
भीमा कोरेगाव विजयस्तंभ व विजयतंभ परिसरातील पावणे दहा एकर जागेवर माळवदकर कुटुंबाचा ताबा आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने प्रत्येक वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.किती लोकांना हे माहित आहे??? ९९.९९% लोकांना माहित नाही व ज्यांना माहिती आहे ते मौन धारण करेन गप्प बसले आहेत त्यांना कुणाची भीती आहे ते माहित नाही.
केवळ एक दिवस परवानगी मिळते व पुन्हा विजयस्तंभासह जागेचा ताबा माळवदकर कुटुंबाकडे जातो.वर्षभर हे कुटुंब जमिनीच्या मधून शेतीचे उत्पन्न घेते.या विरोधात मागील पंधरा वर्षे प्रशासकीय व न्यायालयीन लढा माझ्या नेतृत्वाखाली भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती लढत असून अनेक निकाल या समितीच्या बाजूने लागले आहेत.अनेक वेळा या न्यायालयीन लढ्यात सामील व्हा असे आवाहन केले तर त्याकडे कोण लक्ष देत नाही.
लाखों लोक एक दिवस या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात आणि नंतर ऐतिहासिक विजयस्तंभाकडे दुर्लक्ष करतात.हा विजयस्तंभ व त्या परिसरातील जागा आपल्याला जर ताब्यात घ्यायची असेल तर प्रशासकीय व न्यायालयीन लढा सर्वांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे लढला पाहिजे व यासाठी आपण भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे अतिक्रमण तसेच सध्याची न्यायालय स्थिती काय आहे हे तालुक्यात, शहरात आणि प्रत्येक जिल्ह्यात समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून यासाठी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती या समितीच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवत असून हा लढा समजून घ्या.
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या प्रत्येक तालुक्यात,जिल्ह्यात व प्रत्येक शहरात कार्यकारिणी बनवा महत्वाची जबाबदारी घ्या आणि प्रत्यक्ष फिल्डवर लढण्यासाठी सज्ज व्हा.जनजागृती अभियान तालुक्यात,शहरात, जिल्ह्यात राबवा ही सध्या काळाची गरज आहे.आपले नाव,तालुका व जिल्हा 9702845000 या what’s app नंबरवर पाठवा.केवळ एक दिवस भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना आपण देणार आणि वर्षभर त्याकडे दुर्लक्ष करणार ही अत्यंत वेदनादायक बाब आहे.
भीमा कोरेगाव एक जानेवारीला आपण येतो ते पण मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली म्हणून पण ३६४ दिवस भीमा कोरेगाव विजयस्तंभ कुणाच्या ताब्यात असतो ते माहीत आहे का?????. एक दिवस येतात पण ३६४ दिवस काय करतात???. मग साथ देणार का????.
की फक्त १ दिवस चलो भीमा कोरेगाव…नंतर २ जानेवारी पासून???

दादाभाऊ अभंग 9702845000,मुंबई.
अध्यक्ष भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती
