कामगार आयुक्तालयात छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,क्रांतिबा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा.

बातमी शेअर करा.

मुंबई : कामगार आयुक्त यांचे कार्यालय,बाष्पके संचालनालय,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय मुंबईच्या तिन्ही कार्यालये मिळुन छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,क्रांतिबा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मा.कामगार आयुक्त श्री.एच.पी.तुम्मोड,भा.प्र.से. यांच्या मार्गदर्शनाखाली व सह आयुक्त कामगार श्रीमती.शिरीन लोखंडे मॅडम यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच बाष्पके संचालनालय,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहयोगाने उपक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आयोजकांनी उत्तमरित्या पार पाडली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस अधिकारी महासंघाचे नुकतेच निधन झालेले आदरणीय कुलथे सर यांना व पहलगाम येथे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमास मा.डॉ.नरेंद्र जाधव,ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ,नीती आयोगाचे माजी सदस्य,माजी खासदार प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. त्यांनी  “भारतीय अर्थव्यवस्थेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि सद्यस्थितीत देशाच्या बजेट मधील एस.सी.व एस.टी.चा वाटा व त्याचे परिणाम” या विषयाची सविस्तर मांडणी केली. यानिमित्ताने डॉ.बाबासाहेबांचे अनेक पैलू नव्याने उलगडले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासून मुंबई कामगार आयुक्तालयात हा संयुक्त जयंती महोत्सव सन २०१६ पासून साजरा करण्यात येत आहे आणि कार्यक्रमास दरवर्षी खूप चांगले वक्ते आमंत्रित केले जातात.त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांचे चांगले प्रबोधन होत असते. त्यातूनच दरवर्षी हा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. म्हणूनच या उपक्रमाबद्दल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे श्रीम.शिरीन लोखंडे यांनी हार्दिक अभिनंदन केले.

   कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार श्री.अरुण कदम पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदर सत्रात कामगार आयुक्त कार्यालय,बाष्पके संचालनालय,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने विविध सामाजिक विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सदरीकरण करण्यात आले.त्यात भीम गीते,पोवाडे, गायन स्पर्धा घेतली.तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यातील विजेत्यांना श्री.अरुण कदम यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.श्रीम.शिरीन लोखंडे-सह आयुक्त,कामगार याच्या नेतृत्वाखाली श्रीम.सुनीता म्हैसकर- कामगार उप आयुक्त,श्री.रोहन रुमाले-सहायक कामगार आयुक्त,श्री.प्रविण कावळे- सहायक कामगार आयुक्त,श्री.सतिश तोटावार-सहायक कामगार आतुक्त,श्रीम.निशा नगराळ-सहायक कामगार आयुक्त, श्री.विकास रोकडे-दुकाने निरीक्षक, श्री.प्रमोद कदम, श्री.पंकज माघाडे, श्रीम.आशा रसाळ, श्रीम.मृणाल मेश्राम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष मेहनत घेतली.

श्रीमती. शिरिन लोखंडे

सह कामगार आयुक्त (महाराष्ट्र राज्य), मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *