विशेष प्रतिनिधी मुंबई- सामाजिक कार्यासोबत कर्तुत्वाचा सन्मान सेवा वृती पुरस्कार २०२५ वितरण सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे श्री संजय भाकरे संपादक सांज महानगरी,यांच्या अध्यक्षते खाली व रणधीर कांबळे कार्यकारी संपादक.नम्रता गायकवाड अभिनेत्री हिच्या विशेष उपस्थितीत सामाजिक उत्तरदायित्वचा सामाजिक कार्यासोबत कर्तुत्वाचा सन्मान सेवावृती महिला सन्मान पुरस्कार २०२५ ने श्रीमती शिरीन लोखंडे यांना सन्मानित करण्यात आले.

कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढविण्याची महाराष्ट्राला खूप मोठे परंपरा आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य म्हणून देशभरात ओळखल्या जाते. अनेक लढ्यानंतर इथल्या कामगारांनी आपले हक्क मिळवलेत. सध्याच्या बदलत्या नागरी जगण्यात कामगारांचे ते हक्क शाबूत राहतील काय असा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही. असे वातावरण शहरांमध्ये आपल्याला दिसते, मात्र अनेक सामाजिक जाणीव ठेवून इथल्या कायद्याच्या आधारे कामगारांना न्याय देण्याचे व्रत अनेक शासकीय अधिकारी ईमाने इतबरे करत असतात. त्यात सह कामगार आयुक्त माननीय श्रीमती शिरीन लोखंडे मॅडम यांच्या नावाचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. कारण ते आंबेडकरी विचारांच्या चळवळीतील एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जातात आणि आंबेडकरी विचारांचा अधिकारी हा जात,धर्म प्रांत न पाहता सर्वच समाजाच्या कामगारांना समान न्याय हक्क,अधिकार मिळवून देण्यासाठी नियमितपणे प्रबोधन करण्यासाठी त्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा असतो. महिला कामगार अधिकारी म्हणून आपल्या कामाची सुरुवात करणाऱ्या शिरीन लोखंडे मॅडम यांनी कामगारांना कायद्याचा सक्षमपणे अंमलबजावणी करत न्याय मिळवून दिलाय.बांधकाम मजूर असो की घरेलू कामगार असोत त्यांच्या विशेष असे कामगार कायद्याचे संरक्षण नव्हते,अशा कामगारांसाठी केंद्र सरकारने कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिरीन लोखंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत न्याय मिळवून त्याच बरोबर बाल कामगार कुठल्याही आस्थापनात,कारखान्यात राहणार नाहीत. याची कायद्याने ग्वाही दिली आहे. मात्र तरी ही समाजातील अनेक उद्योजक,कारखानदार यातून पळवाट काढत बाल कामगारांकडून काम करून घेतात. अशा एक हजार बाल कामगारांची सुटका शिरीन लोखंडे मॅडम यांनी कामगार अधिकारी म्हणून केली आहे.

मुंबईच्या विकासात इथल्या गिरणी कामगारांच्या कष्टाचा फार मोठा वाटा आहे. मात्र त्यांना या शहरातून गिरण्या बंद पडल्यानंतर बेदखल व्हावे लागले.मात्र त्यांना या शहरातून बाहेर पडू नये यासाठी कापड गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांना घरे बांधून देण्याचा निर्णय सरकारने घेतला.अनेक गिरणी मालक यासाठी सहजा सहजी राजी नव्हते ,मात्र मुंबईत २५ हजार गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यात शिरीन लोखंडे मॅडम यांचा कामगार सह आयुक्त या नात्याने सिंहाचा वाटा आहे. शासकीय अधिकारी पदावर असतांनाही त्यांनी सामाजिक बांधीलकीशी कधी ही तडजोड केली नाही. उलट रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर,सामाजिक विषयावरील व्याख्याने यावर त्यांनी भर देत आपली बांधिलकी कायम ठेवली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत सांज महानगरी च्या वतीने सन्मान चिन्ह प्रमाण पत्र देऊन सेवावृती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
