
विशेष प्रतिनिधी पुणे :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) काशेवाडी प्रभाग क्रमांक 19 च्या वतीने ईद मिलन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या जयंतीच्या निमित्ताने काशेवाडी येथील चमनशाह दर्गाह चौक या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सदस्य अशोक शिरोळे होते.
या कार्यक्रमामध्ये कोरोना काळामध्ये पुणे शहरांमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना रेशनिंग तसेच जीवनावशक वस्तूंचे वाटप केल्याबद्दल माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख तसेच समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला वसंतराव साळवे (राजकीय),कासम भाई शेख (सामाजिक),उज्वला पवार (धार्मिक) लक्ष्मी गायकवाड या समाजसेवकांचा गौरव यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र कांबळे व सूत्रसंचालन आभार संदीप धांडोरे यांनी मानले.
याप्रसंगी शहराध्यक्ष संजय सोनवणे,शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण,लुकमान खान,कणव चव्हाण,अनिल दामजी,लियाकत शेख,रोहित कांबळे,राजेश गाडे,मंगल रासगे,सुन्नाबी शेख,नंदू परदेशी,सुंदर पाटोळे,शौकत बागवान,शशांक माने,सुशिल मंडल,प्रविण बनसोडे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली.
महेंद्र कांबळे ९७६७२१४६४७ पुणे यांस कडून