
विशेष प्रतिनिधी नागपूर:- जयभीम नाऱ्याचे जनक बाबू हरदास यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठी भाषीय ग्रंथ “समाज क्रांतीचा नारा जयभीम बाबू हरदास यांच्या शोध” या ग्रंथाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले.या ग्रंथाचे लेखक बाबू हरदास एल.एन.मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर गेडाम आहेत. 2029 मध्ये त्यांची 125 वी जयंती आहे त्या प्रित्यर्थ शासनाने विविध उपक्रम राबवण्या संबंधीचे निवेदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यासंबंधी लवकरच बैठक घेऊन महापुरुषांना संपूर्ण सन्मान देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यापुर्वी किशोर गेडाम यांनी सन 2000 मध्ये 25 वर्ष पूर्वी बाबू हरदास यांचे जीवन चरित्र हिंदी भाषेमध्ये प्रकाशित केले होते.त्याच ग्रंथाचा अनुवाद करण्यात आला असून त्यात अधिकची भरीव माहिती देण्यात आलेली आहे. या प्रसंगी माजी आमदार डॉ.मिलिंद माने, किशोर गेडाम, बाबू हरदास एल एन मागासवर्गीय संस्था च्या सचिव सौ.माया उके, इंजि.संकेत गेडाम, सौ.छाया गेडाम व पदाधिकारी दिलीप भस्मे, तारांचद पखीडे,सुनिता रंगारी उपस्थित होत्या.
किशोर गेडाम यांस कडून नागपूर.
