धम्माच्या नांवावर दिव्याचे मार्केटिंग 

बातमी शेअर करा.

बुद्ध पौर्णिमेला डोक्यात ज्ञानाचे दिवे लावा,एका भोंदू चरित्रहीन भंतेने चिवराच्या आड लपून अनेक कांड केल्याची पोलिस स्टेशनला नोंद आहे. शीलभ्रष्ट वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती कडून चांगल्या शिलसंपन्न भंतेनां राजकीय नेत्यांच्या अभिनेत्याच्या भेटी घेऊन लोकांच्या मनावर प्रभाव टाकण्याचे सोशल मिडियाच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.दीपदानासाठी दीप व एक हजार भंतेनां चिवर दान खरेदीच्या नावाखाली भावनिक आवाहन करून निधी गोळा करण्यात आला.मातृसंस्थेचे प्रमुख यांना सर्व प्रकारची माहिती दिल्यावर ही त्यांनी प्रमुखाची भूमिका स्वीकारली.यांचे आज सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.शेवटी “गंदा है लेकिन धंदा है” हेच सिद्ध झाले. ऐकूण समुद्रात दिवे सोडून आपल्या डोक्यात काय ज्ञानाचा प्रकाश पडला की निर्बुद्धपणाचा अंधार झाला.यातून कोणता बुध्द धम्म आचरणात आला आहे,धम्मात गंडा दोरा,आणि दिवे लावण्यात कोणताही अर्थ नाही.मात्र धम्माच्या नांवावर दिव्याचे मार्केटिंग झाले.हे सिद्ध झाले.यासाठी जागृत व्हा ! प्रज्ञा,शील,करुणा आणि समाधी चा अभ्यास वाढवा,बुद्ध आचरणात आणा. धम्मात कर्मकांड आणि शो बाजी नाही.इतर देशातील बौद्ध कसा पद्धतीने उत्सव साजरा करतात. त्यांचे अनुकरण करा.त्यांची विहाराच्या परिसरात स्वताची बाजारपेठ उभे असते.आणि विहारात येणारा प्रत्येक उपासक,उपासिका हा ग्रहाक असतो.चैत्यभूमी दादरला धम्माच्या नांवावर दिव्याचे मार्केटिंग अचानक निर्माण झाले नाही याचे उत्पादन आणि मार्केटिंग सहा महीने अगोदर नियोजन बद्ध तयार होते. एका भोंदू चरित्रहीन शीलभ्रष्ट वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती कडून पद्धतशीरपणे प्रकाशा कडून अंधारा कडे,विज्ञानातून अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांडाकडे वाटचाल करण्याचे कार्य करून घेण्यात आले. धम्म उपासक,उपासिकांनी यातून काय मिळविले?.याचा प्रत्येकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. धम्माच्या नांवावर दिव्याचे मार्केटिंग हा लेख मी 25 एप्रिल ला अनेक पूज्य भंते शी चर्चा करून लिहला होता.पण तो प्रसिद्ध करण्याचे धाडस होत नव्हते.आता कार्यक्रम झाला त्यातून काय साध्य झाले?.म्हणून हा लेख प्रपंच 


   
धम्माच्या नांवावर दिव्याचे मार्कटिंग झाले आहे.जगात स्वार्थ पायी माणस आत्मकेंद्रित झाली आहेत.एकत्र मातृसंस्था संस्कृती नष्ट झाली आहे.एकत्र कुटुंब पद्धत विभक्त पद्धतीत झपाट्याने बदलत आहे.अन्याय, अत्याचार करून शोषणाच्या पद्धतीत सुद्धा स्मार्टचोरी मोठ्या प्रमाणत होत आहे.त्यामुळेच कोण कोणाचे रक्षण करण्याच्या भांडगडीत पडतांना दिसत नाही.म्हणूनच निसर्ग नियमाने माणसांनी संघटीत राहिले पाहिजे.संघटीत झाल्यावर कोणीच अन्याय अत्याचार आणि शोषण करतांना शंभर वेळा विचार करेल.त्यांचा कधी पराभव होत नाही असे तथागत बुद्धांनी वज्जी समाजाचे उदाहरणे देऊन बुद्ध आणि त्यांचा धम्मामध्ये सांगितले आहे. “संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षा, क्यो की संघ बडा बलवान.”  वैशाक पौर्णिमेला योगी सभागृह दादर पूर्व येथील स्वामी नारायण मंदिरामागे (BAPS Mandir) स्थितहे मुंबईतील एक प्रमुख आणि वातानुकूलित (AC) सभागृह आहे. हे ३,५०० पेक्षा जास्त आसन क्षमता असलेले मोठे ऑडिटोरियम आहे,तिथे ऑन लाईन नांव नोंदणी करून चार हजार पेक्षा ध्यान साधना करणारे उपासक,उपासिका रात्री 8.30 ते 12 वाजे पर्यन्त ध्यान साधना करत होते. ध्यान साधनाही मन शांत, एकाग्र आणि तणावमुक्त करण्याची एक प्राचीन पद्धत आहे,जी शरीर,मन आणि आत्म्याला जोडून मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते.वैशाक पौर्णिमेला बुद्धाचा जन्म,ज्ञान प्राप्ती आणि महानिर्वाण झाले होते. त्यामुळे यादिवशी केलेली ध्यान साधन प्रचंड ऊर्जा देते.आता ऊर्जा म्हणजे काय?. समुद्रात दिवे लावून तथागत बुद्धाची काय ऊर्जा मिळाली हे कोणी सांगू शकणार नाही. पण योगी सभागृहात उपस्थित लोक कोण्या एका जातीचे धर्माचे,राज्याचे नव्हते हे मी अनुभवले.विचार आणि आचारणतील ठरक फरक मला जाणवला. त्यावर नंतर लिहणार आहे.
   जगात अनेक वस्तुचा शोध लागला त्यामुळे मानव जातीचा मोठा फायदा झाला,पण त्याच बरोबर नुकसान सुध्दा झाले.ती वस्तु म्हणजेच आरसा!. आरशात प्रत्येकचे प्रतिबिंब दिसते आणि जसे आहे तसेच दिसते. मनातील विकार ही आरसात दिसतात. जगात एकमेव महामानव असे आहेत की ज्यांचा जन्म,ज्ञान प्राप्ती आणि महापरीनिर्वाण एकाची दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला झाले. त्यामुळे वैशाख पोर्णिमा हा दिवस जगातील १८० देशात राष्ट्रीय उत्सव म्हणून खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.भूख्खू संघाला दान दिल्या जाते,काही उपासक लहानपणीच मुलांना संघाला धम्माला दान देतात.
   वैशाख पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला.याच दिवशी वैशाख पोर्णिमा सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली.आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि वैशाख पोर्णिमायाच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापारीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते,अंत दिप भव,स्वयं प्रकाशीत व्हा महान संदेशाचा आम्ही अर्थच समजुन घेतला नाही.कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही.प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका असे बुद्ध नेहमी सांगत होते. विचारावर विस्वास ठेउन प्रमाणिक पणे वागलात तर तुम्हाला आयुष्य हसवेल, तेव्हा समजा की हे चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.मोदी भारतात असले कि मनुवादी विचारांचे कट्टर समर्थक असतात.परदेशात गेले कि बुद्ध शिवाय दुसरे नांवच घेत नाही. बुद्धाची संघ शक्ती तिकडे गेल्यावरच आठवते.बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत का आठवत नाही.ते म्हणतात “संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षा, क्यो की संघ बडा बलवान.”
       तथागत बुद्धानी वैशाख प्रोर्णिमाला जगाला जो मानव मुक्तीचा मार्ग दाखविला त्यालाच धम्म म्हणतात.धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग त्या मार्गाने जाण्यासाठी पंचशीलाचे पालन केले पाहिजे.पंचशीलेचे पालन आपण केले तर दररोजच्या जगण्यातील अनेक विकार नष्ट होतात.आणि विचार आचरणात आणले तर स्वताचा विकास व कल्याण कोणीच रोखु शकत नाही. ते समजून घेण्या करीता आदर्श आणि प्रेरणा स्रोत समजून घेतले पाहिजे.वैशाख प्रोर्णिमा किंवा बुद्ध प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आरशा सारखी असते. ते समजून घेण्यासाठी धम्मात व धर्मात गुरु शिष्य परंमपरेला खुप महत्व आहे.एका गुरूच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या त्या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला.हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरु समोर हा आरसा धरला व गुरुच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुच्या अंतकरणात मोह,अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली,ज्यांना पूर्ण देवाचा दर्जा दिला त्यांच्या मनात ही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वाईट वाटले. तो गुरुना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.
     रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते.गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिता बरोबर हा प्रयोग करून पाहिला.त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले.शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन खूप राग आला व तो परत गुरुकुलातील गुरुंकडे धावला.गुरुपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात,हृदयात,अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच,काही ना काही दोष आहे.एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार,दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.गुरुनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग,द्वेष, अहंकार,क्रोध,माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,वत्साहा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू तर दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्वत:चे अवलोकन केले असते, तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते.याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे,कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.लक्षात ठेवा आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही.म्हणूनच ही वैशाख प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आरशा सारखी असते.
     भारतातील बुद्धाच्या धम्माचे ही असेच झाले बुद्धाने सांगितलेल्या धम्माचे पालन न करता ते इतरांच्या धर्मावर सतत टिका टिपणी करीत राहतात.बुद्धाच्या धम्मा बद्धल आलेला सकारात्मक विचार यांच्या आचरणातून व्यक्त होत नसल्यामुळे ते जगातील सर्व श्रेष्ठ धम्माला नकारात्मक दृष्टीने पाहतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली तथागतच्या बुद्ध धम्माची दिक्षा दिली.वैशाख प्रोर्णिमा किंवा बुद्धाच्या धम्माच्या प्रवचनाचा अर्थ समजु शकले नाही. आज ही ९० टक्के लोक पंचशिलेचे पालन करीत नाही. पंचशील म्हणजे काय?. हेच समजत नसेल तर अंमलात आणण्याचा प्रश्नच राहत नाही. त्यामुळेच आंबेडकरी समाजात टोकाचे विकार ठासुन भरले आहेत.त्यात कोणीच अशिक्षित किंवा सुशिक्षित माघार घेण्यास तयार नाही. म्हणुन बुद्ध प्रोर्णिमा व बुद्ध धम्माच्या शिकवणीचा आरसा प्रत्येका जवळ हवा आहे.तो हरविल्या मुळे मातृसंस्था,पिपल संस्था,समता सैनिक दल,रिपाई,बहुजन,वंचित, समिती,कृती समिती एकूण आंबेडकरी चळवळ भक्त्त आणि शिष्यात विखुरल्या गेल्या आहेत.नगरा नगरात हेच चित्र निर्माण झाले आहे. आज प्रत्येका कडे आरसा आहे पण तो त्यात स्वताचे प्रतिबिंब पाहत नाही. इतरा चे मात्र आवर्जुन पाहतो आणि भाष्य करतो.त्यात सत्य लिहण्याची बोलण्याची मांडण्याची हिंमत कोणी केल्यास त्यांचे परिणाम समाजात अतिशय वाईट होत आहेत.त्यामुळे कोणी बोलण्याची लिहण्याची हिंमत करीत नाही.पंचशील लागु होत नसेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्मा मधील कोणते विचार आम्हाला चालतील?. बुद्धाचे विचार आणि शिकवण आरसा सारखी सोबत ठेवावी लागेल.तरच भारत बौद्धमय होईल.त्यासाठी संघ शक्ती हवी.”संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षा, क्यो की संघ बडा बलवान.”
     भारत ही तथागत गौतम बुद्धाची जन्मभूमी आहे.बुद्धाचा जन्म कुठे झाला?.लिबूंनी!. ज्ञानप्राप्ती कुठे झाली?.गया बुद्धगया!. महानिर्वाण कुठे झाले ?.कुशीनगर!. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख प्रोर्णिमाला भारतात घडल्या त्यामुळेच त्यांचे भारताचे जागतिक पातळीवर खुप महत्व आहे. भारतातील मनुवादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी येथे तिचे वैशाख प्रोर्णिमाचे महत्व कितीही कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मानवतावादी विज्ञानवादी बौद्ध धम्माचा सिद्धांतावरून तथागत बुद्ध जगातील सर्वोत्तम महापुरुष मानव प्राण्यांचे मार्ग दाते ठरले.चीन,जपान,व्हियेतनाम, थायलंड,म्यानमार,श्रीलंका,सिंगापूर,अमेरिका,कंबोडिया,मलेशिया,नेपाळ, इंडोनेशियासह जगाच्या पाठीवर १८० देशातील बौद्ध धम्म मानणारे लोक हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतात. कारण त्यांच्या मैत्रीभावना संघ शक्ती कुठून कुठून भरलेली आहे.म्हणूनच ते म्हणतात.”संघ बडा बलवान,संघ करेगा सबकी रक्षा, क्यो की संघ बडा बलवान.”
    जगात ज्यांनी बुद्धाचा मानवतावादी विज्ञानवादी बौद्ध धम्माचा सिद्धांत समजून घेतला ते देश सर्व गोष्टीने वैभवशाली वैभवसंपन्न आहेत.बुद्ध प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आरशा सारखी असते.त्यात प्रत्येक मानवांनी आपली प्रतिमा पाहिलीच पाहिजे.तरच बुद्ध प्रोर्णिमा व बुद्धाची शिकवण आपल्याला समजून घेता येईल.

सर्वांचे मंगल हो!!!.
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,९९२०४०३८५९.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *