
“पाटील” ही गावाची जबाबदारी होती.आदिलशाही निजामशाहीत (क्षत्रिय)मराठा पाटील आणि (ब्राह्मण) कुलकर्णी या उच्चवर्णीय रयतेच्या शोषक अधिकाऱ्यांची वतने आणि गढ्या उध्वस्त करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्याची स्थापना केली.जहागिरदारी,वतनदारी नष्ट करणारे गरिबांचे मागास रयतेचे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या उच्चवर्णीय साहित्यिकांनी महाराष्ट्रात पोहचविले नाहीत.
कारण शूद्र अतिशूद्र रयतेला शिक्षण हिंदू धर्माने नाकारले होते.आम्हाला लिहिण्याचा बोलण्याचा अधिकार नव्हता.
महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपतींच्या समाधीचा शोध का लावला? स्वतःस क्षत्रिय म्हणणाऱ्या मराठा सरंजामी लोकांना हे संशोधन का जमले नाही?.त्याच प्रमाणे गोब्राम्हण प्रतिपालक म्हणजे शिवाजी महाराज आहेत.त्यांची समाधी शोधणे ब्राह्मण लोकांना जमले नाही?.जे आपल्या जातीस बुद्धिमान समजतात.एका शूद्र ओबीसी माळी महात्मा फुले यांनीच हा शोध का लावला?.उच्चवर्णीयांनी नेहमी विकृतीला संस्कृती म्हणून पुढे आणले.तेहतीस कोटी देवांच्या निर्मितीचे श्रेय घेणारे मनुस्मृती समर्थक पुरोहित आणि विषमता समर्थक तलवारीची साथ देणारे क्षत्रिय मराठे यांना छत्रपती शिवरायांची समाधी का दिसली नाही.?
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी देवांच्या श्रेष्ठतेचा फसवा सिद्धांत व छत्रपती शिवराय यांच्यातील रयतेचा महामानव उभा करून सागितला.समजाविला.”एका पारड्यात छत्रपती शिवरायांना बसवा.दुसऱ्या पारड्यात तेहतीस कोटी देव बसवा.” छत्रपती शिवरायांचे पारडे देवापेक्षा जड ठरेल.”शिवरायांसमोर देव हलके ठरतील.”
महात्मा फुले आणि प्रबोधनकार ठाकरे यांची मानवतावादी म्हणजेच,माणसाला देवापेक्षा महत्व देणारी विचारधारा, विषमता वादी मराठा ब्राह्मण साहित्यिकांनी संपविली.पुन्हा एकदा स्त्री शूद्रांती शूद्रांना आज गुलाम व्हावे लागत आहेत.“कुणबी शूद्र ओबीसी,बुद्धीने कमी असतात.” मराठा ब्राह्मण बुद्धीने श्रेष्ठ आहेत.हा मनुस्मृतीचा सिद्धांत नव्याने मांडणारे पानिपतकार विश्वास पाटील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत?.हे मागासवर्गीय साहित्यिकांची गुलामगिरी सिद्ध करणारी विषमता दर्शक घटना आहे.अर्थात सारेच पाटील एक नव्हेत.
कोकणात कुळ कायद्याने मिळालेल्या दहा वीस गुंठे जमिनीचे मालक कुणबी आगरी कोळी भंडारी यांना डॉ.बाबासाहेब आबेडकर आणि आगरी नेते नारायण नागू यांनी उभे केले.ते ब्राह्मण क्षत्रिय यांच्या जमीनदारी खोत सावकारी विरोधात लढूनच.याच शूद्र अतिशूद्र यांच्या जमीन मालकीच्या लढ्यातून आज ओबीसी तयार झाले.त्यातील एक नाव ओबीसी नेते म्हणजे दि बा पाटील.ज्यांनी स्वातंत्र्यानंतर मागास वर्गीयांच्या जमीन हक्क संघर्षात अर्थात मराठा ब्राह्मण यांच्या विरोधातील लढ्यात आपले सारे जीवन समर्पित केले.दोन वेळा खासदार चार वेळा आमदार झालेला हा महान आगरी ओबीसी नेता शासनाच्या सर्व पुरस्कार, मान सन्मान यापासून वंचित ठेवला गेला.या मागचे सत्य म्हणजे महाराष्ट्र शासन हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीयांचे आहे.त्यात आगरी कोळी कराडी भंडारी या ओबीसी नेत्यास शूद्र म्हणून आजही कमी लेखले जाते.
दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी ओबीसी नेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतलास देण्यासाठी हजारो चारचाकी वाहनांची भव्य रॅली भिवंडी ते जासई उरण पनवेल रायगड,अशी काढण्यात आली.भिवंडीचे आगरी ओबीसी खासदार सुरेश म्हात्रे, सुप्रसिद्ध (बाळ्या मामा)यांच्या नेतृत्वाखाली ती निघाली.राज्य आणि केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी ही घटना आहे.सर्वत्र या आंदोलनाचे कौतुक होत आहे.जरांगे पाटील यांच्या ओबीसी मध्ये घुसखोरी करणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनास हा मैदानी प्रतिवाद आहे.
मंडल आयोगाचे आंदोलन खासदार म्हणून राष्ट्रीय स्तरावर उभे करणारे महाराष्ट्रातील एकमेव “ओबीसी पाटील” म्हणजे दि बा पाटील होते.त्यांना छत्रपती शिवराय,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारातून तयार झालेले “समतावादी पाटील” म्हणता येईल.ओढून ताणून स्वतःस क्षत्रिय पाटील आणि आरक्षणासाठी पुन्हा कुणबी पाटील म्हणणाऱ्या जरांगे पाटील यांना पावसाळ्यात रंग बदलणाऱ्या बेडका सारखी,(मराठ्यांची शूद्र कुणबी) जात बदलावी लागते.?आरक्षण चळवळीतून समता विषमता ही शब्दावली महाराष्ट्राच्या मराठा ब्राह्मण विचारवंतानी गायब केली आहे.त्यांना साविधानिक समतेची भीती वाटतेय.?जो न्याय महाराष्ट्रातील रयतेला छत्रपतींनी दिला.तो न्याय तेहतीस कोटी देवाना देणे जमले नाही.कारण सारे देव मनुस्मृती समर्थक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे कायम समर्थक होते.आज आहेत.ओबीसी एससी एसटी यांना वर्तमान आरक्षण आंदोलनात लोकांना समजावणे,प्रबोधित करणे गरजेचे आहे.ओबीसी नेतृत्वाची आगरी नामावली खूप मोठी आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जरी नव्याने दिलेली ही लढवय्या वीरांची समता रूपी दीक्षा दुसऱ्या पिढीतील ॲड दत्ता पाटील (अलिबाग) आणि दि बा पाटील (उरण पनवेल) या जोडीने महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेतृत्व करून गाजविली.ती शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच.आज या ओबीसी नेत्यांचे पक्ष कुणी संपविले?अर्थात ब्राह्मण मराठा राज्यकर्त्यांनीच ना.?
महाराष्ट्र शासनातील फडणवीस,शिंदे,पवार या ब्राह्मण मराठा उच्चवर्णीय मानसिकतेतून ओबीसी आरक्षणात कुणबी दाखले देण्याचा GR काढण्याचे षडयंत्र हे केवळ ओबीसींचे नाही तर सामाजिक दृष्ट्या शोषित मागास एससी एसटी यांचे संविधानाने दिलेले समतेच्या तत्वावरील आरक्षण संपविण्याचे कारस्थान आहे.आज ओबीसी नेते दि बा पाटील असते तर एक राष्ट्रीय विचारवंत म्हणून बुद्ध चार्वाक महावीर त्यांनी आजच्या प्रा लक्ष्मण हाके.ॲड मंगेश ससाणे,मृणाल ढोले पाटील यांना सांगितला असता.तमाम ओबीसींचे नेतृत्व आपल्या मजबूत बाहू बलाने करताना.ब्रह्मदेवाच्या बाहुतून आम्ही जन्मलो.हा क्षत्रिय अहंकार जपणाऱ्या,क्षत्रिय मराठ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
समता परिषदेच्या माध्यमातून मा मंत्री छगन भुजबळ यांनी.आरक्षणाचे राजकीय मैदान गाजवले आहे.त्यांनाही ओबीसी नेते खासदार दि बा पाटील मार्गदर्शक ठरतील.इतिहास याची नोंद घेणार.आजही माळी कुणबी आगरी कोळी भंडारी कराडी धनगर या ओबीसी जाती फुले शाहू आंबेडकरी विचारांनी एक होत आहेत.ही पूर्वीच्या मुंबई परिसरातील ॲड जनार्दन पाटील.जगन्नाथ कोठेकर,दि बा पाटील आणि ॲड बाळासाहेब आंबेडकर समस्त आंबेडकरी चवळीतील लढाऊ कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे.समतेची चळवळ माझ्या घरी पहिल्यांदा आणली त्यात प्रा प्रेमरत्न चौकेकर,शाहीर संभाजी भगत आणि मागील वर्षी आमच्यातून निघून गेलेले इंजिनियर दिवंगत अशोक अंकुश सानपाडा नवी मुंबई यांचे योगदान आहे.
माझ्या व्यक्तिगत अनुभवाप्रमाणे आजच्या ओबीसी चळवळीला आंबेडकरी साहित्यिक,पत्रकार,गायक,शाहीर यांची गरज आहे.अलीकडे शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी हे गायक शाहीर म्हणून आपली भूमिका गाजवित आहेत.मागील वर्षी भाजपच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसी नेते दि बा पाटील यांचे आंदोलन गाजवले.अर्थात लोकसभा विधानसभा निवडणुका या नामकरण आंदोलनाच्या आश्वासनांना समोर ठेऊन जिंकल्या.आता नाव का मिळत नाही? यावर विकास पाटील या तरुण वकिलाने थेट उच्च न्यायालयाला प्रश्न विचारला.पुन्हा भिवंडीचे आगरी खासदार बाळ्या मामा यांनी अत्यंत दमदार,यशस्वी आंदोलन केले.
मागच्या भाजपच्या नेतृत्वाचा भरणा असलेल्या लोकांनी विमानतळ प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाला बगल देऊन आंदोलन केले.तसंच यावेळी कार रॅली मध्ये झाले.जरंग्या आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांच्यामुंबई वर चालून आला.तो ओबीसी मध्ये मराठ्यांची घुसखोरी करण्यासाठी.दोन्ही ठिकाणी आगरी कोळी ओबीसी लोकांवर शासकीय अन्याय होतोय.परंतु दोन्ही आंदोलनात प्रकल्पग्रस्त पुनर्वसन आणि ओबीसी आरक्षण धोक्यात असताना ? भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेकाप पुढाऱ्यांच्या या आदोलनात लोकनेते दि बा पाटील यांचा विचार पद्धतशीर डावलण्यात आला आहे.
ओबीसी तरुणांच्या पुढील शिक्षण आरक्षण पुनर्वसन उद्योग व्यवसाय सरकारी नोकऱ्या यांना “धोका” या भव्य दिव्य आंदोलन करण्या आडून तरुणांना देण्यात येत आहे.याच प्रमाणे ओबीसी आरक्षणातून मराठा लोकांना कुणबी दाखले देण्याचा GR ही, देवेंद्र फडणवीस ,एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी केलेली ओबीसींची फसवणूक आहे.अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार उद्धवजी ठाकरे,शेकाप हे ही प्रचंड मोठी रॅली लोकनेते दि बा पाटील यांच्या नावे काढतात.परंतु मराठा आरक्षण हे संविधान विरोधी असताना? ते ओबीसींचे आरक्षण संपविण्यासाठी आहे.हे सत्य ओबीसी आगरी कोळी कराडी समाज बांधवापासून का लपवता?.हा प्रश्न अत्यंत विनम्रपणे समस्त आगरी कोळी कराडी समाजाचे आगरी बाळ्या मामा या खासदार साहेबांना नम्रपणे विचारत आहे.
जय दि बा.
जय आगरी .
जय ओबीसी.राजाराम पाटील.८२८६०३१४६३,उरण,रायगड.

