
केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र नोंद असताना, ओबीसींसाठी स्वतंत्र “रकाना” ठेवण्यात आलेला नाही.ओबीसींची अचूक लोकसंख्या समोर यावी आणि त्यानुसार सामाजिक न्यायाची धोरणे आखली जावीत.यासाठी जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असलाच पाहिजे.या मागणीसाठी देशभर ओबीसी एकजुटीने लढा उभा करीत आहेत.ओबीसींमध्ये अनेक जाती देशात असल्याने वेगवेगळ्या ओबीसी जातीचे नेते आपापल्या जातींचे नेतृत्व हाती घेऊन या लढ्यात सहभागी होत आहेत. या सर्व नेत्यांचे मी राजाराम पाटील आगरी जातीतील कोकणातील एक छोटा कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो. त्यांच्या प्रयत्नाचे, धडपडीचे अभिनंदन करतो.
माझ्या आगरी कोळी जातीसह दुसऱ्या ओबीसी जातींच्या जागृतीसाठी मी एकत्र येऊन लढण्यास तयार आहे.ओबीसी जातींमध्ये जागृती नाही.हे वास्तव आहे.अर्थात ही जागृती करणे. हे अत्यंत कठीण कार्य आहे.विशेषतः ते मनुस्मृती नुसार चालणाऱ्या वैदिक हिंदू धर्माच्या चिकित्सेने चालणारे धाडसी कार्य आहे.हिंदू धर्मात प्रमुख ठिकाणी बसलेल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या बलाढ्य शोषक जातींच्या शोषणातून आपल्या शूद्र ओबीसी जातीला मुक्त करणारा नेता आम्हाला हवा आहे.असा नेता घडणे, घडविणे? म्हणजे आपल्या मृत्यूला,सर्वनाशाला आमंत्रण देणे आहे.मी हे माझ्या अनुभवावरून बोलत आहे.
देशातील सर्व साधनं,संपत्ती जमीन,जंगल,पाणी,समुद्र शिक्षण,राजकीय सत्ता,धर्मसत्ता,व्यापार केवळ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय १५टक्के लोकांकडे रहावा.वेद उपनिषदे मनुस्मृती पुराणे,रामायण महाभारत हे सारे ग्रंथ हाच गुलामीचा “संस्कार” आमच्या शूद्रांच्या अनेक पिढ्यांवर लादत आला आहे.या हिंदू धर्म शोषणाच्या षडयंत्राला समजून घेणे. हे जागृत मनाच्या मनुष्यास सहज शक्य आहे.अर्थात धर्माने लादलेली गुलामी हेच आमचे प्रारब्ध,नशीब,कर्मफळ, भाग्य आहे.अशी मानसिकता असलेल्या ओबीसींना हिंदू धर्माच्या शोषणाविरुद्ध लढायला लावणारे फार मोजके नेते आहेत.
ऋग्वेदाच्या “पुरुषसूक्त “ते मनुस्मृती सारख्या हिंदू धर्म शास्त्रांनी सांगितलेली कथा. “ब्राह्मण हे ब्रह्म देवाच्या मुखातून जन्मले,क्षत्रिय बाहुतून,वैश्य मांड्यातून आणि आम्ही “शूद्र “(ओबीसी) पायातून जन्मलो.” या मांडणीत आमची ८५ टक्के भारतीयांची गुलामी हिंदू विचारवंत मांडत आले.ती निमूटपणे स्वीकारून आपल्या जीवनाचा सर्वनाश करणारे ओबीसी,किती आले.किती गेले? यांची गणती नाही.परंतु या मानसिक गुलामिस आव्हान दिले.ते आई एकवीरा पुत्र तथागत गौतम बुद्ध यांनी, तसेच भगवान महावीर,चार्वाक ही अडीच हजार वर्षांपूर्वीची बंडखोर माणसे आहेत.देव नव्हेत.
अलीकडच्या काळात महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी असलेले ओबीसी जातीत अनेक महापुरुष आहेत.परंतु जागेच्या मर्यादेमुळे मी येथे आगरी जातीतील काही महत्वाची नावे सांगत आहेत.ओबीसी नेते दि बा पाटील,जनार्दन पाटील,ॲड जनार्दन कोठेकर यांनी ओबीसी जागृतीसाठी हिंदू धर्म “चिकित्सेने” ओबीसी लोकांना संघटित केले आहे.मुळात “ओबीसी आरक्षण” ही सामाजिक न्यायाची भारतीय संविधानाची राष्ट्रीय चळवळ आहे.वैदिक हिंदू धर्माने केलेल्या स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांच्या धार्मिक शोषणामुळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या पुढारलेल्या उच्चवर्णीय लोकांच्या सम पातळीत येऊन, जगण्याच्या संधीचे, समानतेच्या तत्वाने न्याय वितरण करणे.यासाठी “सामाजिक मागासलेपणाचे आरक्षण” खूप मोठ्या संघर्षाने आम्ही मिळविले आहे.
आजचा संघर्ष हा “सामाजिक आरक्षणाचा अधिकार” टिकविण्याचा आहे.मागास वर्गीयांचे आरक्षण संपविण्यासाठी सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यातील ब्राह्मण क्षत्रिय मराठा वैश्य जाती आक्रमकपणे पुढे येत आहेत.ओबीसी कुणबी दाखले काढून,घुसखोरी करू पाहणाऱ्या क्षत्रिय मराठा जातीचा,ओबीसींवर अन्याय अत्याचार,लूट,शोषण करणे.हा मनुस्मृती धर्मानुसार नुसार “क्षत्रिय स्वभाव” आहे.धर्माच्या राजकारणातून अशी लूट ब्राह्मण सुद्धा करीत आहेत.त्यांच्या सोबत लोढा अदानी अंबानी हे “वैश्य” लोक आहेत.
