सोपारा प्राचीन स्तुपावर प्रकाशयोजना व ऑडीओ गाईडचे अनावरण हा अविस्मरणीय कार्यक्रम साजरा.

बातमी शेअर करा.

पुढील वर्षात प्राचीन स्तुपाचा कायापालट करणार – डॉ.अभिजीत आंबेकर (मुख अधीक्षक)

विशेष प्रतिनिधी नालासोपारा – संपूर्ण विश्वाला ज्या सोपारा भूमीतून बुध्द मिळाला त्या ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या स्तुपाला केंद्र सरकारचे दुर्लक्ष करून त्याची दयनीय अवस्था झाली होती परंतु गेल्या दहा वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्था नालासोपारा पश्चिम या नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून या प्राचीन स्तुपाचे सुशोभीकरण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रूपेश जाधव व सचिव नरेश जाधव हे अनेकदा दिल्ली पर्यंत जाऊन हे काम यशस्वीपणे पूर्णत्वास जाईल याचा पाठपुरावा करीत होते.
     गुरुवार दिनांक २८ मे २०२६ हा दिवस बौध्द उपासकांसाठी अतिशय अविस्मरणीय ठरला याचे कारण म्हणजे भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण (मुंबई मंडळ) यांच्या वतीने सोपारा प्राचीन स्तुप येथे प्रकाशयोजना व संपूर्ण इतिहास कळावा या हेतूने ऑडिओ गाइडचे अनावरण प्रा.डॉ.सुरज पंडित व डॉ.अभिजीत आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशयोजना करण्यात आल्यामुळे प्राचीन स्तुप हा अतिशय सुंदर व आकर्षक दिसत होता.ऑडिओ गाइडमुळे अडीच हजार वर्षांपूर्वीचा संपूर्ण इतिहास जागृत होणार हे निर्विवाद सत्य आहे.
    या प्रसंगी प्रा.डाॅ.सुरज पंडित (उपप्राचार्य -साठ्ये महाविद्यालय) यांनी बौध्द कालीन इतिहास सांगितला,ज्यांच्या संकल्पनेतून हा अविस्मरणीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते डॉ.अभिजीत आंबेकर (मुख्य अधिक्षक)यांनी उपस्थित अनुयायांना काही वर्षात प्राचीन स्तुपाचा कायापालट करणार हे आश्वासन दिले शिवाय सचिव नरेश जाधव यांचा सातत्याने पाठपुरावा होता त्यांच्यासारखा कार्यकर्ता होता म्हणून हे काम गतीने सुरु झाले अशीही प्रशंसा केली. माजी अतिरिक्त महासंचालक टी. जे.अलोन यांनी या अतिशय सुंदर कार्यक्रमासाठी पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या डॉ. अंबेकर यांच्यासह संपूर्ण मुंबई टीमचे कौतुक केले,उपस्थितांना ऑनलाईन सदिच्छा दिल्या आणि खूप समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे एक आणखी आकर्षक म्हणजे भूमीपुत्र,सुवर्ण पुरूष रोहित पिसाळ हे उपस्थित होते त्यांनी ही अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.
   या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव नरेश जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, कार्याध्यक्ष किशोर काकडे, सहसचिव हरिश गायकवाड,उपाध्यक्ष संजयकुमार खैरे, कर्नल सिध्दार्थ बर्वे,प्रा.संध्याताई वैद्य,हिराबाई काकडे, अभिजीत खैरे,प्रभाकर जाधव,ऐ.जे.पवार,प्रतीक्षा जाधव,संजीवनी खैरे,सविता साळवी,रुपाली जाधव,कांबळेताई, बाबासाहेबांचे सहकारी सवादकर साहेब यांचे नातू विक्रांत व विजय सवादकर आणि पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाचे अनेक कर्मचारी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या या संकल्पनेचा सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.विशेष म्हणजे आयुनी सिध्दी हिने मराठी आणि इंग्रजीतून सुंदर सुत्रसंचलन केले.सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपुष्टात आला.

संजयकुमार खैरे- ९८३३५७९८९९ ,नालासोपारा यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *