कृतज्ञतापूर्ण संवेदना आणि विनंम्र अभिवादन “कमलाकांत वासूदेव चित्रे” यांच्या बाबासाहेबांना चळवळीत सक्रिय सहकार्य आणि इतर कार्य-कर्तृत्वाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

बातमी शेअर करा.

डॉ.आंबेडकरांच्या कार्यात मोठ्या सचोटीने व निःस्वार्थपणे तीस वर्षे कार्य केले.डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचे शैक्षणिक कार्याच्या रोपट्याचे विशाल वृक्षात रूपांतर करण्यासाठी कमलाकांत वासूदेव चित्रे यांनी जीवाचे रान केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत सहकारी कमलाकांत चित्रे हे होते.बाबासाहेबांनी जीवलग मित्र म्हणून अनेक प्रसंगातील सुख दुःखा बाबत पत्रं कमलाकांत चित्रे यांना लिहून सल्ला मसलत केली आहे” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी डॉ. शारदा कबीर यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्ली येथे नोंदणी पद्धतीने द्वितीय विवाह केला.”त्याप्रसंगी वधू डॉ.शारदा कबीर (माईसाहेब) यांच्या वतीने विवाहाचे साक्षीदार म्हणून कमलाकांत वासूदेव चित्रे यांनीआणि माईंचे बंधू वसंत कबीर सह्या केल्या होत्या.

“कमलाकांत वासुदेव चित्रे” यांचे दि.११ जूलै १९५७ साली वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले.कमलाकांत वासुदेव चित्रे (१८९४- १९५७) बाबासाहेबांचे जिवलग,निष्ठावंत, निकटचे सहकारी होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृशोद्धाराच्या चळवळीला आपले जीवन सर्वस्व वाहणारे जे काही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्पृश्य सहकारी होते त्यात कमलाकांत चित्रे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
कमलाकांत वासुदेव चित्रे यांचा जन्म १८९४ मध्ये कायस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला.मार्च १९२७ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक चळवळीच्या लढ्याची मुहूर्तमेढ महाड चवदार तळ्याचे पाणी पिऊन रोवली, तेव्हा पासून कमलाकांत वासुदेव चित्रे यांचा आंबेकरी चळवळीत सक्रिय सहभाग होता. ते मुंबई महापालिकेत टायपिस्ट म्हणून नोकरीस होते.नोकरी व घरप्रपंच सांभाळून जो काही फावला वेळ त्यांना लाभत होता तो चित्रे आंबेडकरांच्या समाज कार्यासाठी खर्च करीत.”समाज समता संघ” स्थापनेत कमलाकांत वासुदेव चित्रे यांचा पुढाकार होता.या समाज समता संघात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बरेच स्पृश्य सहकारी होते.या समाज समता संघाच्या माध्यमातून मुंबई आणि कोकणातल्या अस्पृश्य वस्त्यांमधून प्रचार,व्याख्यानांद्वारा अस्पृश्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे कार्य सुरू झाले. स्पृश्यांस्पृश्यांकडे आळीपाळीने सहभोजनांचे कार्यक्रम सुरू झाले. त्यात कमलाकांत वासूदेव चित्रे उत्साहाने सहभागी होत असत.


     २७ मे १९३५ रोजी रमाबाईंचे निधन झाले तेव्हा कमलाकांत वासूदेव चित्रे प्रेतयात्रेत बाबासाहेबांना धीर देत सहभागी झाले होते.१९३६ साली बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party) स्थापन केला. ७ ऑगस्ट १९३७ रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची सर्वसाधारण सभा नागपाडा, नेबरहूड हाऊस (मुंबई) येथे डॉ.आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाली.या सभेत कमलाकांत वासूदेव चित्रे यांना उपशाम गुरुजी समवेत पक्षाचे सहकार्यवाह तसेच संघटक म्हणून नेमण्यात आले.पुढे १९४२ साली नागपूर मुक्कामी डॉ.आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करून ‘शेड्युल कास्टस् फेडरेशन’ची स्थापना केल्याने डॉ.आंबेडकरांच्या स्पृश्य सहकाऱ्यांना प्रत्यक्ष शे.का.फे.मध्ये भाग घेता येत नसला तरी त्यांचा शे.का.फे.च्या वाटचालीत सक्रीय सहभाग होताच. याबाबत बाबासाहेब कमलाकांत वासूदेव चित्रे, दोंदे यांच्याशी सल्लामसलत करीत व हे स्पृश्य सहकारी जरी शे.का.फे.चे पदाधिकारी नसले तरी त्यांच्यावर पक्षाची अनेक कामे सोपवीत असत.
   १९४५ साली डॉ. आंबेडकरांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. व मुंबईत २० जून १९४६ पासून त्यांनी पी.ए.सोसायटीच्या अधिपत्याखाली सिद्धार्थ कॉलेज सुरू केले.डॉ.आंबेडकरांचे वास्तव्य दिल्लीत असल्याने कॉलेजची जबाबदारी त्यांनी कमलाकांत वासूदेव चित्रे,टिपणीस,चिटणीस,मोहिते गुरूजी, दोंदे व राव आदी आपल्या सहकाऱ्यांवर सोपविली.त्यावेळी कमलाकांत वासूदेव चित्रे दिवसा आपली महापालिकेतील नोकरी करून सायंकाळी सुटल्यावर ते सरळ सिद्धार्थ कॉलेजच्या हटमेंट (मरीन लाईन्स) मधील ऑफिसात रात्री उशिरापर्यंत बसून सिद्धार्थ कॉलेजचे कार्यालयीन कामकाज विनामूल्य करीत असत.डॉ.आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याची धुरा कमलाकांत वासूदेव चित्रे यांनी अत्यंत निष्ठेने,सचोटीने व समर्थपणे पेलली.पुढे कॉलेजचा व्याप वाढल्याने डॉ.बाबासाहेबआंबेडकरांनी कमलाकांत वासूदेव चित्रे यांना नोकरीचा राजीनामा द्यावयास लावून त्यांना संस्थेचे रजिस्ट्रार नेमले.पुढे संस्थेचा व्याप वाढत जाऊन मुंबईत तीन कॉलेजेस व रात्र शाळा तसेच औरंगाबादची कॉलेजेस व तत्सम इतर प्रकल्प आदीचे नियोजन, नियंत्रण व प्रशासन आदी जबाबदाऱ्या अगदी “तुटपुंज्या/ अत्यल्प पगारावर” समाधान मानून डॉ.आंबेडकरांवरील निष्ठेपोटी कमलाकांत चित्रे यांनी अखेरपर्यंत समर्थपणे पार पाडल्या.
१९५५ च्या सुमारास बाबासाहेबांच्या जवळच्या काही महत्त्वाकांक्षा असणाऱ्या सहकाऱ्यांनी कमलाकांत वासूदेव चित्र्यांबद्दल बाबासाहेबांचे मन कलुषित केले व चित्रे यांना खुलासा करण्याचीही संधी न देता कमलाकांत वासूदेव चित्रे यांना राजीनामा देण्यास भाग पाडले.ही अत्यंत वाईट गोष्ट घडली.परंतु डॉ.आंबेडकरांच्या कार्यात मोठ्या  सचोटीने व निःस्वार्थपणे तीस वर्षे कार्य केले.
    डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचे शैक्षणिक कार्याच्या रोपट्याचे विशाल वृक्षात रूपांतर करण्यासाठी कमलाकांत वासूदेव चित्रे यांनी जीवाचे रान केले आहे.त्या चित्र्यांवर राजीनामा देण्याची पाळी आल्याने ते खचले.तिकडे बाबासाहेब आंबेडकर अनेक आजाराने व व्याधीनी त्रस्त होते.कदाचित त्यामुळे बाबासाहब आंबेडकरांना या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालता आले नसल्याने चित्र्यांबाबत घेतलेला निर्णय योग्य नव्हता असे खेदाने वाटते, कमलाकांत वासूदेव चित्रे यांनी प्रचंड हाय खाल्ली.पुढे अर्धांगवायुच्या विकाराने त्यांचे मुंबईच्या के.ई.एम. हॉस्पिटलात दि.११ जूलै १९५७ साली वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले.

बाबासाहेबांचे निष्ठावंत समकालीन सहकारी (संदर्भ-संपादन.विजय सुरवाडे. समकालीन सहका-यांच्या आठवणीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पृ. १८१,१८२.) कमलाकांत वासूदेव चित्रे यांच्या बाबासाहेबांना चळवळीत सक्रिय सहकार्य आणि इतर कार्य-कर्तृत्वाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

डॉ. मिलिंद तायडे- 9960460895 नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *