
विशेष प्रतिनिधी मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात,शहरात,तालुक्यात,जिल्ह्यात,राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व बुलढाणा जिल्हा (महिला) प्रभारी या पदावर माजी नगरसेविका सौ. प्रितीताई राजेंद्र शेगोकार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. सौ.प्रितीताई राजेंद्र शेगोकार या शेगांव नगर परिषदच्या लढाऊ माजी नगरसेविका असून जनआंदोलनात त्या सक्रिय असतात.त्या एका राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी असून त्यांनी जनतेच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत.तसेच महापुरुषांच्या विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम त्या आयोजित करतात.भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात त्या मागील काही दिवसांपासून सक्रिय सहभागी आहेत.या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात माजी नगरसेविका सौ.प्रितीताई राजेंद्र शेगोकार या जनजागृतीचे काम तन मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.

दादाभाऊ अभंग अध्यक्ष कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती.