म्हणजे चोरांना त्रास होतो म्हणून दरवाजांची कुळपे काढून टाकणं होय- राजाराम पाटील.

आपल्या देशाच्या अगोदर जगात प्रचंड भौतिक प्रगती झाली.म्हणजेच मानवी सुखासाठी जमिनीवरची रस्ते,पाणी, घरे,घरातील मानवी सुखाच्या वस्तू वीज,पंखे,फ्रीज,गॅस,चुली, एसी,गाड्या,रेल्वे,विमाने अशा अनेक जीवनापयोगी वस्तूंचे शोध लावले.स्वर्गातील मुक्तीला महत्व देणारा,भारत खूपच मागे राहिला.माणसाचा मैला अतिशूद्र जातींच्या माणसानं डोक्यावरून न्यायला लावणारी भारताची शोषक अधोगती नाकारून ? आम्ही मन आणि शरीराच्या मुक्तीचे शोध लावल्याची बतावणी? करून तात्विक पातळीवर फुशारक्या मारणारे,भारतीयांचे अध्यात्माचे,आत्म्याचे अभिमानी तत्वद्न्यान, आता समजून घ्यायची वेळ “नव्या तरुण पिढीवर आली आहे.मानवी शरीर आणि मनाच्या सुखाबाबत आम्ही आजही जगाच्या खूप मागे आहोत.मागासवर्गीय शोषणाच्या गटारगंगेत आम्ही आमची मुक्ती शोधत आहोत.ही प्रगती नाही तर अधोगती आहे.
परक्या इंग्रजांनी भारताला राजकीय दृष्ट्या गुलाम केले होते.हे सत्य आहे.परंतु त्यांनी पाश्चात्य देशात केलेल्या आधुनिक शिक्षण,नवे शोध,रेल्वे, धरणे,गाड्या,लोकशाही शासन पद्धतीचा परिचय,न्याय पद्धती,प्रबोधनाची पत्रकारिता यांचा परिचय आपल्या देशाला दिला आहे.शोषित पीडित जाती जमाती त्यांची जातीय जनगणना,त्यांचा सामाजिक न्याय,अशा कितीतरी गोष्टी आम्हास जगाकडून पहायला शिकायला मिळाल्या.याच इंग्रजी शिक्षणामुळे चातुर्वर्ण्याच्या ब्राह्मणी कावा समजावून सांगणारे राष्ट्रपिता महात्मा फुले भारताला मिळाले.स्त्रियांना मनुस्मृतीने नाकारलेले शिक्षण,देणारी आधुनिक स्त्रीपुरुषांची गुरु माऊली सावित्रीबाई मिळाली.जिने मनुस्मृतीच्या सरस्वतीला नवा मानवी पर्याय दिला.ज्या मराठा क्षत्रिय राजानि क्षत्रिय राजा प्रभू श्रीरामांचा आदर्श समोर ठेऊन आजपर्यंत शिकू पाहणाऱ्या शूद्र ओबीसी शंभुकाचे खून पाडले. ते राजकीय शास्त्र,शस्त्र फेकून शूद्र अतिशूद्र मागास विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकऱ्या देणारे नवे समतेचे आरक्षणाचे राज्य कोल्हापुरात सुरू केले.त्यांचे नाव आधुनिक भारतीय राजे,राजर्षी शाहू महाराज.हे पाश्चात्य आधुनिक इंग्रजी शिक्षणामुळे भारतातल्या मनुस्मृतीच्या क्षत्रिय (मराठा) राजकारणाला मिळालेले नवे राजकीय शिक्षण आहे.पाश्चात्य इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावामुळे भारताला जागतिक तत्वद्न्यानी महापुरुष इथल्या सर्वाधिक शोषित अस्पृश्य जातीतून मिळाला.ज्याने भारतीय संविधानाची निर्मिती करून अनंत उपकार येथल्या स्त्रिया ओबीसी एससी एसटी आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय भारतीय लोकावर केले आहेत.

मानवी शोषणाविरुद्ध गुलामी विरुद्ध लढणारा भारत,जागतिक शांतीसाठी जागृत असलेला भारत ही तथागत बुद्धांची शिकवण लॉर्ड कॅनिंगहम या भारताच्या जमिनीचे उत्खनन करून बुद्ध आणि सम्राट अशोक यांची ओळख भारताला करून देणारा पुरातत्त्वीय संशोधक “इंग्रज” अधिकारी होता.भारतात सकाळी दात न स्वच्छ करता.आंघोळ प्रातर्विधी न करता ब्राह्मण राजपुरोहित इथल्या क्षत्रिय मराठा राजाला शूद्र ठरविण्यासाठी वैदिक हिंदू पवित्र स्नानाचे, धार्मिक संस्कार करू शकतात?.हे राजर्षी शाहू महाराजांनी आणि पुरोगामी महाराष्ट्राने पाहिले आहे.
आज महाराष्ट्राच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याला तशाच अशिक्षित शिवराळ जरांगे कडून अख्या मंत्रीमंडळ सर्व आमदार आणि (उच्चशिक्षित आयएस आयपीएस अधिकारी) प्रशासनाला, महाराष्ट्राचे राजकीय गुरू म्हणून माननीय जरांगे साहेब यांच्यासमोर,गुडघ्यावर येऊन,असंवैधानिक “मराठा आरक्षणाचे” मार्गदर्शन घ्यावे लागते.? यापेक्षा पुरोगामी, आधुनिक महाराष्ट्राचा दुसरा बौद्धिक पराभव नाही.अर्थात जरांगेना साजेशी “गुरुतुल्य माणसे” मुख्यमंत्री फडणवीसांकडेही प्रवक्ते म्हणून महाराष्ट्राच्या नागरिकांना बौद्धिक देत असतात.केंद्र सरकारकडे यांचा भरणा अधिक आहे.या बौद्धिक दुष्काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे “सरसंघचालक” मोहन भागवत यांचे मात्र मी स्वागत करीन. ज्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच मोठे वक्तव्य केले. “भारतातल्या पंडितांनी इथल्या शूद्र अतिशूद्रांचे शोषण हजारो वर्षे केले .”ही भारताची शोषक वास्तविकता देशासमोर एकदा तरी मान्य केली.परंतु महागुरू जरांगे महाराजांनी मराठा आरक्षणावर बोलताना, पुन्हा एकदा मनुस्मृती लिहिणाऱ्या ब्राह्मणांना लाजवेल? असे वक्तव्य करून, ओबीसी डीएनएची मुख्यमंत्री फडणवीसांनी बडबड बंद केली आहे.आरक्षण या विषयावर खूप बोलायचे आहे.कारण व्यक्तिगत जीवनात शिक्षण घेताना मला माझ्या वृद्ध आईवडिलांना जे कष्ट पडले त्यांची परतफेड वयाच्या पन्नास वर्षानंतरही मी करू शकत नाही.असा अत्यंत दुःखी माणूस मी राजाराम पाटील आहे.
कसाबसा शिक्षक झाल्यानंतर मला उच्चवर्णीय व्यवस्थेमुळे दोन नोकऱ्या सोडाव्या लागल्या.शिक्षण आणि सरकारी नोकरीचे सुख न मिळालेला मी आगरी ओबीसी पाटील आहे.पाटील म्हणजे मराठा? उच्चवर्णीय? हा महाराष्ट्रात झालेला गैरसमज आहे.माझ्या आगरी कोळी कराडी भंडारी जातींचे जमीन, पाणी, जंगल, शिक्षण, आरक्षण यातील दैन्य दूर व्हावे ?म्हणून मी याही स्थितीत सिडको ,सेझ, एमआयडीसी, नवी मुंबई विमानतळ,कुळ कायदा,बुद्ध लेणी वाचविणे, ओबीसी आरक्षण यासाठी एकवेळ विधानसभा, दोन वेळा लोकसभा लढून हरलो आहे.ओबीसी दुःख? शोषण काय आहे ?हे सांगण्यासाठी माझा मी अनुभव सांगतोय.यात आत्म गौरव अभिमान नाही.सगळ्याच ओबीसी कार्यकर्त्यांनी “शूद्र “म्हणून त्यांच्या वाट्याला असलेले उच्चवर्णीय शोषण मांडले? तरच उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विषमता समजेल?

हजारो वर्षेच नाही तर २०२६ मध्येही गुणवत्ता ,क्षमता असूनही ओबीसींना आज मुख्यमंत्री ब्राह्मण देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मराठा एकनाथ शिंदे असताना? माझ्यासारख्या ओबीसी माणसाला जो शारीरिक बौध्दिक दृष्ट्या योग्यतेचा असूनही? मागे रहावे लागते.हे आमचे नशीब, प्रारब्ध नसून मनुस्मृतीने केलेली” वाटमारी” आहे.हे सत्य समजेल.म्हणूनच ओबीसी आरक्षण हवे. ते प्रतिनिधित्वासाठी हवे.मागास वर्गीय जातीवर,कुणावरही रुबाब दाखविण्यासाठी नाही.माझे आगरी ओबीसी नेते नारायण नागू पाटील.दि बा पाटील.दत्ता पाटील.जनार्दन कोठेकर,ॲड जनार्दन पाटील यांनी बुद्ध ,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या तर्कनिष्ठ विचार स्वीकारून देव, आत्मा, नरक स्वर्ग, चमत्कार नाकारून जो सामाजिक समतेचा मार्ग स्वीकारला. म्हणून जे कळते. ते वास्तव मांडले आहे.उरलेल्या ओबीसी बांधवांचे जगणे, आजही अस्वच्छ घाणेरडी अशिक्षित उच्चवर्णीयांना “गुरू “मानून गुलाम म्हणून जगण्याची परंपरा गतानुगतिक अखंड चालू आहे.म्हणून जातपडताळणी समित्या रद्द करा हा” फतवा”धर्मभिमानी हिंदू ओबीसींना कळाला नाही.हे मुस्लिम मौलवींचे आदेश असते?.तर महाराष्ट्रात हिंदुत्ववाद्यांनी दंगल सुरू केली असती.त्यात आगरी कोळी भंडारी कराडी कुणबी माळी फ्रंटवर लढले असते?. मेलेही असते.ओबीसी आरक्षणाचा खून? मराठा जरांगे पाडीत असताना. लढायला एक ओबीसी नाही.याचे दुःख वर्णन करणे .कठीण आहे.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जरांगे पाटील यांचा “मराठा समाज” हा क्षत्रिय राज्यकर्ता म्हणून, मनुस्मृती समर्थक ब्राम्हण वैश्य या उच्चवर्णीय जातींनी त्यांच्या राजकीय धार्मिक आर्थिक स्वार्थासाठी महाराष्ट्रावर लादला आहे.
वैदिक हिंदू धार्मिक गुलाम ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांनी त्याला आजही स्वीकारला आहे.गुगलवर सर्च करा किंवा खेड्यातल्या अशिक्षित शेतमजुराला विचारा. “डझनभर मुख्यमंत्री मराठा,गृहमंत्री ब्राह्मण मराठा,महसूल मंत्री मराठा,मंत्रिमंडळात पुन्हा डझनभर मराठा, दीडशेहून आमदार कायम विधानसभेत, विधान परिषदेत मराठा आहेत.”
अलिकडे भूमाफिया लोढा ही जोडीला आहेत.गुजराती वैश्य मराठे जोडीला घेत आहेत.ब्राह्मण मारवाडी “सगेसोयरे” शरद पवार परिवाराने जोडले आहेत.त्यांनाही “कुणबी ओबीसी”दाखले देणारे जरांगे किती बुद्धिमान असतील? ६० टक्के शेतजमिनी,सहकार,बँका,उद्योग राजकारण यावर वर्चस्व मराठ्यांचे आहे.अनेक मागास वर्ग आयोग,सुप्रीम कोर्ट सांगते मराठा हे कुणबी शूद्र.नाहीत म्हणजे शूद्र मागास ओबीसी नाहीत.तरीही मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठे? हे संविधान विरोधी असूनही.यांचे मोर्चे पोलिसांनी रोखले नाहीत.तर कायदा, पोलिस ही मंडळी मराठा अधिक आहेत का?.ते तो क्षत्रिय धर्मच मानतात का?.आमच्या आगरी कोळी ओबीसींवर कोळीवाडे गावठाणे यात उच्च जातींचे बिल्डर दिवसा ढवळ्या अत्याचार करूनही, आम्हाला आमची घरे वाचविताना,तुरुंगात टाकणारे पोलिस खाते, संविधान मानते का? हा माझा नम्र प्रश्न न्याय व्यवस्थेला आहे.
मराठा आरक्षण नावाची गोष्ट समतेच्या तत्वाला मान्य होऊ शकत नाही.मराठा न्यायमूर्ती माननीय सुप्रीम कोर्ट ,श्री पी बी सावंत यांनी अनेक युट्यूबवर मुलाखतीत मांडली.अर्थात जरांगेला आपला नेता स्वीकारून?.मराठा बांधवांनी राजर्षी शाहू महाराजांसहित सहित व्यावहारिक शहाणपण स्वतःच नाकारल्यावर,सोडल्यावर करायचे काय?प्रश्न विचारायचे कुणाला?उत्तर देणार कोण? “मराठा आरक्षण मोर्चात दलीत अत्याचार प्रतिबंधक कायदा रद्द करा.”ही मागणी पाहता?या आंदोलनाची मानसिकता मनुस्मृतीच्या ब्राह्मण मराठा वैश्य अशीच होती.हे ओबीसी नेत्यांनी समजून घ्यायला हवे होते.? “मराठे म्हणजे कुणबी नाहीत.” हे स्वतः कुणबी नेते चंद्रकांत बावकर कोकणातून सांगत असताना.
त्यांचा आवाज मिडिया देशात पोहचवत नसेल? तर मिडिया कोण आहे?हे माझ्या पत्रकार बंधू भगिनींनी नम्रपणे सांगावे.
मराठ्यांनी “कुणबी” दाखले काढले आहेत.त्यांचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थात निवडणुका लढवून ओबीसी आरक्षण संपले आहे.अर्थात ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब. विजय वडेट्टीवार साहेब.प्रकाश अण्णा शेडगे,ॲड प्रदीप ढोबळे, प्रा श्रवण देवरे,आगरी विचारवंत प्रा जे डी तांडेल.प्रा लक्ष्मण हाके.ॲड मंगेश ससाणे.ॲड ढोले पाटील. यांचे कुणी ऐकत नाही.महाराष्ट्राचे (मराठा)माननीय नेते जरांगे पाटील यांचे ऐकतात.महाराष्ट्राचे सारे मंत्रीमंडळ, मुख्यमंत्री हे मराठा समर्थक आहेत.लाखो कुणबी दाखले हे जारांगेंच्या आदेशाने काढणारे मराठे.हे मनुस्मृती समर्थक आहेत.ओबीसी विरोधी आहेत.समतावादी संविधानवादी फुले शाहू आंबेडकरांचे नाहीत.हे आंबेडकरी चळवळीतल्या विचारवंतानी समजून घ्याव.ही माझी नम्र विनंती आहे.
उच्चवर्णीय राज्यकर्त्या मराठ्यांनी काढलेले कुणबी दाखले रद्द करण्यासाठी ओबीसी तरुण लाखोंच्या संख्येने वकील होऊन सामाजिक समतेसाठी कोर्टात लढतील.अशी मोठी आशा ठेवतो.ब्राह्मण मराठा जमीनदार विरोधी खटल्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्यक्ष सहवासाने आम्ही ॲड दत्ता पाटील, दि बा पाटील हे दोन आगरी वकील दिले.
यापुढे जात पडताळणी साठी,लाखो ओबीसी दोन कोटी वकील स्त्रिया आणि पुरुषातून देतील.?ही वास्तविकता माझे स्वप्न आहे.सोबत लढाऊ एससी एसटी बांधव आहेत.
देशात केवळ मराठ्यांनी कुणबी दाखले काढले नाहीत.तर मराठा क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांनी बोगस EWS आदिवासी आणि एससी दाखले काढले असावेत?ते पचविण्यासाठी जरांगेंची ही “जातपडताळणी समिती रद्द करा.राष्ट्रीय मागणी आहे.जात पडताळणी समिती रद्द करा.म्हणजे देशातील आरक्षण रद्द करा.समता नष्ट करा.विषमता आणा.मनुस्मृती आणा.जागे व्हा!ओबीसी बंधू भगिनींनी आणि तरुणांनी.आपले देशाच्या सर्वस्व समतेसाठी अर्पण करा.जगण्याची चिंता नको.”भरतीचा माज नको ओहोटीची लाज नको.”ही सागरी तत्वे निसर्ग तत्वे लक्षात ठेवा.संघर्ष हेच जीवन आहे .हे सांगणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तुमच्या मनात असूद्या.सहकार्य,मदतीच्या,अपेक्षेत.
आपला भाऊ.
राजाराम पाटील-८२८६०३१४६३,उरण जिल्हा – रायगड.

