वंशज पणतू ),श्री.बाळासाहेब लोखंडे अध्यक्ष रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान,श्री.राहुल काळे खजिनदार मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्मसंस्था मांडवी कोळीवाडा,श्री.जगन्नाथ कुदळे (जे के) निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते,श्री.यशवंत ओव्हळ मा.अधिक्षक आय ए एस ट्रेनिंग सेंटर,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते,श्री.विश्वास ताम्हाणे निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते ,श्री.नवनीत सिनलकर सल्लागार,सुरेश कांबळे माझगाव सामाजिक संघटना,वामन गारडे संत शिरोमणी सावता माळी मंडळ कोपरखैरने नवी मुंबई, विनोद कदम,किसन काळे,हेमंत वायाळ,प्रशांत वारुळे ज्ञानेश्वर सोलाट,उपस्थित होते.निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीने सुदाम गाडेकर यांनी व ट्रस्टीच्या वतीने सुरेश ढोबळे यांनी शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार केला..सूत्र संचालन सुदाम गाडेकर यांनी केले तर शैलेन्द्र माळी यांनी आभार मानले.

मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्मसंस्था मांडवी कोळीवाड्याचे ट्रस्टी यांनी ती ऐतिहासिक जागा उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. म्हणूनच ११ मे २०२६ रोजी महात्मा ज्योतीराव फुले पदवी उत्सव दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.शासनाच्या वतीने या ऐतिहासिक घटनेची नोंद घेऊन मोठा उत्सव साजरा झाला पाहिजे होता. आणि ज्योतीराव फुलेना “महात्मा” पदवी दिली ते ठिकाण शासनाने हेरीटेज स्मारक केले पाहिजे अशी सुदाम गाडेकर यांनी मागणी केली. त्याला सर्व मान्यवरांनी पाठिंबा दिला.आणि त्यासाठी महात्मा फुलेंचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी,संस्था,संघटनांनी शासन दरबारी पत्र व्यवहार करा असे आवाहन केले.
सागर तायडे मुंबई यांस कडून
