विसाव्या शतकातील एक महान क्रांतीकारक,महान समाज सुधारक,तत्ववेत्ता ज्ञानाचा महासागर म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विलक्षण व्यक्तीमत्व आत्मतेज नी प्रकांड पांडीत्य पाहुन भले-भले दिपले नी नतमस्तक झाले. त्यांच्या महान कार्याची दखल केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील विद्वानांनी, समाजसुधारकांनी आणि संशोधकांनी घेऊन संपुर्ण जग पुढची अनेक शतके घेईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलीतांचे नव्हे तर जगातील संपुर्ण शोषीतांचे विद्यार्थ्यांचे व समाजसुधारकांचे प्रेरणास्थान आहेत.आज भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झालेली असुन देशाचा सर्वांगीण विकास होऊन देश प्रगतीपथाकडे कुच करीत असतांना अद्याय कोणत्याच क्षेत्रात कोणतीच कमतरता वा जाणीव भासली नाही भारतीय संविधान हे विज्ञानावर आधारित असुन अंधश्रध्देला थारा नाही.भारतात नांदणारी विविधता विवीध भाषा,विवीध धर्म,पंथ,वंश विवीध जाती यांच्यातील वेगवेगळ्या श्रद्धा,उपासना चालीरीती परंपरा यांचा यथायोग्य आदर करून त्यांचे संवर्धत करुन राष्ट्राला शांतताप्रीय मार्गाने प्रगती पथावर नेण्याचा महान मार्ग म्हणजेच भारतीय संविधान भारताला संविधान बहाल करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.मी लिहीलेली घटना ही जगातील सर्वात मोठी माणि सर्वश्रेष्ठ घटना असून तिला जगात तोड नाही.पण ही घटना कीतीही महान असली तरी अंमलबजावणी करणारे लोक लायक असतील तर जगातील इतर कोणताही देश भारताची बराबरी करणार नाही.अंमलबजावणी करणारे लोक नालायक असतील तर ही घटना कुचकामी उरेल.
भारताला संविधान देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचनावजा इशारे ही दिलेले आहेत ते म्हणतात की “लोकशाहीचे खरे व्याकरण अवगत झाल्याशिवाय समता,स्वातंत्र्य भाणि न्यायाची भाषा बोलता येणार नाही तसेच या देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हायची असेल तर सरकार व जनता उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि निती याचे पालन करणे आवश्यक आहे.” मग घटनेतील संकेताचे आणि निती नियमाचे सरकार आणि जनतेकडुन पालन होते का? हा संशोधनाचा विषय पण त्यावर संशोधन करण्याची नैतीकता कोण स्वीकारेल डॉ.बाबासाहेबांनी भारताला महानतेच्या सर्वोच्च स्थानावर पोहचविल्यामुळेच अभिमानाने ‘मेरा भारत महान’ म्हटले जाते. इतर कोणताच देश मेरा अमेरीका महान,मेरा जपान महान,मेरा पाकीस्थान महान असे म्हणतांना दिसत नाही.कारण त्यांच्याकडे दुसरे डॉ.बाबासाहेब नाहीत पण तरीही जगातल्या अनेक देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून त्यांचे विचार आत्मसात करून प्रगती पथावर अग्रेसर आहेत.आपण मात्र संशोधनाच्या नावाखाली विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून स्वतःला धन्य मानतो,पण कोहीनुर हिरयाला मातीत टाकले म्हणुन त्याची कींमत वा तेज कधीच कमी होत नाही.याचा विसर काही लोकांना पडलेला आहे.राजकीय जिवनात समता आणि आर्थिक व सामाजीक जिवनात विषमता असेल तर राजकीय लोकशाहीचा डोलारा कोसळेल नव्हे शोषीत लोकच तो उध्वस्त करतील असा इशारा अगोदरच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे.तसेच भारत स्वातंत्र्य होण्यानेच सर्व कार्यभाग साधेल असे नाही.भारत हे असे राष्ट्र बनले पाहिजे की,ज्यात प्रत्येक नागरीकाला धार्मीक,आर्थीक आणि राजकीय हक्क सारखे असुन व्यक्ती विकासाला प्रत्येक नागरीकाला वाव मिळेल.इंग्रजी राज्यांविरुद्ध घेतलेला आक्षेप ब्राम्हणांच्याच्या मुखात एक पटीने शोभतो तोच आक्षेप ब्राम्हणी राज्याविरुद्ध एखादया बहीष्कृताने घेतल्यास हजार पटीने शोभेल असे परखड मत मांडणारे आणि संपूर्ण भारताची जडण- घडण करून प्रत्येकाला माना-पानाचे आणि समतेचे-ममतेचे स्वराज्य निर्माण करून देणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा गुण-गौरव कमी आणि ज्या ‘भगवान’ ला कोणी कधीच पाहीले नाही त्याचा महीमा सांगण्याचा खटाटोप होतांना दिसत आहे.
डॉ.बाबासाहेबांनी या देशातील जातीयता,विषमता,बुवाबाजी आणि अंधश्रद्धा यांना देशाबाहेर हाकलून देवून बुद्धाने सांगीतलेल्या समता,स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची जोपासना केली.पण काही स्वार्थाने बरबटलेल्या ढोंगी लोकांनी संधी साधुनी जातीयता, उच-नियता,विषमता,अंधश्रद्धा यांना पुन्हा भारतात येण्याचे आग्रही आमंत्रण दिलेले आहे.तशी वातावरण निर्मीती करून आगमनाची तयारी जोरात चालू आहे,जातीयता, विषमता अंधश्रद्धा या भुतांनीही आमंत्रणाला होकार देऊन भारताकडे प्रस्थान केलेले आहे. ते केव्हाही दाखलं होवुन मानवतेचा नाश करून संपुर्ण देशाची सुत्रेच आपल्या हातात घेणार मग ज्या भगवानला कोणी कधीही,कोठेही प्रत्यक्ष पाहिले नाही त्याला ‘भारतरत्न ‘हा बहुमान मिळेल यात काही शंकाच नाही.
देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत असतांना महात्मा गांधीनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या स्वातंत्र्याचे काही सुतोवाच नाही असा आरोप केल्यावर त्यांना प्रत्युत्तर देतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘मिस्टर गांधी नुसतं तुरुगांत जाणं म्हणजे राष्ट्रीयत्व असेल तर माझं काहीही म्हणणे नाही.परंतु भारताच्या स्वराज्याची मागणी ज्या-ज्या वेळेस आली त्या-त्या वेळेस मी तुमच्याही पुढे होतो.हो माझी आत्मप्रौढी नव्हे हा गोलमेज परिषदेचा इतिहास आहे.इंग्रजांच्या देशात जाऊन त्यांना सडे-तोड उत्तरे देवून भारताच्या स्वाज्याची मागणी तुमच्याही अगोदर मीच केलेली आहे.अशाप्रकारे भारताच्या स्वातंत्याच्या वाटाघाटी इंग्रजानी भारताचे प्रतीनीधी म्हणून गोलमेज परीषदांच्या निमीत्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करून स्वतंत्र भारताच्या घटनेच्या निर्मीतीसाठीही इंग्रजानीय डॉ.बाबासाहेबांचे नाव सुचविले होते हा इतिहास आहे.
भारताच्या घटना निर्मीतेचे महान कार्य ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्विकारून जगातील सर्वात मोठी व सर्वश्रेष्ठ घटना बनवुन भारताला महानतेचा दर्जा प्राप्त करुन दिला.भारताची घटना निर्मातीचे महान कार्य करीत असताना डॉ.बाबासाहेबांची प्रकृती खालावलेली होती.त्यांना विवीध व्याधीनी घेरले होते. त्यांना पंडुरोग झाला होता पण अशाही परिस्थीतीत या निश्चयाच्या महामेरुने आपल्या प्रकृतीची थोडीही पर्वा न करता भारताची राज्यघटना 395 कलम, 8 परीशीष्ट व 22 भागाची जगातील सर्वात मोठी घटना पुर्ण केली. यावरून डॉ.बाबासाहेबाचे देशाप्रती असलेले जिवापाड प्रेम होते हेच सिद्ध होते.ते खरे देशभक्त होते याची साक्ष साऱ्या जगाचा इतिहास देत आहे. आताचे काही दोंगी मतलकी देशभक्तीचा आव आणुन आपल्या स्वार्थासाठी संपूर्ण देशच विकु पाहत आहेत.देशात अंधश्रध्देचे थैमान माजवु पाहत आहेत.या स्वयंघोषीत बनावट देशभक्तांना आपण कधीच मरणार नाही,आपण अमरच आहोत असे वाटत आहे. देशाचे वाटोळे केल्यानेच आपल्याला पुढील सतरा जन्माचे स्वर्ग मिळतील.अशा ढोंगी देशभक्तांना सांगावेसे वाटते की त्यांनी वास्तविकतेचे भान ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतलेल्या मार्गावर आरूढ घेऊन भारतीय संविधानानुसार मार्गक्रमण केलो आणि देशातील संपुर्ण मानवजातीला समता,स्वातंत्र्य,बघुता व न्याय प्रदान करुन प्रत्येकाच्या हक्कांचे,अधिकारांचे रक्षण करून सर्वांना समान संधी,समान न्यायाची प्रतीष्ठापना केली तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच तुमचीही लोकं पुजा करतील, तुमचेही फोटो प्रत्येक घरा घरात दिसतील मग लोकांना दुसऱ्या कोण्या देवाची गरजनच राहणार नाही कारण तुम्हीच देव बनाल आपण ज्या देशात जन्मलो त्या देशाचे आपण काहीतरी देणं लागतो अशी भावना जावेळेस तुमच्यात उत्पन्न होईल त्यावेळी तुमच्यातील सद्वर्तन,सदाचार आणि नैतीक दर्जा आपोआपच वाढीस लागेल.जे काही करायचे असेल ते याच जन्मात करायचे कारण पुन्हा दुसरा जन्म नाही हे वास्तव प्रत्येकाने स्वीकारले तर प्रत्येकाच्या हातुन चांगलेच कार्य होईल जर का आणखी जन्म आणि स्वर्ग आहेत या भावनेला जर का आपण चिकटून राहला तर आपल्यातील सद्वर्तन नाहीसे होवुन माणूस माणसाविषयी मुळीच सहानुभूती बाळगणार नाही परस्वरांवर प्रेम करणार नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान अहोरात्र परीश्रम घेऊन 2 वर्षे, 1महीने,18 दिवसात पूर्ण केले.त्यावेळेस कोणत्याच देशाच्या कोणत्याच घटनेचे कोणतेच ज्ञान नसलेलय विरोधकांनी खुप वेळ लागल्याची टीका केली होती.वास्तवीक पाहता ऑस्ट्रेलीयाच्या घटनेचा आपण सारासार विचार केला तर भारताचीच घटना बनविण्यास साधारणता 26 वर्षे अपेक्षीत असतांना केवळ तिनच वर्षात घटना पूर्ण करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कुणीही स्तुतीसुमनाचे फुले उधळली नाही.कॅनडाला 147 कलमाची घटना बनविण्यासाठी 2 वर्षे,5 महीने लागलीत अमेरिकन घटनेचे शिल्पकार थॉमस जेफरसन यांनी सर्वात लहान घटना फक्त 7 कलमांची 4 महिन्यात पूर्ण केली ऑस्ट्रेलीयाची 128 कलमाची घटना बनविण्यास 8 वर्षे 9 महीने लागलेत मग आपली घटना सर्वात मोठी व सर्वश्रेष्ठ अल्पावधीतच लिहुन या ज्ञानाच्या महासागरने देशाच्या प्रत्येक नागरीकांचे हीत साधले हजारो वर्षापासून अन्याय अत्याचाराच्या गर्तेत पीचत पडलेल्या अस्पृश्यांना गुलामांना आणि देशातील तमाम स्त्रीयांना बाहेर काढून त्यांना स्वाभीमानाचे जगने बहाल केले याची साक्ष साऱ्या जगाचा इतिहास देत आहे. म्हणुनच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी केवळ देवच नाही तर देवापेक्षाही मोठे स्थान देवून स्वतःच्या जन्मदात्या आई-बापाची पुजा न करता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचीच पूजा करतात.देवाऐवजी बाबासाहेबांनाच शरण जातात नतमस्तक होतात.अख्खी संसदच ज्या महामानवाची देण आहे त्या महामानवाची,त्यांच्या कार्याची,त्यांच्या योगदानाची चर्चा संसदेमध्ये होणारच त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख होणारच ही बाब मा.गृहमंत्री अमीत शहा यांना खटकणे म्हणजे त्यांचे डॉ.बाबासाहेबाबद्दल चे विचार काय आहेत हे सांगण्याची गरज नाही. त्यांचे विचार काहीही असोत ज्ञानाच्या अथांग महासागरात एक थेंब विषाचा टाकला म्हणून त्या महासागराचे महत्व कमी होत नाही,की त्याचे स्वरूप बदलत नाही संसदेमध्ये आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर ऐवजी भगवान म्हटले असते तर पुढील सात जन्माचे स्वर्ग प्राप्त झाले असते.असे विधान करणारे मा.गृहमंत्री अमीर शहा हे विज्ञानयुगातही अंधश्रद्धेच्या युगात जगत आहेत. संविधान सभेची पहिलीच सभा कोणाच्या नावाने सुरु करण्यात आली याची माहिती नसल्यामुळेच त्यांनी वरील विधान केले.भारतीय संविधानाच्या पहील्याच सभेला सुरुवात कशी करायची असा मुद्दा उपस्थथित झाला तेव्हा. मौलाना हजरत मोहली यांनी ‘अल्लाह’ च्या नावाने सुरवात करा तर पंडीत मदन मोहन यांनी “ॐ नमः शिवाय ” ने सुरात करण्याचे सुचविले एच.पी.कामत यांनी ‘भगवान ” या नावाने करा असे सुचविले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “लोकांच्या” नावाने सुरवात कारावी कारण संविधानाची सुरवातही ‘आम्ही भारताचे लोक’ अशी झालेली आहे.मग यावर मतदान घेण्यात आले तेव्हा भगवान किती मताने हरले होते. हे मा.गृहमंत्री अमीत शहा यांना माहिती घ्यावी. ही माहिती असती तर त्यांनी संविधान सभेमध्ये हारलेल्या भगवानच्या नावाचा हटटहास केलाच नसता.भारताच्या जडण- घडण मध्ये किंवा भारतीय संविधानात भगवानचे कोणतेच योगदान नाही.भारतीय संविधान हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीले आहे.भगवान ने नाही, जो भगवान देशाला संविधान देवु शकत नाही तो स्वर्ग कसा काय देईल?.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मीती करतांना इंग्लंड,अमेरीका,आस्ट्रेलीया,कॅनडा,दक्षिण अफ्रीका, आयर्लंड अशा अनेक देशाच्या राज्य घटनेचा सखोल अभ्यास करणारे जगातील एकमेव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत भगवान नाही,बॅचलर ऑफ आर्ट, मास्टर ऑफ आर्ट,मास्टर ऑफ सायन्स,डॉक्टर ऑफ फिलॉसफी,डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ लॉ डॉ.ऑफ लीटरेचर,बॅटरीस्टर ॲट लॉ अशा प्रकारच्या देश-विदेशात मानाच्या पदव्या घेणारे जगातील एकमेव प्रकांड पंडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत भगवान नाही.लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीक्स मध्ये 8 वर्षाचा अभासक्रम फक्त 3 वर्षात पूर्ण करणारे आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनेच्या कालावधीनुसार भारताची जगातील सर्वात मोठी घटना बनविण्यास साधारणला 26 वर्षाचा कालावधी लागणार होता पण या ज्ञानाच्या महासागराने फक्त 3 वर्षाच्या आतच भारताची घटना पूर्ण केली ते जगातील प्रथम आणि शेवटचे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.भगवान नाही.संसदेमध्ये महार वतन बिल,हिंदू कोड बिल,खोत बिल,रोजगार विनीमय सेवा बिल,भविष्य निर्वाह निधी बिल आणि गृहमंत्री महोदय तुमच्या वेतनाचे बिल ही तुमच्या भगवानने नाही आमच्या बाबांनी सादर केले. तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला शरण जाऊन जरा स्वतःलाच विचारा की तुम्ही संसदेत कोणाच्या पुण्याईने गेले. तुम्ही आज जे वेतन घेत आहात ते कोणाच्या पुण्याईने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या की तुमच्या भगवानच्या. याचे उत्तर देण्याची उदारता दाखवाल का ? जर का या देशाची घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलीच नसती तर तुम्ही देशाचे गृहमंत्री झालेच नसते.हे सत्य कोणीही नाकारुन शकत नाही.
डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या ज्ञानाच्या जोरावरच तुम्ही मंत्री आलात,देशाची सुत्रे हाती घेतलेली आहेत तरीही अंधश्रध्देच्या आहारी जावुन इतरांना सात जन्माच्या स्वर्गाचे आमीष दाखवित तुम्ही इतिहासाची चक्रे उलट्या दिशेने फिरवुन अज्ञानाकडे चला,जनावरांना माणसापेक्षा श्रेष्ठ माना असा संदेश सांगत सुटला आहात.अन्यायाला परंपरा नाही तो चालत आला आहे म्हणून तो पुढेही चालत रहावा आणि माणसा-माणसामध्ये भेद निर्माण करून धर्माच्या नावाखाली वरचा वर्ग आणि खालचा वर्ग तयार करून खालच्या वर्गातला माणूस मग तो कीतीही लायक असो त्याला वरच्या वर्गात प्रवेश नाही.आणि वरच्या वर्गातला माणुस मग,तो कितीही नालायक असो त्याने कितीही मोठा गंभीर गुन्हा केला तरी त्याला कोणत्याच शिक्षेचे प्रावधान नाही.त्यामुळे त्याला खालच्या वर्गात लोटुन देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी विचारसरणी व तत्वप्रणाली केवळ रानवट माणसाचीच असु शकते.असला माणूस वरून देशाचा मित्र वाटत असला तरी तो शत्रुच असतो. दगडाला देव मानून भगवान मानुन आपल्या उध्दाराचा संपुर्ण भार त्याच्यावर टाकायचा ही भावना कर्तव्य परडमुख करणारी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कीतीही महान असले कीतीही प्रेरणादायी असले तरी आपण ते स्वीकारायचे नाही.भलेही त्यांना संपुर्ण जगाने स्वीकारले असेल आपण मात्र आपला पूर्वीचाच परिपाठ चालु ठेवायचा.अंधश्रद्धेचे भूत जनमाणसावर वारवार बिंबविले म्हणजे माणसीक गुलामगीरी प्रस्थापीत करणे सहज सोपे आहे हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस हा देश पुन्हा एकदा गुलाम होईल.आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर असे न म्हणता भगवान,भगवान, भगवान म्हटले असते तर पुढील सात जन्माचे स्वर्ग मिळाले असते असे विधान करणारे मा.गृहमंत्री अमीत शहा यांच्या विधानात थोडीही सत्यता असेल तर मग आम्ही खेड्यात राहणारे शेतकरी शेतमजूर उठता बसता देव भगवान असे म्हणत असतो. मग मी तीन वेळा नाही तर सहा वेळा 1) भगवान 2) भगवान 3) भगवान 4) भगवान 5) भगवान 6) भगवान म्हटले आता माझे 7 नव्हे 14 जन्माचे स्वर्गत भगवानकडे बुकींग झालेले आहे असे समजायचे काय?.आता मला पाप-पुण्याचा हिसाब करण्याची गरजच नाही,मी कितीही पापे केली तरी माझे 14 जन्माचे स्वर्ग ठरलेले आहेत.मी स्वर्गात गेल्यावर भगवानला भारताच्या राज्यघटने प्रमाणेच स्वर्गाचीही राज्यघटना निर्माण करण्याचे सुचवून स्वर्गाचे पहिले पंतप्रधान पद मला देण्यात यावे अशी मागणी करणार आहे आणि भगवान ही ते नाकारणार नाही. त्यामुळे माझे 14 जन्माचे वय लक्षात घेता वयाने जगातील सर्वात मोठी व्यक्ती म्हणून ‘वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद होण्यास काहीही हरकत नाही. तसेच स्वर्गाचे पहले पंत्रप्रधान सुरेश शालीग्राम हिवराळे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण माझ्या बाजुने जगातील सर्व शक्तीमान भगवान आहेत.सुरेश शालीग्राम हिवराळे 9527261559,
विनायलंकार बुद्ध विहार डिघी,तालुका नांदुरा,जिल्हा बुलढाणा.