
भारतीय बौद्ध महासभा शाखा घाटकोपर तर्फे धम्म चक्र प्रवर्तन दिन खुप छान प्रकारे साजरा करण्यात आला.
भिक्खु संघ याच्या पदस्पर्शाने घाटकोपर पच्छिम झोपडपट्टी डोंगराळ भाग पवित्र झाला. कुशलतेने सर्व उपासक आणि उपासिकां सह सर्व बौध्दाचार्यांसह धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा पार पाडला.धम्म उपासिका व बालक बालीकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिवाय विभागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांचा ही समावेश होता. कळतं नकळत एखाद्याचे नाव न लिहीण्याने त्यांचं मन दुर्बल होऊ नये म्हणून नाम उल्लेख केला नाही, क्षमा असावी. परंतु आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान अप्रतिम आहे. तक्षशिला विहारात प्रथम त्रिसरण पंचशील सर्व उपासक आणि उपासिकां सह ग्रहण करून भिक्खु संघास भोजदान देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व फुलगुच्छे देऊन सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला भाषणं न करता आलेल्या मान्यवरांनी मनापासून कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या सहभागी झालेल्या सर्व उपासक आणि उपासिकां सह सामाजिक कार्यकर्ते व इतरांचे मान्यवरांचे शांताराम देठे बौद्धाचार्य अध्यक्ष
शांताराम देठे प्रतिष्ठाण वधुवर परीचय संस्था घाटकोपर तर्फे सर्वांचे शतशः आभार मानले.
शांताराम देठे बौद्धाचार्य ८८७९७८८६०९,घाटकोपर



