
विशेष प्रतिनिधी सोलापूर : बांधकाम कामगारांचा मौलिक अधिकार हिसकावून घेऊन आमदारांना खुश करण्याठी गठीत केलेली समितीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे जी.आर.जाळून शासनाच्या विरोधात घोषण-बाजी करत आंदोलन करण्यात आले.
बांधकाम कामगार,पेंटर,सुतार,वेल्डींग,प्लंबर,इलेक्ट्रीशीयन व इत्यादी कामगारांचे नोंदणी,नुतणीकरण व लाभाचे वाटप जलतगतीने करावे आणि वस्तू स्वरुपात कोणत्याही वस्तू न देता त्याऐवजी कामगारांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करावे आणि मंडळात नोंदणीकृत कामगार संघटनांची मदत घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला दिनांक १९ मार्च २०१८ रोजी दिले होते. त्याची अंमलबजावणी गेल्या ७ वर्षापासून न करता सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केले.
उद्योग,ऊर्जा,कामगार विभागाने दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय पारीत करुन प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक सनियंत्रण समिती व विभागीय कार्यालयात विभागीय सनियंत्रण समिती गठीत करुन सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून जाहीर केले आहे. कामगाराने नोंदणी, नुतणीकरण व लाभाचा अर्ज दाखल केल्यानंतर त्याची कागदपत्र पडताळणी ६ महिनेनंतर होईल.पूर्ण महिन्याभरात तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवरुन नोंदणी अधिकाऱ्यांच्या डेस्कवर पाठविण्यत आलेल्या अर्जाची यादी तयार करुन जिल्हा सनियंत्रण समितीसमोर ठेऊन पुढे कार्यवाहीसाठी विभागीय सनियंत्रण समितीकडे पाठवेल, आणि विभागीय समिती पुढील ९० दिवसांनी तो अर्जावर शिफारस करेल. या शासन निर्णयामुळे कामगाराला लाभ १० महिन्यानंतर मिळणार आहे. ही बाब नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन करणारी आहे.

पूर्वी सुविधाकार (शॉप इन्सपेक्टर), सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त नोंदणी अधिकारी होते. यात सुविधाकार यांची संख्या जास्त असल्यामुळे कामगारांचे लाभाचे प्रकरण ३ ते ४ महिन्यात प्रकरण निकाली काढून कामगारांना लाभ देण्यात येत होते. सुविधाकार यांची संख्या घटल्यामुळे कामगारांना लाभ अदा करण्यासाठी ९ ते १० महिन्याचा कालावधी जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या होळी आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद,सिध्दार्थ बोराडे, सायबण्णा तेगेळ्ळी,साथी छगन पंढरे,जे.एम.शिकलकर,कॉ.एजाज शेख,कॉ.ज्ञानेश्वर देशमुख,जब्बार पटेल,कॉ.जहीर शेख,शरणू गुडीयवरु,रफिक हणगी,संदीप भागवत, रियाज शेख,राजू जाधव,अरबाज बेपारी, सत्यशोधक कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष प्रदीप परकाळे,जिल्हा उपाध्यक्ष विजय शिकतोडे,जिल्हा युवक उपाध्यक्ष अजय माळी, जिल्हा सचिव विकास जावळे,जिल्हा सचिव मुबारक मणेरी जिल्हा सचिव इनुस खतीब,जिल्हा सचिव सचिन कोंडुभैरी जिल्हा सचिव,पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रवीण ताड,मंगळवेढा तालुका अध्यक्ष मसूद कळकुंब आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती महासंघाच्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
आपला,
कॉम्रेड एजाज शेख
मो.नं. 9096725838
