पहलगाम आतंकी हमला मानवतेला काळीमा फासणारी घटना- 

बातमी शेअर करा.

दहशतवादी हल्ल्याचा रिपाई आठवले कडून तिव्र निषेध- बाबासाहेब जाधव 

बुलडाणा,(प्रतिनिधी)- काश्मिर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाकडून व रिपाई आठवले गटाचे जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव कडून तीव्र निषेध. 

कश्मिर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ला अतिशय भ्याड व मानवतेला काळीमा फासनारा असून हल्लेखोरांवर तात्काळ केंद्र सरकार ने कठोरात कठोर कारवाई करावी कश्मिर येथील पहलगाम येथे दहशदवाद्यांनी २७ निष्पाप भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडून हल्ला केला.ही घटना अतिशय निंदनीय व मानवतेला काळीमा फासनारी असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी यावर कठोरात कठोर भूमिका घेवून सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाय योजना करावयाला हव्यात कार्यवाही करावी.जातीय धार्मिक तेढ निर्माण करून भ्याड हल्ले करणाऱ्यांवर केंद्र सरकारने कार्यवाही तर करावीच परंतू देशाच्या सुरक्षिततेसाठी काही उपाय योजना देखील कारवाया हव्यात.या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या सर्व नागरिकांना आर्थिक मदत करावी व त्यांच्या कूटूंबातील एकास केंद्रसरकारने त्यांच्या पात्रते प्रमाणे नोकरीत केंद्र शासनात सामावून घ्यावे. 

  पहलगाम मधील दहशतवादी हल्यात सर्व मृत्यूमूखी पडलेल्यांना बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीयाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत आहे अशी माहीती रिपाई आठवले बुलडाणा जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.कश्मिर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बुलडाणा जिल्हा रिपाई आठवले गटाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहे हा हल्ला अतिशय भ्याड व मानवतेला काळीमा फसणारा असून हल्लेखोरावर कठोरात कठोर कार्यवाही भारत सरकारने करावी असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

बाबासाहेब जाधव – 94225 91321, बुलडाणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *