समाजातील तरुणांनी आर्थिक उत्पन्नाचे साधन संसाधन निर्माण करण्याचा संकल्प करावा!

बातमी शेअर करा.

माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती.

समाजातील तरुणांनी आर्थिक उत्पन्नाचे साधन संसाधन निर्माण करण्याचा संकल्प करावा!

  विश्वकर्मीय राज्यस्तरीय सुतार समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी,कष्टकरी युवकांनी स्वतःच्या भविष्याचा विचार करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्या कलागुणांनुसार आणि आवडीनुसार आर्थिक उत्पनाचे साधन संसाधन निर्माण करण्यासाठीच प्रयत्न करावा आणि त्यासाठी उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयत्न करावा.आपल्या क्षमतेनुसार एखादी नोकरी करावी आणि आपलं भविष्य उज्वल करण्याकडे जास्तीतजास्त लक्ष केंद्रित करावे आजचा युवक समाजाचे भविष्य आहे युवकांनी आपलं करियर घडविण्याला जास्त प्राधान्य द्यावे आणि आपल्या कुटुंबाची आपल्या आईवडीलांची काळजी घ्यावी कोणाचाही उदोउदो जयजयकार करण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही कोणाच्याही मागे मागे फिरण्यात आपला वेळ,शैक्षणिक गुणवत्ता आणि ऊर्जा वाया घालवू नये आणि तरुणांनी स्वतःच्या उन्नतीचे,आपल्या प्रगतीचे मार्ग शोधावे.

    विश्वकर्मीय सुतार समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा गवगवा करणाऱ्या असंख्य सामाजिक संघटना कार्यरत असतील आणि याच संघटनांच्या माध्यमातून समाजात अनेक दिग्गज समाज नेते आणि अनेक युवक नेतृत्व म्हणून उदयास येत असतील अर्थात विश्वकर्मीय सुतार समाजाच्या नावाचा उपयोग केल्याशिवाय समाजात तथाकथित कर्तबगार,कर्तृत्ववान,कार्यसम्राट आणि धडाकेबाज म्हणवून घेणारे नेतृत्व म्हणून समाजात मिरवता येत नाही समाजाच्या नावाचा वापर करून जर समाजात तथाकथित पुढारपण आणि स्वयंघोषित नेतेगिरीचा गवगवा होत असेल तर मग याच तथाकथित स्वयंघोषित पुढाऱ्यांनी बहाद्दर नेत्यांनी सामाजिक सर्वांगीण विकासासाठी असे कोणते विकासात्मक दिवे लावले आहेत कि,समाजात मोठ्या दिमाखात,आवेशात पुढारपण करतात? 

    समाजात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी लागणारे उद्योग व्यवसाय उभारणी करण्यासाठी आजपर्यंत कोणत्या तथाकथित दिग्गज पुढाऱ्यांनी आणि तथाकथित युवक नेत्यांनी कोणते प्रयत्न केले आणि राज्यातील तळागाळातील उपेक्षित खेड्यातील कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार युवकांना आणि आर्थिक परिस्थितीमुळे कमकुवत महिलांना कोणत्या पुढाऱ्यांनी किती किती हजार उद्योग व्यवसाय उभारणी करून समाजात आर्थिक सुबत्ता निर्माण करून आमचा एकच ध्यास सामाजिक सर्वांगीण विकास एकच उद्दिष्ट संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास हे नेहमीचे आवडीचे सुंदर छान छान हवेहवेसे वाटणारे गोडगोड वाटणारे सुबक ब्रीदवाक्य खरं करून दाखविले आहे यावर आपण सर्वांनी आत्मपरीक्षण समाज चिंतन विचार मंथन समीक्षा आणि चिकित्सा करण्याची गरज आहे.

     विश्वकर्मीय राज्यस्तरीय सुतार समाजाची लोकसंख्या नेमकी किती लाख असेल याची खरी आकडेवारी समाजातील कोणत्याही सामाजिक संघटना अथवा कोणत्याही स्वयंघोषित पुढाऱ्यांकडे नाही कारण राज्यातील घरोघरी जाऊन समाजाची जनगणना आजपर्यंत कोणत्याही संघटना अथवा कोणत्याही तथाकथित पुढाऱ्यांनी कधीही केलेली नाही आणि विशेषतः देशात जातीनिहाय जनगणना झालेली नाही त्यामुळे सरकारी अहवाल प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे समाजाच्या लोकसंख्येच्या बाबतीत समाजाने कोणत्याही संघटना अथवा स्वयंघोषित पुढाऱ्यांवर अजिबात विश्वास ठेवू नये समाजाच्या लोकसंख्येचा आकडा कोणीही थातुरमातुर आपल्या मर्जीनेच जाहीर करीत असेल तर ती समाजाची निव्वळ दिशाभूल ठरणारी आहे.

   समाजातील सर्वच घटकांचा समावेश असलेल्या तरुणांनी आपल्या शिक्षणावर आपल्या आर्थिक उत्पनाचे साधन संसाधन निर्माण करण्याकडेच अर्थात आपलं स्वतःचं करिअर घडविण्याकडेच आपलं लक्ष केंद्रित करावे आपल्या कुटुंबासाठी आपल्या आईवडीलांसाठी वेळ द्यावा त्यांची सेवा करावी आईवडीलांची काळजी घ्यावी कारण आपले जन्मदाते आईवडील हेच तर आपलं सर्वस्व आहे आपल्या मुलांची काळजी आपल्या आईवडीलांनाच असते कारण आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी आपल्या जन्मदाते आईवडीलांनाच असते आपल्या आईवडीलांपेक्षा कोणीही मोठा नाही आईवडील हेच आपले आधारस्तंभ आणि मार्गदर्शक असतात.

    समाजातील तरुणांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत असते सुशिक्षित,उच्चशिक्षित, बुद्धिवान विद्वान आणि हुशार असतात,स्वाभिमानी असतात तसेच चिकित्सक पध्दतीनेच अवलोकन करणारे आणि समजदार असतात.तरुणांना कोणाच्याही मागे मागे पुढे पुढे करण्याची लाजिरवाणी सवय नसते कोणाचीही बिनकामी हांजी हांजी आणि उदोउदो जयजयकार करण्याची मात्र सुद्धा सवय अजिबात नसते.युवकांना गुलामगिरीच्या जाळ्यात अडकणे लाचारीच्या बेड्यात अडकणे अजिबात पटत नसते स्वतंत्र आणि स्वाभिमानाने जगण्याची धमक आणि धारिष्ट्य,धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असते.

  विश्वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रात समाजाच्या नावाने राज्यस्तरीय नामकरणाचा मुकूट चढवून असंख्य संघटना स्थापन करून पदांची खैरात करून अनेक दिग्गज समाज नेते पुढारी आणि धडाकेबाज युवक नेतृत्व उदयास येतील आणि समाजात विविध विभागात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमात सुशोभित मंचावर समाजाचे कर्तबगार कर्तृत्ववान महान कार्यसम्राट धडाकेबाज समाज नेतृत्व,पुढारी म्हणूनच मोठ्या दिमाखात हसतखेळत मानसन्मान पदरात पाडून घेतील.

   याच तथाकथित स्वयंघोषित पुढाऱ्यांनी बहाद्दर नेत्यांनी त्यांच्या खऱ्या खोट्या समाज नेतृत्वाखाली त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या गृह जिल्ह्यातील आणि राज्यातील कानाकोपऱ्यातील तळागाळातील उपेक्षित खेड्यातील कष्टकरी सर्वसामान्य समाज बांधवांना सुशिक्षित बेरोजगार तरुणांना किती हजार उद्योग व्यवसाय उभारणी करून जगात नवा उच्चांक गाठला याची सत्यावर आधारित माहिती कोणालाही अजिबात जाहीर करता येणार नाही तथाकथित स्वयंघोषित पुढाऱ्यांकडे उद्योग व्यवसाय रोजगार निर्मिती करण्यासाठी कोणताही अजेंडा नाही नियोजन नाही कृतीआराखडा नाही आपण त्यालाच उच्चशिक्षित लोकं इंग्रजी मध्ये planning and action plan असं म्हणतात.

    विश्वकर्मीय राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाजात मोठ्या दिमाखात पुढारपण करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित नेत्यांनी त्यांची विधायक कर्तबगारी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण राज्यातील कानाकोपऱ्यातील लाखोंच्या संख्येने सुतार समाज बांधवांच्या उपस्थितीत जाहीर करावी.सामाजिक सर्वांगीण विकासाच्या बाबतीत अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी वैचारिक पात्रता,गुणधर्म आणि क्षमता धडाकेबाज धाडसी निर्णय घेण्याचे मोठे धाडस नाही.विश्वकर्मीय सुतार समाज ओबीसी प्रवर्गातील मोठा ओबीसी घटक असतांना सुद्धा ओबीसी आरक्षण जनगणना इत्यादी संदर्भात मात्र समाजात समाज जागृती समाज प्रबोधन करण्याची पात्रता नाही.शिवाय ओबीसी सुतार समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी राजकीय हिस्सेदारी राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी समाजातील कोणताही तथाकथित स्वयंघोषित पुढारी पुढाकार घेण्यासाठी धजावत नाही राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाजात हिच सत्य परिस्थिती आहे मी तर्कशुद्ध मुद्देसूद लोकशाही पध्दतीने खुलासा करण्यास सुद्धा तयार असतो.

    कर्तृत्ववान कर्तबगार कार्यसम्राट बुद्धिवान तरुणांना आर्थिक उत्पन्नाचे साधन संसाधन निर्माण करण्याची आवड असते विशेषतः विज्ञानाच्या सहाय्याने आधुनिकतेची जोड असल्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे त्याचा उपयोग घेऊन विविध क्षेत्रात प्रगतीचा मार्ग सापडतो यात दुमत नाही कारण युवकांना आपल्या भविष्याची सुद्धा काळजी असते त्यासाठी तरुणांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो धावपळ,धडपड आणि फार कष्ट,मेहनत करावी लागते त्यासाठीच सांगावेसे वाटते कि,विश्वकर्मीय सुतार समाजातील तरुणांनी आपला विकास करण्यासाठी आपले स्वतःचे आर्थिक उत्पन्न निर्माण करण्याचा संकल्प करावा.

 प्रमोद सूर्यवंशी ८६०५५६९५२१.चिखली मातृतीर्थ बुलडाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *