यावल तालुका भारतीय बौद्ध महासभा कार्यकर्ता शिबीर उत्साहात संपन्न…

यावल फैजपूर:- दि.१४/६/२०२६ रोजी भारतीय बौद्ध महासभेत तर्फे “एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.” सर्वात प्रथम भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आदरणीय सुमंगल तथा रविंद्र अहिरे गुरुजी, डॉ.के.वाय.सुरवाडे (महाराष्ट्र राज्य पर्यटन सचिव),रवींद्र वानखेडे (संस्कार विभाग उपाध्यक्ष), प्रा.डॉ.संजीव सावळे (जिल्हा कोषाध्यक्ष),संघरत्न दामोदरे (जिल्हा संस्कार सचिव),रमेश सावळे (समता सैनिक दल लेफ्टनंट),वसुंधरा प्रवीण मेढे (जिल्हा संघटक),राजेश आव्हाड (भुसावळ तालुका अध्यक्ष),आदरणीय ओंकार सोनवणे यांच्या समवेत मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच धूपदिपाने वातावरण मंगलमय करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन आदरणीय सुमंगल तथा रविंद्र अहिरे जिल्हा अध्यक्ष यांनी केले. बौद्धाचार्य बी.डी.महाले यांनी सामुदायिक वंदना घेतली.मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
उपस्थित शिबीरार्थी यांचा परिचय घेण्यात आला.प्रथम सत्राला आदरणीय डॉ.के.वाय.सुरवाडे यांनी विषय दिले.”भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय उद्दिष्टे कार्य 22 प्रतिज्ञा या विषयावर मार्गदर्शन केले.त्यानंतर दुसरे सत्र आदरणीय संघरत्न दामोदरे यांनी कार्यकर्ता कसा असला पाहिजे बुद्ध धम्म व संघ यांची गुण सांगितले. संविधानाचे महत्त्व आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय विचार सांगितले.त्यानंतर भोजन अवकाश झाला.सर्वाना भोजन देण्यात आले.भोजनानंतर तिसरे सत्र आदरणीय सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांनी शाखेचे कामकाज व हिशोब, पत्रव्यवहार ऑडीट याबाबतीत मार्गदर्शन केले.चौथे सत्र आदरणीय प्रा.डॉ.संजीव सावळे यांनी ग्राम शाखा,शहर शाखा,तालुका शाखा,महाराष्ट्र शाखा,केंद्रात ग्राउंड लेव्हल वरती कामकाज कसे चालते आणि अध्यक्ष,उपाध्यक्ष, सरचिटणीस,कोषाध्यक्ष,संघटक यांच्या कर्तव्या विषयी मार्गदर्शन केले.

कार्यकर्ता शिबिराचे संपूर्ण सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षक आदरणीय बी.डी.महाले यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ निकम सर यांनी केले.आदरणीय सुधाकर तायडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.शिबिरासाठी अनमोल सहकार्य अतिश केदारे,बबन तायडे,निळकंठ भालेराव,देविदास साळुंखे,हरी आमोदकर, बौद्धाचार्य पी.के महाले आदरणीय शैलेश अवसरमल यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी श्रामनेर धम्म सेवक मेश्राम गुरुजी यांनी केले.अत्यंत उत्साहात सरणत्तय घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
सुमंगल तथा रविंद्र अहिरे गुरुजी 9922851629,यांस कडून

