उघड्यावरील रस्त्यावर राहणाऱ्या भटके विमुक्त बेघरांच्या मुलांचे राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियान अंतर्गत सर्वेक्षण होण्याची मागणी.

बातमी शेअर करा.

मुंबई (दिनांक 7 एप्रिल 2025) मुंबई उपनगरातील एकात्मिक बाल विकास सेवा विकास यंत्रणेच्या पोषण ट्रॅकर वरील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये दोन लाख 38 हजार 94 बालकांची नोंद घेण्यात आली. या नोंदीत बालकांचे वजन आणि उंची मोजण्यात आली. यानुसार अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी स्तरावरील वजन आणि उंची घेऊन पोषण ट्रॅकर ॲपवर नोंदी केल्या आहेत आणि या नोंदी केलेल्या माहितीतून 16,343 कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आले.याबाबत माननीय पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितल्याचे समजते.या पश्चिम उपनगरातील अंगणवाडीतील बालकांच्या नोंदी घेण्यात आल्यात मात्र नाल्याच्या,रस्त्याच्या, सिग्नलच्या शेजारी उघड्यावर राहणारे भटके विमुक्त समाजातील बालकांचे या ’राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियानामध्ये’ नोंद झाली नसल्याचे तक्रार सीपीडी संस्थेने पत्राद्वारे केली आहे.

  या अंगणवाडी स्तरावरील मुलांची तपासणी नोंदणी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबई सारख्या शहरांमध्ये तीव्रकुपोषित आणि अती तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत.कुपोषित बालकांचे आकडे मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये हजारो लाखो रुपये खर्च करणाऱ्या सरकारला हे शोभणारे नाही.मात्र खरी वास्तवता रस्त्यावरती आणि उघड्यावर राहणाऱ्या बालकांची जर नोंद घेतली तर या 16343 मध्ये अजून  कुपोषित बालकांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे खंत सीपीडी संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर व्यक्त करतात.

  सीपीडी संस्थेने पश्चिम उपनगरातील उघड्यावर आणि रस्त्या शेजारी राहणाऱ्या श्रमिक भटके विमुक्त समाजातील मुलांच्या यादीसह अंगणवाडीचा लाभ मिळण्याकरिता प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र दिले तसेच अन्न आयोग अध्यक्षांच्या  परिपत्रकाच्या आधारे सुद्धा निवेदन दिले असता अजून पावेतो या भटक्या विमुक्त समाजातील मुलांकरिता अंगणवाडीचा  कोणताही ठोस कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही.जर प्रस्तुत अंगणवाडी मधील मुलांची कुपोषणाची आकडेवारी दिसून येत असेल तर उघड्यावर राहणाऱ्या भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना कोणत्याही सोयी सवलती नाही आहे तर त्यांच्या मुलांची काय अवस्था असू शकेलं ? 

 प्रथम त्यांची नोंदणी करून घेण्यात यावी व व त्यांच्या करिता मिनी अंगणवाडी अथवा अंगणवाडी चे लाभ देण्याचां शासन निर्णय प्रमाणे अंमल करण्याची मागणी जगदीश पाटणकर करतात.त्यांनी या बालकांची नोंदणी करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री,प्रकल्प अधिकारी,जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री उपनगरे त्यांच्याकडे मागणी केली असल्याचे सांगतात.

जगदीश पाटणकर ९८६७८०९०५३ ,समाज सेवक मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *