
सम्राट नगर देवमूर्ती:- २८ जून २०२५ प्रतिनिधी-प्रशिक सम्राट शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सम्राट नगर देवमूर्ती ग्रामपंचायत येथे एक अत्यंत भावनिक आणि गौरवशाली असा सत्कार समारंभ पार पडला. प्राथमिक शिक्षक म्हणून अत्यंत जबाबदारीने व निष्ठेने आपली सेवा बजावलेले श्री.रमेश अजानराव दंदाले सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती व मान्यवर म्हणून आयुष्यमती. अनिता रमेश दंदाले, विस्तार अधिकारी गीताताई नाकोडे मॅडम,शिक्षण विस्तार अधिकारी भरत सोनवणे,केंद्रप्रमुख सुनील टाकरके, शिक्षण प्रेमी ज्येष्ठ समाजसेवक राम जाधव (काका),भारतीय बौद्ध महासभेचे जालना जिल्हा संघटक,व धम्म प्रचारक पत्रकार प्रशिक सम्राट यांची उपस्थिती लाभली.
सत्कार सोहळ्यावेळी फुलांचा सुंदर,शाल व पुष्पगुच्छ देऊन दंदाले सरांचा सन्मान करण्यात आला.सरांच्या दीर्घकाळाच्या सेवेला मान्यता देत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन घडवणारे दंदाले सर हे अनेक शिक्षकांसाठी आदर्श ठरले आहेत,असे मतही मान्यवरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकणारे शिक्षक म्हणून त्यांचे कार्य अविस्मरणीय ठरणार आहे.
प्रशिक सम्राट 816941365,जालना.