
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष मानवी तस्करीच्या विरोधात कारवाया करण्याकरता अनेक कारण देऊन “रेस्क्यू ऑपरेशन” करण्याचे टाळत आहेत.असा बऱ्याचदा अनुभव स्वयंसेवी संस्थांना आल्याने AHTU विभागाला मरगळ आली आहे का? असा प्रश्न संस्था करत आहे.मानवी तस्करीला आळा बसावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनाच्या सर्व देशाच्या प्रतिनिधींनी मानव तस्करीवर कडक कारवाई व्हावी यासाठी कायदे करावेत. या मुद्द्यावरून एक मत झाले होते. त्या नुसार भारत सरकारने IPTA ॲक्ट 1956 कायदा पारित करण्यात आला. ह्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी त्यासाठी “विशेष अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष” जिल्हा नुसार सुसज्ज आहेत.ह्या विशेष कक्षाची जबाबदारी मानवी तस्करी आणि त्याचं जाळ उध्वस्त करून तस्करांना शिक्षा देण्यात विधी विभागाला सहकार्य करणे हे काम आहे. हे कार्य राष्ट्रीय स्तरावर होत आहे.महाराष्ट्र राज्यात जवळपास ३६ जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष स्थित आहेत.त्याच बरोबर ह्या मानवी तस्करीला रोखण्यासाठी संस्था,संघटना, स्थानिक मंडळ,जागरूक नागरिक इ.प्रतिनिधी ह्या करता आप आपल्या परीने योगदान देत असतात.
एन.सी.आर.बी.च्या २०२४ अहवाल नुसार मागील वर्षांच्या प्रमाणा पेक्षा गुन्हेगारीचे प्रमाण ०.६% कमी झाले आहे; ही समाधानकारक बाब जरी असली तरी सुद्धा महाराष्ट्रात महिला आणि मुल यांच्या बाबतच्या गुन्ह्यात ४% वाढ झालेली दिसून आली आहे. ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांने AHTU हया कक्षाच्या तत्परते बाबत नाराजी व्यक्त केली. ज्या संस्था मानव तस्करीवर आळा घालणं आणि पीडितांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात. त्या मोठ्या मेहनतीने मानवी तस्करी बाबत माहिती गोळा करतात अन् खातरजमा झाल्यानंतर AHTU कडे माहिती देतात. परंतु बऱ्याचदा ते “रेस्क्यू ऑपरेशन” करण्या करिता AHTU चे अधिकारी उडवा उडवीचे उत्तर देऊन कर्तव्य पराडमुख होताना दिसतात.आता तर, त्याचं पेटंट उत्तर असतं की,अल्पवयीन मुली ह्या तस्करांच्या सापळ्यात अडकलेल्या असतील तर आम्ही कारवाई करू असं सांगून आपले अंग काढून घेतात.ही प्रवृती पोलिस विभागालाच काय तर देशाला घातक आहे असे म्हटलं तरी वावग ठरणार नाही.या प्रवृत्तीला वेळीच उच्च पोलीस अधिकारी लगाम लावतील का? असा सवाल संस्थेचा आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, ITPA ॲक्ट 1956 नुसार कोणत्याही व्यक्ती मग मुली,महिला,मुले मानवी तस्करीचे शिकार होत असतील तर त्यांना त्यातून मुक्तता करण्याचे काम केले पाहिजे.पोलिसांनी अल्पवयीन मुली असतील Rescue operation करू अन्यथा नाही असं म्हणणे कायद्याला धरून नाही.मग,महिला,पुरुष, मूल असतील तर त्याची सुटका करायची करायची नाही का? याचाही विचार व्हावा.

एका स्वयंसेवी संस्थेने असे अनुभव कथन केले की,एक तस्कर महिला काही महिला,मुली यांना पैशाचे प्रलोभन देऊन एका वसाहतीच्या एक रूम मध्ये त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करत होती.पोलिस त्यांची सुटका करायची सोडून; त्या महिला गरीब आहेत,त्या पोटासाठी हे काम करतात.असा उदात्त मानवतेचा दृष्टिकोन सांगून ती कारवाई न व्हावी असा सल्ला दिला.परंतु संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पटवून दिले की, आपण असेच केले तर,व्यभिचार बोकाळून,सामाजिक आरोग्य बिघडेल. मग तेव्हा पोलिसांनी कारवाई झाली.त्यात हे रॅकेट चालवणारा सूत्रधार सुद्धा सापडला. सांगायचा मुद्दा म्हणजे,कुठं माणुसकी,दया दाखवावी हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.अनैतिक मानवी वाहतूक थांबवायची असेल तर ITPA कायद्याची गांभीर्य पूर्वक अंमलबजावणी करणे महत्वाच ठरेल. AHTU कक्ष्यांनी मरगळ झटकून पुन्हा जोमाने कार्य तत्पर होऊन मानवी तस्करीचे साखळदंड तोडले पाहिजेत.
कालिदास रोटे 7208895061,मुंबई संघटक :- पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य