शिका,संघटीत व्हा,आणि संघर्ष करा!. हा संदेश विसरलो आहोत की काय?.

बातमी शेअर करा.

जयभिम,नमोबुध्दाय 

चला मीटिंग घ्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती जोरात करायची यासाठी लगबग सुरु झाली. मिरवणूक काढणे,ऑर्केस्ट्रा लावणे, डेकोरेशन करणे, फटाके उडवणे आणि मोठे बॅनर लावणे आणि उतुंग विचाराचे उद्दारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सोबत आपले फोटो लावणे.यासाठी वर्गणीतुन सर्व पैसा जमा करुन खर्च करायचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करायची हा अनेक १३४ वर्षाचा कार्यक्रम आपण मोठ्या उत्सवात धूमधडाक्यात साजरा करत आलो आहोत.आपण डॉ.बाबासाहेबाची जयंती उत्साहात साजरी करायला पाहिजे यात कोणतेही दुमत नाही पण ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराने आपण सुधरलो तो विचार आजकाल मागे पढत चालला आहे हा अनुभव येत आहे.आपण बाबासाहेबानी दिलेला शिका,संघटीत व्हा,आणि संघर्ष करा!. हा संदेश विसरलो आहोत की काय?.असा प्रश्न पडतोय.यावर आपण किती खर्च करतो याचा विचार केला पाहिजे.जयंतीच्या खर्चाच्या 25 टक्के रक्कम वर्षभर मुलांचे शिक्षणावर खर्च करायला पाहिजे.आम्ही वसतिगृहात शिकलो ते आता कुठे दिसतात काय?.

   आज आपले खेड्यातील,झोपाडपट्टीतील मुले शिक्षणात मागे पडत आहेत.शिक्षण नाही त्यामुळे चांगली नौकरी नाही.त्यामुळेच असंघटित कष्टकरी कामगार ही आमची खरी ओळख आम्ही कितीही लपवली तरी आपली आर्थिक परिस्थिति सत्य सांगते. आणि त्यामुळे आपण कुठे किती मागे पडत आहोत.यांचे चिंतन होत नाही.म्हणूनच प्रत्येक जयंती उत्सव मंडळ,संस्था,बुद्ध विहार समिती यांनी एकत्र येऊन खालील काम हाती घ्यावे.ही इच्छा मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

   मुलांना शिक्षणासाठी मदत,मार्गदर्शन,हुशार मुलाचा सत्कार,सामान्य मुलासाठी शिकवण,शिष्यवृत्ती देणे,व्यक्तिमत्व विकास करणे आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन इत्यादी विषयावर काम सुरु करायला पाहिजे.आपण हे काम सोबत करू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करु.जयंती उत्सव मंडळं,विहार समिती आणि इतर संस्थानी आपल्या विभागातील मुलांची यादी काढून शिक्षण या विषयावर काम करण्यासाठी संपर्क करावा.हे आम्ही जाहीर आवाहन करून सांगत आहोत.अधिक माहिती साठी ऍड.जे.जी यादव अध्यक्ष,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,गाला क्र 18, दादोजी कोंडदेव स्टेडियम.गेट क्र 3 खारटन रोड ठाणे. 9869209483/9803010131,ऍड.किरण कांबळे सचिव,भीमराव शिरसाट यांच्याशी संपर्क साधावा.

ऍड.जे.जी यादव-9869209483,अध्यक्ष,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *