
विशेष प्रतिनिधी भांडुप – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळी सणासारखी उत्साहात आणि आनंदात साजरी करण्याचे आवाहन केले होते.तो आदर्श डोळ्यासमोर ठेऊन भांडुप धम्म उपासिका संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची १५५ वी जयंती उत्सव धम्म उपासिका चंद्रकला सागर तायडे यांच्या घरी उत्सवात साजरा करण्यात आला.तेव्हा सुषमा संजय वाकोडे, तुळसाबाई गोविंदा इंगळे,ज्योती दिलिप थाटे,अनिता गवई,सुनिता उदेभान तायडे,चंद्रकला सागर तायडे, नंदा शिंदे,कोकिळा महादेव बांगर यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.आणि सर्वांना पेढे वाटप केले.
सागर तायडे 9920403859 भांडुप यांस कडून

