दि भिमाई मागासवर्गीय को ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुरबाड तालुका व नागसेन बूक डेपो कल्याण आयोजित सासूच्या माहेरत सुनेचा सन्मान रमाई साहित्य महोत्सव मुरबाड 2025, फेब्रुवारी महिना आपल्यासाठी खूप आनंदीमय महिना आहे.या महिन्यांमध्ये आपली आई रमाई आणि महामाता भिमाई यांच्या जयंतीचा महिना आहे.त्यानिमित्ताने त्यांचे विचार,त्यांनी केलेला त्याग,भोगलेले कष्ट,जिद्धीने केलेला संघर्ष सर्व मानव जातीसाठी प्रेरणादायी आणि लक्षवेधी होता.तो घराघरात पोहोचावा या निमित्ताने भिमाईभूमीत म्हणजेच मुरबाड मध्ये रमाई साहित्य घराघरात पोहोचावे या अनुषंगाने “रमाई साहित्य महोत्सव” आयोजित केला आहे. “भिमाई भुमीत सुनेचा सन्मान” व्हावा या उद्देशाने हा साहित्य महोत्सव बुधवार दिनांक. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी १०.३० वाजता हुतात्मा हिराजी पाटील सभागृह जुना डाक बंगला मुरबाड जिल्हा ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.तरी आपण सर्वांनी रमाईच साहित्य घेऊन या कार्यक्रमात भीमाईच्या सुनेचा सन्मान घडवून आणायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन-मन-धनाने सहकार्य करावे असे राजेश पवार 7021508585.संस्थापक अध्यक्ष – दि भिमाई मागासवर्गीय को ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुरबाड तालुका यांनी जाहीर आवाहन केले आहे.

या उपक्रमात जे धम्म बांधव 15 प्रवेशिका घेऊन सहकार्य करतील त्यांचा “रमाई साहित्य प्रचारवीर” म्हणून सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल.साहित्य प्रचारासाठी आपल्या मित्रांना ग्रुप वर फॉरवर्ड करा. या रमाई साहित्य महोत्सवाचा प्रचारक होण्यासाठी दि भिमाई मागासवर्गीय को ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुरबाड तालुका पदाधिकारी आयु.राजेश पवार 7021508585.संस्थापक अध्यक्ष,आयु.विजय खोळंबे उपाध्यक्ष,आयु.दयानंद रातांबे सचिव,आयु.राजेश चंदने खजिनदार सह सर्व संचालक मंडळ,आयु.सोमनाथ भोसले संचालक नागसेन बुक डेपो कल्याण यांच्याशी संपर्क साधा.असे भिमाई रमाईच्या लेकींना जाहीर आवहान करण्यात येत आहे.
