ओबीसी आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही.

बातमी शेअर करा.

महाराष्ट्रात मराठा समाजास आरक्षण मिळावे.म्हणून सततची आक्रमक आंदोलने सुरू आहेत.ओबीसींचे सामाजिक मागासलेपणाचे आरक्षण ही तुच्छता दर्शक गोष्ट आहे.असे नेहमीच ब्राह्मण मराठा वैश्य हे एससी एसटी ओबीसी यांना हिनवत असत.आरक्षण हे कुबड्या आहेत.असेही अनेक उच्चवर्णीय विद्वानांचे मत होते.परंतु जेव्हा हळू हळू आमचे सरपंच, नगरसेवक,महापौर यांची कामगिरी उंचावत गेली.त्यानंतर ओबीसी आरक्षण कसे संपविता येईल?.त्यात घुसखोरी करून पुढे येणाऱ्या नव्या शूद्र ओबीसी सत्ताधाऱ्यांना रोखता येईल?याचा प्रयत्न प्रशासन,ब्राह्मण मराठा सीकेपी राजकीय पक्ष प्रमुख यांच्याकडून सुरू झाला.मुळात ओबीसी एससी एसटी आरक्षणाच्या माध्यमातून पुढे येणे. याला उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा समाजास धोका वाटणे?.म्हणजे मनुस्मृतीच्या मानसिकतेचा अहंकार होय. दुःख याचे आहे.
   ओबीसींना यापूर्वी सार्वजनिक जीवनात पुढे यावे ? असे वाटत नव्हते.या ओबीसी मानसिक गुलामीची जाणीव महात्मा फुले यांनी प्रथम महाराष्ट्राला आणि भारताला करून दिली.म्हणूनच आरक्षणाच्या आंदोलनाचे पितामह महात्मा जोतिबा फुले आहेत.त्यांचा भारताच्या सामाजिक न्यायाबाबत जो विचार आहे. तो विचार अडीच हजार वर्षापूर्वीच्या तथागत गौतम बुद्धाच्या विचारांचा वारसा आहे.जरांगे पाटील यांच्या मराठ्यांना आरक्षण मागण्याच्या आंदोलनात किंवा उच्चवर्णीय ब्राह्मण वैश्य जातींच्या EWS आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणात, समतेच्या तत्वद्न्यातील बुद्ध फुले शाहू आंबेडकर कुठेच दिसत नाहीत.मग त्यांची आरक्षणाची मागणी कशाच्या आधारे होतेय ?
 

रामायणात क्षत्रिय श्रीरामाने शूद्र शंभूकला ठार करणे.म्हणजे शूद्र ओबीसींना शिक्षण,नोकरी,प्रतिनिधित्व नाकारणे होय.याच प्रमाणे महाभारतात एकलव्यास धनुर्विद्येत गुरुदक्षिणा म्हणून गुरु द्रोणाचार्य यांनी अंगठा कापण्याची मागणी करणे.म्हणजे तत्कालीन राजकारणात आदिवासी विद्यार्थ्यास प्रवेश नाकारून,क्षत्रिय अर्जुनाची राजकारणातील सत्ता सुरक्षित करण्याचा मूळ हेतू आहे.
  भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची धार्मिक प्रथा परंपरा यांची चिकित्सा करणे.म्हणजे आपण धर्म विरोधी आहोत? असा अर्थ नाही.तर जीवनात आपल्याला ओबीसी म्हणून आलेल्या अन्याय अत्याचारांची मनाच्या संवेदनेच्या पातळीवर पडताळणी जाणून.सामाजिक न्याय म्हणजे काय? हे समजून घेणे होय.याच अर्थाने भगवान बुद्ध,चार्वाक,महावीर, महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि या मार्गावर चालणारे आगरी नेते दि बा पाटील. आपणा सर्वांनाच समजून घ्यावे लागतील.ओबीसींना मिळालेले सामाजिक मागास आरक्षण हे त्यांचे अस्तित्व, उच्चवर्णीय अत्याचारात सुरक्षित टिकून रहावे यासाठी आहे.हजारो वर्षे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी मनुस्मृती धर्माच्या आडून चालविलेल्या अखंड शोषणाविरुद्ध जो आवाज आमच्या पूर्वजांनी उठवला. त्यातील न्यायाचे ते सामाजिक राजकीय,आर्थिक प्रतिबिंब आहे.तर या सामाजिक न्यायाला विरोध करण्यात पुढे असलेले मराठा बांधव आज ओबीसी आरक्षण मागत आहेत.
  महाराष्ट्राच्या राजकीय धार्मिक सामाजिक जीवनात मराठे ब्राह्मण हे राज्यकर्ते आहेत.अर्थात आगरी कोळी भंडारी कराडी कुणबी माळी धनगर या ओबीसी जाती आणि एससी एसटी यांना त्यांनी गुलाम म्हणून राबविले आहे. (कोकणातील खोती जमीनदारी पहा.) याबाबत वर्तमान महाराष्ट्रात ओबीसी नेते बोलण्याची हिंमत ठेवत नाहीत.त्यामुळे ओबीसी आणि मराठा यातील फरकच कळेनासा झाला.त्यातच “बामसेफ” सारख्या संघटनांनी संविधानकार डॉ.बाबासाहेब आबेडकर या सामाजिक न्यायाच्या संघर्षात, बुद्ध फुले यांची “धर्मचिकित्सा” भूमिका घेणाऱ्या जागतिक विचारवंताना बाजूला करून ओबीसी आरक्षण विरोधी भूमिका घेऊन.मराठे हे शूद्र आहेत त्यांना कुणबी म्हणून ओबीसी म्हणून आरक्षण द्या.असे वामन मेश्राम वगैरे म्हणाले.ओबीसी साठी ही घर भेदी भूमिका ठरली.अर्थात महात्मा फुले यांच्या मांडणी नुसार स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांनी आरक्षणाची लढाई एकत्र लढली पाहिजे.
    सरकार आज ओबीसींसह एससी एसटी यांच्या आरक्षणात वर्गीकरणाची मांडणी करतेय. ती मांडणी देशातील सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या ८५टक्के मागासवर्गीयांची म्हणजे उच्चवर्णीयांनी शोषण केलेल्या स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांचे सामाजिक ऐक्य तोडणारी आहे.समस्त ओबीसी एससी एसटी यांनी “आरक्षणाची लढाई” “एकीने लढण्याचा” विषय आहे.त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणाचे विरोधक कोण? हे न घाबरता समजून घेण्याचाही हा विषय आहे.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर,म्हणजे पेशवाई गेल्यानंतर अपेक्षा होती,की मनुस्मृतीच्या विरोधात मराठे उतरतील ?. झाले उलटे ?. हजारो वर्षांच्या सत्ता संघर्षात लढणारे ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय वैश्य हे मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांच्या विरोधात एक झाले.पुन्हा धर्मसत्ता ब्राह्मणांकडे आणि महाराष्ट्राची राजसत्ता मराठ्यांकडे आली.


   आपण पहा शेतजमिनीची एकूण मालकी मराठा समाजाकडे सर्वाधिक आहे.ऊस कारखाने मराठ्यांकडे.देशाच्या जमिनी लाटण्यासाठी जोडीला मराठा शरद पवार यांनी अदानी अंबानी लोढा यांना घेतले आहे.तर कोकणात मराठा एकनाथ शिंदे हे नगर विकास खाते,एम एम आरडी सिडको,नवी मुंबई विमानतळ,क्लस्टर योजना,एसआरए यांच्या माध्यमातून कुळ कायद्याने मालक बनलेल्या आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी यांना भूमिहीन बनवित आहेत. महाराष्ट्राची सहकार चळवळ,बँका,शिक्षण,यावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे.ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात ओबीसी महानगर पालिकेत स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांनी डोके वर काढू नये.यासाठीच तर कुणबी दाखले मराठ्यांनी काढले.अलीकडे झालेल्या निवडणुकीत हे सत्य समोर आले.बाकी महाराष्ट्राच्या विधानसभा,विधानपरिषद, लोकसभा यातील मराठ्यांचे वर्चस्व हे मनुस्मृतीचे आधुनिक प्रतीक ठरते.कायम दीडशे आमदार आणि नजरेत भरतील असे खासदार मराठा आहेत.असे असूनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ब्राह्मण होतात ?.याचा अर्थ ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांना प्रतिनिधित्व नाकारण्यासाठी मराठ्यांनी ब्राह्मणाचे नेतृत्व स्वीकारले आहे.वर्तमान काळाची ही नोंद समस्त ओबीसीनी घ्यावी.
    ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देता येते ?. ही भाषा वापणाऱ्या मेश्राम साहेबांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांती प्रतिक्रांती हे पुस्तक वाचावे.त्यात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य युतीने मनुस्मृतीच्या संस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण धर्मकारण केले आहे.ओबीसी आरक्षण संपले आहे.हे धनगर नेते म्हणत आहेत.आज आम्ही आगरी कोळी भंडारी कुणबी याचा अनुभव कोकणात घेत आहोत.आम्ही उध्वस्त होत आहोत.त्याला जबाबदार ब्राह्मण मुख्यमंत्री मराठा उपमुख्यमंत्री,म्हणजे फडणवीस शिंदे पवार आहेत.यात कोण फुले शाहू आंबेडकर वादी आहेत.?
   मराठ्यांना केवळ शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या आरक्षण हवे.असाही प्रचार मराठ्यांची बाजू घेऊन काही एससी आणि ओबीसी विचारवंतानी मराठा आरक्षणाची बाजू यापूर्वी मांडली.आज सिद्ध झाले.मराठ्यांनी खोटे कुणबी दाखले काढले गेले.ते ग्रामपंचायत जिल्हापरिषद महानगर पालिका यात पुढे येऊ पाहणाऱ्या ओबीसी उमेदवारांना पाडण्यासाठी? ओबीसी जागेवर निवडून येतात.हे मराठ्यांना सहन होत नाही.सांगता येत नाही.हा मनुस्मृतीने दिलेले अवघड जागेवरील दुखणे. “गुप्तरोग” झाल्याचे ऐतिहासिक दुखणे आहे.यावर समतेचे ऑपरेशन, भारताच्या आरोग्याचे सुप्रसिद्ध संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.त्यांची डॉक्टर ही पदवी जशी जागतिक विद्वत्तेची आहे.तशीच ती भारताच्या बिघडलेल्या तब्येतीला समतेचे कडू औषध देणाऱ्या महान शल्य चित्स्काचीही आहे.मी त्यांच्या योगदानांला,विचारणा,त्रिवार वंदन करतो.
   देशाची एकता अखंडता स्वातंत्र्य टिकवायचे असेल?. तर ज्यांना अधिकार,प्रतिनिधित्व हजारो वर्षे ज्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी नाकारले. त्यांनी मोठ्या मनाने आता स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांना आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व द्यावे.आरक्षण विरोधी आवाज उठविणारे कोण आहेत? याचा विचार ओबीसी नी करावा.मराठा हे सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत.असे अनेक निकाल न्यायालये आणि मागासवर्ग आयोगानी दिले आहेत.ब्राह्मण मराठ्यांची,वैश्य अदानी अंबानी यांची सत्ता आहे.म्हणून निवडणुका,निवडणूक आयोग,न्यायालये यात तुम्ही विषमतेने निर्णय घ्याल? तर ते आम्ही का मान्य करावे?.आरक्षण हे प्रतिनिधित्व असेल.तर मराठ्यांना कुणी नाकारले आहे.ओबीसी पेक्षा ते पुढेच आहेत.EWS आरक्षण,इसिबीसी आरक्षण,चोरून काढलेले कुणबी दाखले.सत्तेतील मराठा नेतृत्व असताना.तुम्ही मागास कसे झाले? यावर लोक चर्चा व्हावी.परंतु ओबीसीमध्ये जागृती यावी.
मंडल आयोगासाठी संघर्ष करणाऱ्या माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग.महान विचारवंत पेरियार, लोकनेते दि बा पाटील.यांचे स्मरण करून आणि समस्त ओबीसी नेतृत्वाचा आदर करून सांगतो.ओबीसी आरक्षणात घुसखोरी झालीय. ही सत्य घटना आहे.परंतु आम्ही घुसखोरांना शोधून काढू.त्यांना न्यायालयीन लढे,राजकीय लढे,रस्त्यावरील लढे.यातून ओबीसी एससी एसटी बाहेर काढतील.हा समतेचा साविधानिक संघर्ष म्हणजे निसर्ग न्याय आहे.विजय भारतीय संविधानाचा होईल.पराभव विषमतेचा,
मनुस्मृतीचा होईल.
राजाराम पाटील-८२८६०३१४६३.उरण जिल्हा – रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *