
विशेष प्रतिनिधी कल्याण – डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे शनिवार दि. 1 मार्च 2025 सकाळी 11 वाजेपासून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्ध भूमी फौंडेशन कल्याण आयोजित सात दिवसीय साखळी उपोषणाला उत्सपूर्त प्रतिसाद लाभला.कल्याण येथे 7 दिवशीय धरणा प्रदर्शन आणि साखळी उपोषणाला सुरुवात झाली.महाबोधि महाविहार मुक्ती साठी कल्याण येथे आयोजित सात दिवसीय साखळी उपोषण कार्यक्रमात आज पहिला दिवशी बऱ्याच जणांनी स्व:स्फुर्त भाग घेऊन उपोषण पाळले. अनेक जणांनी संयोजन नियोजनात राहून श्रमिक दान,आर्थिक दान दिले.
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्ध भूमी फौंडेशन कल्याण आयोजित सात दिवसीय साखळी उपोषणकर्तेगणांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की,रेल्वे तिकीट रिझर्वेशन किंवा अन्य बऱ्याच कारणास्तव आपण लगेच बुद्धगयेला जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही बैचेन झालो होतो, परंतु पूज्य गौतमरत्न भंतेजींनी आम्हाला आज उपोषण करण्याची सुवर्णसंधी प्राप्त करून दिल्याबद्दल महाविहार आंदोलनासाठी आम्ही काहीतरी करू शकलो, त्याचे आम्हाला तात्पुरतं समाधान वाटत आहे. अनेक धम्म उपासक उपासिका यांनी नांवे दिली होती. परंतु जो प्रथम आला त्याला विचारपीठावर बसायला मिळाले बाकी धम्म उपासक उपासिका खाली बसले.
दुसऱ्या दिवशी रविवार दि. ०२/०३/२०२५ पहिला दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवसासाठी सुद्धा बऱ्याच जणांनी उपोषणा करिता नाव नोंद केली होती.धम्म उपासक उपासिका यांना विचारपीठावर बसण्यास मिळाले.
बुद्धगया प्रकरण आपल्यासाठी सर्वोच्च अस्मितेच्या विषय असल्याने आपण अति महत्त्वाचा खाजगी कामाव्यतिरिक्त उपोषणात शामिल होने पासून वंचित राहू नये.बौद्धांचे सर्वात प्रधान वजूद आपल्याकडून मिठवले जात आहेत, मग आपण घरी बसून व्हाट्सअप,फेसबुक,इंस्टाग्राम वर बुद्धगयेतील व्हिडिओ बघणे सोबतच फिल्डवर येऊन काम करावे लागेल,असे निर्धार करा. बुद्धगयेला नाही जाऊ शकलो तरी आपापले विभागातील धम्म उपासक उपासिका यांची शांततेच्या मार्गाने किती संघशक्ती आहे ते आपण दाखवून देण्यासाठी संघटित झाले पाहिजे.
बुद्धगया येथील फक्त सुमारे 25 बौद्ध भिक्षू यांनी शांततेच्या मार्गाने उपोषण करून त्यात किती ताकद आहे ते जगाला दाखवून दिलेले आहे. त्यांनी आज भारतातील सर्व बहुजन,आंबेडकरी व बौद्ध धम्म उपासक उपासिका यांना जागा केले आहे.लोकांना आंदोलीत केले आहे. तरी 8 मार्च पर्यंत चालणारे साखळी उपोषण कार्यक्रमात अत्यावश्यक वैयक्तिक काम नसल्यास उपोषण स्थळी सहकुटुंब मित्रमंडळीसह अवश्य उपस्थित रहावे असे पूज्य भनते गौतम रत्न यांनी जाहीर आवाहन केले आहे. तिसऱ्या दिवशी दोनशे धम्म उपासक उपासिका यांनी नांवे दिली होती पण विचारपीठावर जास्त लोक बसू शकत नाही. परंतु कल्याण शहरा लागत असलेल्या शहरांना माहिती मिळताच कल्याण येथील उपोषण व धरणे प्रदर्शन तीव्र होत आहे.कोणी आमरण उपोषण करण्यास तयार होत आहेत, कोणी सातही दिवस उपोषण करण्याचा निर्धार करीत आहे.काल रविवार होते म्हणून पूर्ण मंच उपोषणकर्त्याने भरून गेला होता. आज सोमवार वर्किंग डे असल्याने बहुतेक कमी लोकं उपोषणाला बसतील असे वाटत होते,परंतु काल पेक्षाही आज जास्त लोकं बसले.आता चौथा दिवसाचे उपोषणासाठी आज अपेक्षाही तिप्पट धम्म उपासक उपासिकांनी नाव नोंद केली आहे.भांडुप विभागातील धम्म उपासक उपासिका यांनी २ मार्चला लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते त्यांनीही कल्याणच्या साखळी उपोषणाला भेट देऊन सहभाग नोंदविला.उल्हासनगर,बदलापूर विभागातील धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभाग नोंदवीत आहेत.

अभी नही तो कभी नही.महाबोधी महाविहार ब्राह्मणमुक्त व कर्मकांड मुक्त होणारच.बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात कल्याण येथे चालू असलेले ७ दिवशीय साखळी उपोषण,धरणे आंदोलन व विशाल आक्रोश मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळाची आवश्यकता होत आहे.तमाम धम्मबांधवांच्या धम्मदान निधी संकलनातून सदर कार्य संपादन होत आहे. बौद्ध धर्मीयांचे सदर सर्वोच्च विषयाला आपण प्रत्येक धम्म उपासक उपासिका यांनी दानपारमिकेचा हातभार लावावे.कृती समितीतील सर्वांच्या ठरावाने आयु.रोहित खरात यांनी त्यांच्या गुगल-पे/फोन-पे 84199 17820 आणि स्कॅनर वापरण्यास दिले आहे. सदर स्कॅनर किंवा पॅन नंबर वर आपण दान टाकावे.बुद्धभूमीचे मुख्य ग्रुप वर सर्वांना जमा खर्चाचे तपशील मिळतील.बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन.ठिकाण: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कल्याण पश्चिम.सात दिवसीय उपोषण व धरणे आंदोलन पुढील तारीख- ०४ मार्च २०२५,ते ७ मार्च २०२५ रोज सकाळी. १०:३० ते संध्याकाळी.८ पर्यन्त चालणार आहे.विशाल आक्रोश मोर्चा शनिवार दि. ०८/०३/२०२५, दु. २ वा. निघणार आहे.बौद्धांचे सर्वात महत्त्वपूर्ण अस्मितेच्या विषय असल्याने लहान मुलं सोडून अन्य एक-एक बौद्ध उपासक उपासिका यांनी वरील आक्रोश मोर्चेत सहभागी होणे अनिवार्य आहे.अधिक माहितीसाठी-भंते गौतमरत्न महाथेरो (प्रमुख मार्गदर्शक) मो.९९८७४८०३९२. यांच्याशी संपर्क करावा.
सागर तायडे यांस कडून
