हजारो जनसामान्य विधेयक रद्द करा या मागणीला घेवून आझाद मैदानात प्रचंड धरणे.

विशेष प्रतिनिधी आझाद मैदान मुंबई – माकप,भाकप,शेकाप,माकप (एमएल) लिबरेशन,कष्टकरी संघटना यांसह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे),राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार),राष्ट्रीय कॉंग्रेस व अनेक पुरोगामी संघटना जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीत एकत्र.जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती द्वारा दिनांक 30 जून 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे हजारो जनसामान्यांच्या उपस्थितीत सरकारच्या जनविरोधी महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा या मागणीला घेऊन प्रचंड मोठे धरणा आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात प्रमुख उपस्थिती पुरोगामी महाराष्ट्राला मानणारी,हुकूमशाही च्या विरोधात संघर्षासाठी तयार असलेली जनता,विविध पक्ष संघटनाच्या नेतृत्वात उपस्थित होती.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सुप्रिया सुळे,राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील,माकप डहाणूचे आमदार मा.कॉ. विनोद निकोले,राष्ट्रवादी पक्षाचे आमदार मा.रोहित पवार व आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे,अनिल परब,भास्कर जाधव यांसह सह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे व एस के रेगे, शेकापचे भाई जयंत पाटील व राजू कोरडे,भाकपचे सुभाष लांडे व प्रकाश रेड्डी,अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे धनंजय शिंदे,भारत जोडो आंदोलनाच्या उल्का महाजन,कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, समाजवादी पक्षाचे राहुल गायकवाड व मेहराज सिद्दिकी,फॉरवर्ड ब्लॉक चे किशोर कर्डक,माकप एमएल लिबेरेशन चे उदय भट,श्रमिक मुक्ती दल लोकशाही चे धनाजी गौरव श्रमिक मुक्ती दल भारत पाटणकर चे नासिर चौगुले,कामगार संघटना संयुक्त कृती समिति व सीआयटीयू चे राज्य सचिव कॉ.विवेक मोन्टेरो,प्राध्यापक संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या कॉ.ताप्ती मुखोपाध्याय,अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कॉ. प्रिती शेखर,सागर तायडे,काशीनाथ नखाते सह अनेक मान्यवर सामाजिक,राजकीय आणि कामगार चळवळीतील नेते सहभागी झाले होते.उपस्थित मार्गदर्शन करून सरकारच्या संविधान विरोधी धोरणांचा खरपूस समाचार घेत प्रस्तावीत कायद्याला विरोध दर्शविला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक उल्का महाजन यांनी तर सूत्रसंचालन कॉ.शैलेंद्र कांबळे यांनी केले.या विधेयकाविरोधात राज्यभर रस्त्यावर उतरून विरोध करावा लागेल त्यासाठी आपण सर्व एकत्र राहून सरकारची संविधान विरोधी धोरणे हाणून पाडू असा दृढ निश्चय यावेळी उपस्थित हजारो लोकांनी केला.

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीने पाठिंबा देणारे पत्र कॉमरेड शैलेश कांबळे यांना दिले आणि मुख्यमंत्री मन. देवेंद्र फडणवीस यांना जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे असे पत्र सागर तायडे,विनीता बाळेकुंद्री,काशीनाथ नखाते,नंदकूमार महडीक यांनी सही करून दिले.लोकशाहीत असलेल्या वैचारिक मतभेदांचा आदर न करणारा आहे.काही प्रकरणांमध्ये सरकारला न्यायपालिकेच्या भूमिकेत हस्तक्षेप करण्याचेही स्वातंत्र्य दिले गेले आहे,ज्यामुळे स्वायत्त आणि स्वतंत्र न्यायपालिकेचा पाया कमकुवत होईल.सरकारच्या धोरणांवर टीका करणे किंवा शांततापूर्ण आंदोलन करणे यांना ‘अन्याय्य कृत्ये’ ठरवले जाऊ शकते,जे लोकशाहीत अभिप्रेत असलेल्या खुल्या चर्चेच्या तत्वा विरोधी आहे.विधेयकात काही तरतुदी अशा आहेत की ज्यामुळे मूलभूत हक्क जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य,संघटन स्वातंत्र्य आणि न्यायसंगत सुनावणीचा अधिकार यावर परिणाम होईल.थोडक्यात म्हणजे हे विधेयक लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारे आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करण्याचा धोका निर्माण करणारे आहे.ही प्रत्येक नेत्यांनी ठासून सांगितले.या मोर्चात जागरूक नागरिक,कामगार कर्मचारी,अधिकारी,शेतकरी,शेतमजूर सर्व भारतीय संविधान प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
.सागर तायडे यांस कडून
