
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड सत्याग्रहा दरम्यान मनुस्मृतीची जाहीरपणे होळी केली होती,कारण या ग्रंथात जातीभेद आणि अस्पृश्यतेला समर्थन देणारे नियम होते.ही कृती सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्याचा एक महत्त्वाचा भाग होती, ज्यात त्यांनी जातीभेदाचे समर्थन करणारी विचारधारा नाकारली आणि समान हक्कांसाठी लढा दिला.त्याच भारतीय समाजात मनुस्मुर्ती आजही जिवंत आहे.काही लोक आज ही विचार करतात बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन का केले?
जातीभेदाचा निषेध: मनुस्मृतीमध्ये जन्मावर आधारित वर्णव्यवस्था आणि जातीभेद यांना मान्यता दिली होती,ज्याचा डॉ.भिमराव आंबेडकर यांनी तीव्र विरोध केला होता.अस्पृश्यतेचा अंत: हा ग्रंथ अस्पृश्यतेला कायदेशीर आणि धार्मिक आधार देत होता,त्यामुळे आंबेडकर यांनी तो जाळून अस्पृश्यता नष्ट करण्याचा संकल्प जाहीर केला.समान हक्कांसाठी:त्यांना हिंदू समाजात सर्वांना समान अधिकार मिळावेत,ज्यात मंदिरे,विहिरी आणि शिक्षणाचे समान हक्क समाविष्ट होते,अशी त्यांची भूमिका होती.मनुस्मृती जाळणे हा मनुस्मृतीतील विचारांना आणि तत्कालीन ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध दर्शवणारा एक क्रांतिकारक क्षण होता,
समतावादी विचारांचे भारतीय नागरिक २५ डिसेंबर १९२७ हा दिवस “मनुस्मृती दहन दिन” किंवा “समानता दिन” म्हणून साजरा करतात.या घटनेने आंबेडकरांना दलितांचे नेते म्हणून स्थापित केले आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यात एक मैलाचा दगड ठरला.हे कृत्य ‘मनुस्मृती’ (मनुचे कायदे) या धार्मिक ग्रंथाच्या प्रती जाळून ‘बहिष्कृत’ (बहिष्कृत) आणि शोषित समाजावरील अत्याचाराचे प्रतीक म्हणून होते.आज राज्यात देशात मनुवादी विचाराचे लोक सत्ताधारी आहेत.लोकशाहीच्या चारी स्तंभावर त्यांची भक्कम पकड आहे.“लोकशाहीची ताकद प्रत्येक स्तंभाच्या ताकदीवर आणि स्तंभ एकमेकांना कसे पूरक आहेत यावर अवलंबून असते.1) संसद म्हणजेच कायदेमंडळ,2) सरकार – कार्यकारी मंडळ,3) न्याय पालिका – न्यायालय,4) मीडिया किंवा प्रेस. वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. मात्र ते खरे नसून लोकशाहीत फक्त,लोकसभा,न्यायपालिका व नोकरशाही हे तीनच स्तंभ मानले जातात. त्यामुळे ते लोकशाहीचे स्तंभ नसून राजकीय पक्षांचे आधारस्तंभ झाले आहेत. टीव्ही वरील विविध मालिका पाहिल्यावर तुम्हाला वाटते काय मनुस्मृती संपली?. रंग माझा वेगळा ही मालिका काळया रंगाच्या स्त्रीवर आधारित आहे, त्यातील गोऱ्या रंगाची सौंदर्य इनामदार तिच्या जाती धर्माला शोभेल अशीच वागताना दाखविल्या जाते,मध्येच उच्चशिक्षित स्पेशेलिस्ट डॉक्टर मुलगी तनुजा मंत्री येते आणि काय काय करते,दिपाची आई व बहीण कोणत्या नीच पातळीवर कुटुंबात सतत कट कारस्थान करते.म्हणजेच रामायण महाभारतातील स्रियांच्या नायिका खलनायिकाची नव्याने ओळख निर्माण करून वर्णव्यवस्था आजच्या स्रियांवर लादण्यासाठी या मालिका आहेत काय?.एका बाजूला स्त्री शिकली प्रगती झाली सांगायचे दुसरीकडे तिला देवा धर्माच्या जोखंडात बंदिस्त कशी राहील त्यांची व्यवस्था करावी तिच्याकडून रीति रिवाजाच्या नांवा खाली उत्सव साजरा करून घ्यावे या मागचे षड्यंत्र बहुजन समाजातील महिलांनी समजून घेतले पाहिजे.असे असतांना त्याचं स्रिया जास्त संख्येने संध्याकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यत टीव्हीवरील मालिका लक्षपूर्वक पाहतात.
भारतीय स्रीनां युगांयुगाच्या तरुंगात ठेवणारी व्यवस्था म्हणजे जातीव्यवस्था त्याची आचारसंहिता म्हणजे मनुस्मुर्ती होती आणि आज ही ती भारतीय समाजात मनुस्मृती जिवंत आहे.त्या नुसार स्रियांना आर्थिक अधिकार अथवा आर्थिक स्वत्रांत्य नाकारणारी व्यवस्था म्हणजेच मनुस्मुर्तीचे अलिखित कायदे होते.स्रीयाच्या सामाजिक श्रमावर पुरुषाची मालकी असावी असे ती सांगते होती. ज्या मनुस्मुर्ती उच्चजातीय स्रीला घराच्या बाहेर श्रम करण्यास नाकारत होती.तीच उच्चजातीय स्री आज सर्व ठिकाणी आघाडीवर दिसते.ज्या उच्चजातीय लोकांनी मनुस्मुर्तीचे समर्थन केले होते. तेच आज त्याचा जास्त लाभ घेताना दिसतात.टीव्ही सीरियल प्रबोधन करणारी मालिका वरून विचारते “आई कुठे काय करते?.” मध्ये उच्चशिक्षित बापच बाहेर संजना सोबत ऑफिसच्या नांवावर शेण खातो, संजनाचे शेखरशी अधिकृतपणे लग्न होऊन मुलगा असतांना ही ती अनिरुद्ध बरोबर लग्न करण्यासाठी आटापिटा करते.या संघर्षातून कुटुंबात तयार होणारा मानसिक शारीरिक तणाव म्हणजेच काय संदेश देण्याचा उद्देश या मालिकेच्या दिग्दर्शकांचा असतो.
भारतात सर्व ठिकाणी महिलांचे आजचे स्थान पहिले तर मनुस्मुर्ती जिवंत नाही.असे वाटते.पण बहुजन समाजांच्या घराघरातील व्यवहार सण,उत्सव डोळसपणे पाहिल्यास महिलांचे धार्मिक सन उपास तापास आणि मंदिरातील बहुजन समाजांच्या महिलांची उपस्थती पाहिली कि मनुस्मुर्ती जिवंत आहे हे स्पष्ट दिसते.
महिलांची शिक्षणातील आणि नोकरी धंद्यातील प्रगती पाहली तर मनुस्मुर्ती जिवंत नाही असे वाटते.पण जेव्हा बँका,सरकारी कार्यालय, रेल्वे. शाळा कॉलेज मधील सुशिक्षित महिलांना नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगात पाहल्या जातात तेव्हा मनुस्मुर्ती जिवंत दिसते.सिनेमा, नाटक,टिव्ही मालिका मध्ये जेव्हा महिला नायिका, खलनायिका पाहल्या जातात तेव्हा महिलांनी मनुस्मुर्ती नाकारलेली दिसते.पण जेव्हा देवाच्या आशीर्वादाने मुल झाले किंवा प्रगती झाली,संकट टळले हे दाखविल्या जाते तेव्हा मनुस्मुर्ती महिलाच्या मेंदूत कायम कोरली आहे हे दिसते.
“सुख म्हणजे नक्की काय असते?.” असे विचारणारी आणखी एक टीव्ही सिरीयल मालिका त्यामध्ये शालिनी,देवकी, कोण कोणते कारस्थान करून गौरीला कलंकित करण्याचा प्रयत्न करतात,जोतिकाला जयदीप आवडतो आणि जय दीप गौरीचा बालपणाचा मित्र आहे,त्यात जिव्हाळा आपुलकी प्रेम आहे असे दाखवते,माईसाहेब दादासाहेब यांचा फक्त नांवाला दरारा असतो. घरातील नीच पातळीवरील कटकारस्थानाची त्यांना कल्पनास नसते म्हणजेच वडीलधाऱ्यांना या मालिका मूर्खात काडून महिलांना कोणती प्रेरणा देणाऱ्या आहेत.पहिल्या सारखी कडक मनुस्मुर्ती आज कुठे आहे असे म्हणणारे लोकच अशा वेगवेगळ्या मालिका जिवंत करून मनुस्मृती आचार संहिता कायम स्रीयाच्या मेंदूत राहण्याचे काम अनेक प्रकारे करीत असतात. ब्राह्मणी साहित्यिक विचारवंत कसे बेमालूम पद्धती त्यांचे कलम कसाई कौशल्य वापरतात याचे ठळक नांवे नरहर कुरुंदकरांच्या “मनुस्मुर्ती : काही विचार” या पुस्तकाचे परीक्षण कॉम्रेड शरद पाटील यांनी केले त्यावेळी त्यांनी या सर्व बुद्धी प्रामाण्यवादी ब्राह्मणाची यादीच दिली आहे.(संदर्भ सत्यशोधक मार्क्सवादी जुले ऑगस्ट १९८३) आंबेडकरी चळवळीतील लोक वगळता इतर मराठा,ओबीसी मागासवर्गीय बहुजन समाज मनुस्मुर्तीच्या चौकटीत बंधिस्त आहे.
मराठा,ओबीसी बहुजन समाज किंवा इतर पुरोगामी संस्था संघटना पक्ष २५ डिसेंबर मनुस्मुर्ती दहन दिन साजरा करीत नाही.काही जयभिम कॉमरेड असलेले कार्यकर्ते त्यात हिरीरीने भाग घेतात. २५ डिसेबर भारतीय महिला दिवस म्हणून जाहिर व्हावा अशी मांगणी १९९६ साला पासुन केली जाऊ लागली डॉ प्रमिला संपत यांनी पुढाकार घेउन सर्व प्रथम चंद्र्पुरच्या दीक्षाभूमीवर विकास वंचित दलित राष्ट्रीय महिला परिषद झाली होती. त्यात ही मांगणी झाली त्या नंतर बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर प्रणित संस्था संघटना करीत आहेत त्याला पुढे रिपब्लिकन महिला आघाडी ने २५ डिसेंबर हा भारतीय स्रीमुक्ति दिन म्हणून जाहिर व्हावा अशी मांगणी केली होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह केला होता.त्यात मनुस्मुर्ती,श्रुती स्मृती,पुरणाला स्पष्ट नाकारून त्याचे दहन करण्याचा ठराव करण्यात आला होता.हा ठराव विनायक सहस्त्रबुद्धे यांनी मांडला आणि राजभोज यांनी त्याला पांठिबा दिला. मनुस्मुर्ती दहनाचा ठराव झाल्या नंतर रात्री नऊ वाजता एका खड्ड्यात अस्पुश्य बैराग्याच्या हस्ते मनुस्मुर्तीची जाहीर होळी करण्यात आली. या महाड च्या सत्याग्रह यशस्वी करण्यात ज्यांनी जीवापार मेहनत घेतली ते सर्व शांताराम पोतनीस,केशवराव देशपांडे,रा.वामनराव पत्की,कमलाकर टिपणीस, पुण्यावरून सुभेदार घाडगे, रा.थोरात.ही मंडळी होती या सर्व बाबासाहेबाच्या सच्च्या अनुयानी त्याचे जोरदार समर्थन केले म्हणून यांच्या स्रिया शिक्षण नोकरीत सर्व ठिकाणी आघाडीवर आहेत पण त्या आज मनुस्मुर्ती चे दहन दिन साजरा करीत नाही. सर्व ठिकाणी मनु ने नकारलेले अधिकार घेतात आणि योग्य ठिकाणी मनुस्मुर्तीच्या इतर धार्मिक कायदे कलमाचा काटेकोर अंमल करतात. त्यामुलेच भारतात मनुवादी संघटना पक्ष वाढत आहेत. बाबासाहेब यांनी मनुस्मुर्तीचे जाहिर दहन केले होते ते केवळ महिलाच्या मुक्तिसाठी आज महिला मुक्त आहेत पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे ते अभ्यासपूर्ण परिश्रम आणि त्याची अंमलबजावणी करीता केलेला संघर्ष महिला विसरल्या आहेत.
बहुजन समाजातील लोक किती ही फुले,शाहु,आंबेडकर यांची नांवे घेऊन जयजयकार करीत असली तरी त्यांनी खरी विचारधारा स्विकारली नाही. हे त्यांच्या आचरणातून दिसून येत आहे.मराठा ओबीसी मागासवर्गीय एकूण बहुजन समाज म्हणजे ८५ टक्के मागासवर्गीय समाज जो विविध जाती आणि पोट जातीत विखुरला आहे.तो सुशिक्षित होऊन पुढे गेला असे दिसत असले तरी त्यांचावर हजारो वर्षाचे बंदीस्त करणारे संस्कार तो विसरायला तर नाही.विज्ञानाने किती प्रगती केली असली तरी तो स्वतःला त्या बंधनातून मुक्त भरारी घेण्यास तयार नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ती २५ डिसेंबर १९२७ ला महाड येथे जाहीर पणे होळी करून मनुस्मृती जाळली असली तरी २०१७ मध्ये तिची नवीन मराठी आवर्ती पेशवा सरकारच्या आशीर्वादाने बाजारात खुले आम विकली गेली.आणि ते घेणारे बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजातील सर्व प्रकारचे लोक होते.त्याला पुरोगामी समाजवादी, राष्ट्रवादी यांनी दाखविण्या पुरता विरोध केला. त्यात आंबेडकरी चळवळीतील सुशिक्षित लोक पण मागे नाहीत.ते मनुस्मुर्ती माहिती करीता,अभ्यास करण्यासाठी विकत घेतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली म्हणजे ती बहुजनांच्या विकास, कल्याण,अधिकाऱ नाकरणारी होती म्हणुन जाळलीनां. मग आपण बाबासाहेबांनी लिहलेल वाचले पाहिजे.म्हणजे आपणास योग्य दिशा मिळेल.म्हणूनच बहुजन समाजातील सर्व मागासवर्गीय जातीजमातील सर्व पुरुष महिलानी मनुस्मुर्ती दहन का केले यांचा इतिहास वाचावा तर खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती होईल.टीव्ही चॅनलवर असा मालिका येणार नाहीत.तरसहकुटुंब सहपरिवार,फुलाला सुंगन्ध मातीचा, मुलगी झाली हो!. यासर्व मालिकांनी बहुसंख्य महिलांना मोहित करून ठेवले.बॉब कट केस ठेऊन,जीन पॅन्ट टी शर्ट घातले म्हणजे स्त्री मुक्त आहे असे समजणे मूर्खपणाचे लक्षण आहे. आज सर्व क्षेत्रात मुक्तपणे ती नोकरी,धंदा, कला कौशल्य दाखवीत असली तरी ती लैंगिक,मानसिक,आर्थिक दृष्ट्या धर्म संस्काराच्या बाहेर जात नाही. गुरुवार शुक्रवार सह सर्व रिती रिवाज योग्य वेळी काटेकोर पणे त्यांचे पालन करते म्हणुन तीला,बॉब कट,जीन पॅन्ट टी शर्ट घालण्याची विशेष सवलत मिळते आहे.म्हणुन ती मोठ्या प्रमाणात मनुस्मुर्ती दहन दिन साजरा करीत नाही.बहुजन समाजात मागासवर्गीय जाती जमातीत वैचारिक प्रबोधन होणे गरजेचे आहे.म्हणुन बहुजन समाजात मनुस्मुर्ती आज भी जिवंत आहे.मराठा समाजात मराठा सेवा संघाने प्रचंड वैचारिक प्रबोधन केले.मग त्यांच्या महिला मनुस्मुर्ती दहन कार्यक्रम घेतात का?. (माफ करा या बाबत मला माहिती नाही,कधी वाचले,आणि पाहिले नाही ) मग कोणत्या स्त्रीया त्यांच्या संघटना मनुस्मुर्ती दहन दिवस साजरा करतात?. सर्वच भारतीय समाजातील स्त्रीयांनी मनुस्मुर्ती दहन दिन म्हणून साजरा करायला पाहिजे. तरचं ती वैचारिक दृष्ट्या संपेल. अन्यता ती केवळ बहुजन समजतच नाही तर सर्व भारतीय समाजात जिवंत राहील.आणि प्रज्ञा ठाकूर,साध्वी असूनही खासदार बनून संसद भवनात जाईल. मनुवादी मनुस्मृती वर्णव्यवस्था किती महत्वपूर्ण होती हे सांगेल.जगात पुस्तक प्रेमी म्हणून ओळख असणाऱ्या आंबेडकरांनी मनुस्मृतीची जाहीरपणे होळी का केली?.ही सांगेल काय ????.
सागर रामभाऊ तायडे ,9920403859 भांडुप मुंबई.
