वाशीम येथे शुक्रवारी मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन कार्यक्रम

बातमी शेअर करा.

उपस्थित राहण्याचे स्वागताध्यक्ष अनिल ताजने यांचे पत्रकार बांधवांना आवाहन

वाशीम – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज जागृतीसाठी सुरू केलेल्या मूकनायक ह्या पाक्षिकाला १०५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ३१ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता स्थानिक पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समधील चिंतामणी कॉन्फरन्स हॉलमध्ये मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन कार्यक्रम व पत्रकार सत्कार ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अनिल ताजने यांनी केले आहे.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष पत्रकार विनोद तायडे राहतील.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिप सिईओ अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग ठोंबरे, जिल्हा माहिती अधिकारी यासेरुद्दीन काझी यांच्यासह प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील जेष्ठ पत्रकार सागर तायडे यांची उपस्थिती राहील. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ.तुषार गायकवाड, माजी जि.प.सदस्या सौ.कल्पना राऊत,विदर्भवादी नेते दत्तराव धांडे,समाजसेवक आशिष इंगोले, नारी शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता इंगोले, समाजसेवक धनंजय घुगे, म. रा. पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी, मेडशी ग्राम पंचायतचे सरपंच शेख जमीर शेख गणिभाई, दलित मित्र गोपाळराव आटोटे, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार, वाशिम जिल्हा वृत्तवाहिनी संघाचे विठ्ठल देशमुख, व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, साप्ताहिक माध्यम प्रतिनिधी संदीप पिंपळकर, संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभाताई सोनोने, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सिध्दार्थ देवळे, माणिकराव सोनोने, राजीव दारोकार, अ. भा. शिक्षक संघटनेचे विजय मनवर, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे,मा.जि.प. सदस्य विनोद पट्टेबहादूर, समाजसेविका वैशाली खोब्रागडे, सत्यमवे जयते फाउंडेशनचे अध्यक्ष परमेश्वर अंभोरे, समाजसेवक अनंतकुमार जुमडे, अ‍ॅड. संजय इंगोले, कास्ट्राईब कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष हेमंत तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहील. तरी कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष अनिल ताजने, मार्गदर्शक बबनराव खिल्लारे, सुनिल कांबळे, सुधाकर पखाले, राजाभाऊ इंगोले, आयोजन समिती अध्यक्ष विनोद तायडे, उपाध्यक्ष संतोष वानखडे, माणिकराव डेरे, रवी अंभोरे, विनोद डेरे, बंडू इंगोले, किरण पखाले, कार्याध्यक्ष पप्पू घुगे, सचिव राजकुमार पडघान, सहसचिव डॉ. माधव हिवाळे, कोषाध्यक्ष संदीप डोंगरे, प्रसिद्धीप्रमुख ज्योती इंगळे, सदस्य अजय ढवळे, संजय खडसे, भारत कांबळे, अविनाश भगत, नाना देवळे, सतीश बलखंडे, प्रमोद भगत, श्रीकृष्ण खिल्लारे, संतोष कांबळे, नागेश अवचार, महादेव धवसे, पूजा बनसोड, किरण पडघाण, प्रवीण पट्टेबहादूर आदींनी केले आहे.

आंबेडकरी चळवळीतील पत्रकारांचा सत्कार

  कार्यक्रमात जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार असून यामध्ये विशाल राऊत, सिद्धांत जुमडे, अजय चोथमल, अनिल तायडे, चंद्रकांत गायकवाड, दादाराव गायकवाड, सुनील भगत, संदीप कांबळे, फुलचंद भगत, राहुल जुमडे, प्रदीप खंडारे, सागर अंभोरे, ज्ञानेश्वर वरघट, नागसेन पखाले, प्रकाश चक्रनारायण, गौतम भगत आदी पत्रकारांचा मान्यवरांच्या शुभहस्ते संविधान ग्रंथ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *