
चंद्रपूर :- दिनांक 06 जून 2026 रोजी छत्रपती शाहू महाराज यांची 152 वी जयंती होती.जनकल्याण करणारे छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य असल्याने त्यानी दलित, पीडित,शोषित समाजाच्या हिताचे केल्याने त्याच्या जयंती दिनी “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोणातून भारत” हे पुस्तक अविनाश टिपले यांनी प्रकाशित करण्याचे ठरविले.त्या पुस्तक प्रकाशन सभारंभाचे अध्यक्ष, डॉ प्रा,इसदास भडके प्रसिद्ध साहित्यिक चंद्रपूर हे होते तर मंचावर, प्रा रवी कांबळे, खुशाल तेलंग सर आंबेडकरी विचारवंत चंद्रपूर,इंजि, दिलीप वावरे चंद्रपूर, अविनाश टिपले लेखक, कवी चंद्रपूर, मुन्ना आवळे सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर, मारोतराव रायपूरे सिद्धार्थ बुद्ध विहार तुकूम चंद्रपूर चे अध्यक्ष होते. प्रथम, बुद्ध, छत्रपती,शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलीत करून पुस्प माला अर्पण करण्यात आली.पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक मारोतराव रायपूरे यांनी केले. तदनंतर पुस्तकाचे प्रकाशन प्रा रवी कांबळे सर आणि पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करतांना मुन्ना आवळे म्हणाले की अविनाश टिपले हे मागील पंचवीस वर्षांपासून सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात काम करीत आहे. या पूर्वीही त्याची दोन पुस्तके निघाली असे सांगून त्याचे सामाजिक योगदान असल्याचे ते म्हणाले. पुढे इंजि,दिलीप वावरे यांनी अविनाश टिपले यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला. खुशाल तेलंग सर यांनी पुस्तक हे अगदी सरळ भाषेत म्हणजे कुणालाही समजेल असे आणि महत्व पूर्ण विषयावर लेखकांनी मांडणी केली असल्याचे ते म्हणाले.या पुस्तकाचे लेखक अविनाश टिपले आपल्या महत्व पूर्ण भाषणात म्हणाले की,

आपण भारताचे लोक असल्याने देशात आपल्याला बंधूभाव निर्माण करावा, लागेल. समता प्रस्तापित करण्यासाठी तुम्हाला नैतिकतेने, वागावे लागेल, जात, पात, धर्म, पंथ बाजूला सारून एक माणूस म्हणून, माणसासी बंधूभाव निर्माण करावा लागेल. नैतिकता जोपासावी लागेल, समान न्याय देण्यासाठी पुढे यावे लागेल, तेव्हाच या देशाला मिळालेले स्वातंत्र्य चिरकाल टिकेल. तोच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोणातून खऱ्या अर्थाने भारत असेल.त्यासाठी तुम्हाला भारतीय संविधान आणि त्यात दिल्या गेलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य समजून घेऊन समान न्याय देण्यासाठी पुढे यावे लागेल.ती आपली भारतीय समाज बांधवाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. आपण किती पार पाडतो त्यावर सारे अवलंबून आहे. प्रा, रवी कांबळे सर म्हणाले लेखक खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देण्यासाठी धडपड करतो आहे आणि निर्भीडपने लिखाण करतो खरच त्याचे पुस्तक प्रत्येकानी वाचावे तेव्हाच वास्तव कळेल असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ भडके सर आपल्या महत्वपूर्ण भाषणात म्हणाले त्याच्या पहिल्या काव्य संग्रह माणसाच्या मनात काही याला माझीच प्रस्थावना असून या त्याच्या पुस्तकाला ब्लर्ब ही मीच लिहलेले आहे. लेखक हा मागील अनेक वर्षापासून अनेक दैनिकात निर्भीड पणे समाज हिताचे लिहीत असून महाराष्ट्र मधील अनेक दैनिक मध्ये त्याची लेख येतात त्यामुळे लेखकाची तळमळ ही भारतीय समाजाला खरं समजावे ही आहे त्यासाठी *”डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोणातून भारत”* या पुस्तकाची निर्मिती लेखकांनी केली असे मला वाटते. आपण ते पुस्तक वाचावे आणि समजून घ्यावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचे आभार सतीश रामटेके यांनी मानले.कार्यक्रमात मोठया संख्येने बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.

अविनाश टिपले लेखक आणि त्याच्या सहचारिणी लता टिपले यांचा सत्कार करतांना डॉ, इसदास भडके आणि प्रा, रवी कांबळे आणि इतर.डॉ प्रा, इसदास भडके, साहित्यिक,प्रा, रवी कांबळे, साहित्यिक, खुशाल तेलंग सर,इंजि, दिलीप वावरे,अविनाश टिपले लेखक कवी, मुन्ना आवळे,सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर.आणि मारोतराव रायपूरे दिसत आहेत.
अविनाश टिपले चंद्रपूर यांस कडून
