• समता व बंधुत्वाचा संदेश देत अनोख्या पद्धतीने बुद्ध जयंती साजरी.
• दिनबंधु परिवार व नेफडो संस्थेचा संयुक्त पुढाकार; राजुरा येथे कार्यक्रम उत्साहात.

राजुरा,३ मे दिनबंधु परिवार राजुरा तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,राजुरा येथे सामाजिक बांधिलकी जपत जिलेबी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे तालुका उपाध्यक्ष वृक्षप्रेमी भास्कर करमरकर सर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बुद्धांच्या शांतता,समता व बंधुत्वाच्या विचारांचे स्मरण करून समाजात प्रेम,सौहार्द आणि एकात्मता वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला. गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास दिलीपभाऊ वैरागडे, संजूभाऊ गहूकर,आसिफ सय्यदअशोक राव, महादेव करमनकर,नरेंद्र देशकर, सुनोजी किणगे,बलवंत ठाकरे,किशोर टेंभुणे, सतिश ब्राम्हणे,सतिश मालवणकर,रणजीत मावळणकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थितांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.या उपक्रमातून समाजात मानवता,सामाजिक ऐक्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला असून नागरिकांकडून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
किशोर पाडले 95278 27842, राजुरा,यांस कडून
