गाडेगाव खुर्द जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. 

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी-भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२५ रोजी  जिल्हा परिषद माध्यमिक उच्च प्राथमिक शाळा  गाडेगाव खुर्द पंचायत समिति जळगांव जमोद येथे  प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त शाळेत ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री.अंबादास श्रीराम फेरण यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समिति उपाध्यक्ष प्रमोद किसन रोजतकार यांच्या हस्ते तर वर्षभर शाळेत झालेले विविध उपक्रम असे संविधान लेखन स्पर्धा,रंगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,महावाचन उपक्रम यामधील उत्कृष्ट प्रथम,व द्वितीय क्रमांकांच्या विध्यारथांना बक्षीस वितरण गाडेगाव खुर्द ग्रामपंचायत सरपंच सौ. गिता अनिल मऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिति सर्व सदस्य,दोन्ही गांवचे सरपंच तथा उपसरपंच,सदस्य,पालक,विद्यार्थी उपस्थित होते. दुपारी ११ ते ४ च्यावेळेत शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या आनंदात ,उत्साहात भरगच्च कार्यक्रमाणे उपस्थितांची मने जिंकली. या मध्ये स्वच्छता,देशभक्तीपर गीते,लोकगीते,आदिवाशी नृत्य,व्यसनमुक्ती गीते, भांगडा भारुड,समाज प्रबोधन गीते,बेटी बचाव बेटी पढाओ यावर आधारित गीते व नाटिका सादर केल्या गेली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हिस्सर मॅडम व सौ.जोशी मॅडम यांनी उत्तम पद्धतीने केले.कार्यक्रमासाठी दोन्ही गांवचे सरपंच तथा उपसरपंच,सदस्य, शाळा व्यवस्थापन समिति सर्व सदस्य, पालक,विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थांचे कौतुक उपस्थितांनी रोख १४००० रुपये देऊन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोपान मोरखडे तर  कार्यक्रम यशस्वीतेसाठी   शाळा व्यवस्था समिति सदस्य उपसरपंच श्री. दत्तात्रय खुपसे,अशोक भाऊ मुडे,शिक्षक,ईश्वरे मॅडम,हिस्सर मॅडम,जोशी मॅडम,काकडे सर,जगताप सर,सोळके सर,बक्कडवाड सर,वाघमारे सर,गावकरी पालक वर्ग रोशन तायडे,संतोष तायडे,तसेच साऊंड सिस्टम चे श्री,उगलेभाऊ यनाचे सहकार्य लाभले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *