
विभूतीपूजा ही लोकशाहीसाठी धोकादायक आहे.हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सागितले आहे.भारतात देवपुजेतून पुढे अंध श्रध्दा आणि अलिकडे अंधभक्तीची, मोठी अंधभक्त मतदार निर्मिती होत असताना.आपल्या देशात लोकशाही धोक्यात आल्याचे चित्र आपण पहात आहोत.आम्ही आमचे स्वातंत्र्य मोठ्या संघर्षातून मिळविले आहे.ते कुणाही व्यक्तीच्या पायाशी गहान ठेवू नका.असे संविधानकार आपल्याला सांगतात.
अशोक खरात भोंदू बाबाने शेकडो श्रीमंत,उच्चशिक्षित,सरकारी अधिकारी असलेल्या स्त्रीयांना गुलाम केल्याचे साऱ्या जगाने पाहिले.एरवी स्त्रियांच्या विनयभंगाचे कारण देऊन दोन जातीत,दोन धर्मात दंगली पेटतात.लव्ह जिहाद सांगून धार्मिक ध्रुवीकरण करणारे प्रचारक पुढे येत आहेत.रामायण महाभारताचे युद्ध स्त्रियांचे कारण देऊन चवीने सांगितले जाते.परंतु महाराष्ट्रात भोंदू बाबांच्या अंधश्रद्धांच्या नावे होणारे स्त्रियांचे शोषण डोळ्यांनी दिसत असताना. महाराष्ट्र शासन एवढ्या हलक्यात हे प्रकरण का घेत आहे? कुठे झोपला विरोधी पक्ष?
कष्ट न करता खाणे? ही खोड मनुष्य प्राण्यास आहे.यातूनच पुरोहित वर्गाची निर्मिती साऱ्या जगात झाली असावी?. भारतात देवपुजे भोवती निर्माण झालेले वलय पाहता. देव देवळे आणि धर्म यांची चिकित्सा बुद्ध चार्वाक महावीर यांनी अडीच हजार वर्षापूर्वी केली आहे.धर्माची निर्मिती ही लोकांनी चागल्या पद्धतीने जगावे यासाठी झाली असल? तरीही त्यात देव स्वर्ग चमत्कार आला की त्यावर ताबा मिळवून इतर लोकांवर गुलामी लादण्याचा प्रयत्न होत आला आहे.EVM माध्यमातून निवडणुका जिंकणे हे आधुनिक गुलामगिरीचे लक्षण आहे.त्यातही नवा दाढीवाला भोंदू बाबा आहेच. भारतात धार्मिक गुलामी ही फार मोठी” हुकुमशाही” आहे.तिचा लोकशाहीला धोका आहे.हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिकविले आहे.देशातील देव,स्वर्ग, चमत्कार आत्मा,भुते यावर ब्राह्मणी ताबा सांगून मनुस्मृती या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या १५ टक्के लोकांच्या मनू निर्मित राज्यघटनेस जाळून टाकत.नव्या पर्यायी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या संविधानास निर्माण करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले.
भारतीय संविधान असताना. महाराष्ट्राने अशोक खरात या भोंदू बाबाची निर्मिती करून आमचे डोळे खाडकन उघडले आहेत.स्त्रियांना मोठ्या संघर्षाने शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या महात्मा फुले सावित्री माई फुले या महान विचारवंत असलेल्या दाम्पत्याचा घोर अपमान याच पुरोगामी महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिला. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर “स्त्रीशोषक” खरात बाबाला आपला गुरू म्हणतात? या सारखा मनुस्मृतीचा दुसरा विजय आणि भारतीय संविधानाचा आणि जिजाऊ सावित्रींचा अपमान नसावा?.खरात बाबाने जो स्त्रियांच्या फसवणुकीसाठी महा “देव” उभा केला आहे. त्याची मालकी पूर्वी ब्राह्मण लोकांकडे होती.ते ब्राह्मणी मंत्र क्षत्रिय मराठा खरात कडे ऐकून ब्राह्मण भटजी मंडळी हैराण आहे?. मूळ प्रश्न आहे फुकटचे खाऊन जगण्याचा.?हजारो वर्षा पूर्वी कष्ट करून जगणे ही बुद्ध महावीर यांची “श्रमण संस्कृती “होती.तर ऐतखाऊ जगणे ही वैदिक ब्राह्मण संस्कृती होती.मनुस्मृती निर्मिती ही भारतात शोषक उच्चवर्णीयांना पोषक तर स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांचे शोषण करणारी पद्धती होती.
हिंदू वैदिक धर्माच्या आधारे होणारे शोषण पाहून बौद्ध धर्मात जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे देशातील ८५ टक्के स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांनी समजून घेतले पाहिजेत.हा लेख वाचणाऱ्या अनेकांची देवावर खूप मोठी श्रद्धा आहे.अर्थात भारताच्या लोकशाहीत प्रमुख देवस्थाने ८५ टक्के स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांच्या ताब्यात आहेत की उच्चजातीय ब्राह्मण लोकांच्या हातात आहेत.
आगरी कोळी कराडी ओबीसी लोकांनी आई एकवीरा मंदिर ट्रस्ट वर आम्ही मालक नाही उच्चवर्णीय जाती आम्ही आईला दिलेले दान खातात हे तपासून पहावे.देव धर्म क्षेत्रात लोकशाही नाही.भारतात अंध भक्तीतून फसवणूक होते.महाराष्ट्रात देव धर्म यातून फसवणूक करणारे सत्तेत बसले असतील?.तर तक्रार कुणाकडे करायची? याचे उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे.
जगात तेल युद्धाची आग पेटली असताना.आम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या आडून धनगर मराठा जातीत महाराष्ट्रात युद्ध पेटते का? हा धक्कादायक प्रसंग पाहिला. छत्रपती शिवराय हे रयतेचे म्हणजेच भूमिहीन गरीब लोकांचे राजे होते.देशातील मूठभर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे म्हणजे ऐतखाऊ जमीनदारांचे राजे नव्हते.तरीही देव धर्म यांच्यावर बौध्दिक साहित्यिक ताबा मिळविणाऱ्या लोकांनी देवा नंतर जास्त विश्वास छत्रपती शिवराय यांच्यावर ठेवणाऱ्या ओबीसी एससी एसटी या रयतेच्या जमिनी लुटण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा उपयोग केला.हे वास्तव महाराष्ट्रासमोर आलेच.बाळराजे आवारे.रातोरात छत्रपतींचे पुतळे बसवणारा नवा उद्योग महाराष्ट्राने पाहिला. सरकारच्या परवानग्या न घेता ही पुतळे निर्मिती, स्थापना अंजनगाव खेळोबा यात जमिनी लुटण्याचा खरा हेतू समोर आला.
देव भक्ती आडून शोषण करणाऱ्या पुजारी जातींचा पर्दाफाश करण्याची महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा आम्ही जपली पाहिजे.परंतु आम्ही रयतेला आरमार,घरे,गावठाणे,शेत जमिनी वाटणाऱ्या रयतेच्या राजाच्या पुतळ्या आडून महाराष्ट्रावर मराठा जातीची जमीनदारी कुणी लादत असेल ? तर लढणारा धनगर ओबीसी बुद्धिवादी नेता प्रा. लक्ष्मण हाके समजून घेतला पाहिजे.देवांच्या नावे होणारा वैचारिक भ्रष्टाचार आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या आड होणाऱ्या मागास वर्गीय जमीन घरांच्या लुटीचे प्रकरण महाराष्ट्र शासनाने समजून घ्यावे.मुंबई ठाणे रायगड पालघर या भागात छत्रपती शिवरायांचे पुतळे विचार मंचावर ठेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना म्हणजे सीकेपी ब्राह्मण मराठा महायुतीने हिंदुत्वाच्या आडून आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांची मुंबई अदानी अंबानी यांना विकली आहे.ओबीसींना उध्वस्त केले आहे.आज एकनाथ शिंदे यांची शिवसेना सिडकोच्या एम एम आरडीए यांच्या माध्यमातून आगरी कोळी ओबीसींच्या जमिनी लुटत आहेत.या लुटारूंचे समर्थक भाजपा सरकार आहे.
धनगर समाजाने प्रा लक्ष्मण हाके यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामागे मागे लपलेले भूमाफिया मराठा क्षत्रिय राजकारण उघड करून सामाजिक न्यायाचे तत्व उघड केले.हा देश, हा महाराष्ट्र आमचा आहे.(“We the people Of india”) त्याचा सातबारा कुणी फसवून स्वतःच्या नावे केला असेल?तर ८५ टक्के स्त्रिया ओबीसी एससी एसटी ही मंडळी भूमिहीन राहू नयेत .यासाठीच आम्ही कोकणात छत्रपतीच्या राजधानी रायगडात “कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर” ही निसर्ग न्यायी तत्वे घेऊन लढलो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आगरी नेते नारायण नागू पाटील.भंडारी नेते सी के बोले यांच्या नेतृत्वात खोती जमीनदारी उध्वस्त करून पुन्हा रयतेचे संविधानाचे राज्य आणणारा कुळ कायदा आणला आहे.
साविधानिक राष्ट्रवाद निर्माण करणाऱ्या धनगर भटके विमुक्त यांच्यासोबत, भूमिहीन जातींसोबत इथला ओबीसी आगरी कोळी भंडारी मावळा लढेल.अर्थात ही लढाई आमच्यावर गुलामगिरी लादनाऱ्या विषमतावादी वृत्ती विरोधात आहे.कोणत्याही एका जाती विरोधात नाही.आपल्यात कुणी भूमाफिया असेल ?तर याचा निषेध व्हावा.देव धर्म किंवा छत्रपतीच्या पुतळ्याआडून कुणी महाराष्ट्रावर जमीनदारी आणत असेल? तर ती ब्राह्मण मराठा अदानी अंबानी जमीनदारी आम्ही उघड करू. त्यासाठी दि बा पाटील यांच्यासारखे पाच हुतात्मे देऊन लढू…आमचे स्वातंत्र्य अखंड ठेऊ.
जय भीम.जय संविधान.जय भारत.
राजाराम पाटील-८२८६०३१४६३.उरण जिल्हा – रायगड.