सत्य सांगितले तर ? ही या उच्चजातींचे लोक ज्या घाणेरड्या शिव्या देतात.खास करून आई बहिनीवरील शिव्या पाहता.ते स्त्री विरोधी, पुरुषसत्ताक उच्चवर्णीय आहेत.त्यावरून ते किती स्वार्थी आहेत.आपली धर्मसत्ता,राजसत्ता, अर्थसत्ता या देशावर,महाराष्ट्रावर कायम रहावी. हेच त्या ब्राह्मण मराठा वैश्य मनुपुत्रांचे यांचे ध्येय आहे.आम्हा आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी यांचा संघर्ष हा आमच्या अस्तित्वाचा,साविधानिक समतेचा,सामाजिक न्यायाचा संघर्ष आहे.जगात रंगभेद,वर्ण भेद,लिंगभेद,भांडवलदार,कामगार यांची गुलामी होती.ती दूर करण्यासाठी जगातले अनेक मानवतावादी विचारवंत पुढे आले.त्यामुळे आज जग सामाजिक न्यायाच्या दिशेने जात आहे.महाराष्ट्रातील मराठा, ब्राह्मण,वैश्य जातींच्या नेतृत्वास माझा प्रश्न आहे.कधी आगरी कोळी भंडारी कुणबी ओबीसी जातींनी तुमचे शोषण केले का?. की तुम्ही उच्चवर्णीय मराठा ब्राह्मण वैश्य आमचे करीत आला आहात?. सत्य समोर येऊ द्या.
जातनिहाय जनगणना झाली तर कुणाकडे किती जमीन? किती जंगल? किती पाणी? किती सत्ता? किती शिक्षण? किती धर्म मंदिरे ? किती उद्योग? आहेत.हे सत्य जगा समोर येणार आहे.सत्याची भीती वाटते. म्हणून देशातील ५२ टक्के गुलाम ओबीसी जातींचा “रकाना” भाजपा केंद्र आणि राज्य सरकार नाकारत आहे.दुसरीकडे जातींची जनगणना, लोकसंख्या, सामाजिक परिस्थिती न पाहता. उच्च जाती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य गरीब दाखवून “EWS” आर्थिक दुर्बल “ब्राह्मण क्षत्रिय वैश्य” आहेत. ही हास्यास्पद कथा पुन्हा सांगून, लोकसभेतील EVM सत्तेच्या जोरावर EWS आरक्षण घेतले आहे.यात संविधानाची मोडतोड झाली आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेत विधानपरिषदेत आजपर्यंत डझनभर मुख्यमंत्री,महसूल मंत्री,अर्थमंत्री,गृहमंत्री, दीडशेहून आमदार मराठ्यांचे झाले आहेत.त्यांच्या क्षत्रिय तलवारी समोर ब्राह्मणी जानवे झुकले ?

अदानी अंबानी वैश्य पैशासाठी लाचार झाले. (शरद पवार अदानी भेट) आणि.कधी SEBC मराठा आरक्षण ? तर कधी EWS मराठाआरक्षण,तर कधी खोटे कुणबी दाखले काढून ओबीसी घुसखोरी,तर कधी “पुढारलेल्या मराठ्यांना थेट शूद्र ओबीसी दाखले द्या” हा बालहट्ट धरणाऱ्या,सन्माननीय जरांगे पाटील यांच्यासारख्या असंवैधानिक मागण्या करणाऱ्या, मराठ्यांना सामाजिक न्याय सांगणार कोण?. (अर्थात मराठे हे महाराष्ट्रात सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत.) शोषित नाहीत.देशातील विषमता आम्ही समजून घ्यावी.ओबीसींना माझी विनंती आहे.माझे काही चुकत असेल? ते सांगा.
इंग्रज,पोर्तुगीज,मोगल,फ्रेंच यांचे आक्रमण त्यांनी लादलेली गुलामी वेगळी होती.त्यासाठी छत्रपती शिवराय यांच्या बरोबर आम्ही आगरी,कोळी,भंडारी,कुणबी,एससी एसटी ही सारी शूद्र अतिशूद्र स्त्रियां लढण्यात पुढे होतो.मनुस्मृतीने सांगितल्या प्रमाणे केवळ ब्राह्मण मराठा वैश्य शूर नसतात.खोटा इतिहास लिहिणाऱ्या उच्चवर्णीयांना नवे प्रबोधनपर लेख लिहून चोख उत्तर द्या ओबीसी बंधू भगिनींनो.
देशात जात निहाय जनगणना व्हावी.हा समतेचा न्याय आहे.त्यासाठी पैसा ,साधने हवीत. तुमचे सहकार्य हवे.तुमचा सहभाग हवा.हे मी नम्रपणे सांगतोय.२००५ पासून कुळ कायद्याचे आंदोलन चालवित आहे.त्यात मी माझा अनुभव सांगतो.आमची जमीन मालकीची लढाई ही ब्राह्मण मराठा वैश्य या जमीनदार जाती विरोधात आहे. आंदोलनात आमच्या बरोबर चालणारे कोकणातले कुणबी हे भूमिहीन शेतमजूर आहेत.तर मराठा हे सत्ताधारी जमीनदार शोषक आहेत.कुणबी मराठा एक नाहीत? हा आक्रोश कोकणातील विचारवंत कुणबी ओबीसी नेते.लवकरच आमचे मार्गदर्शक चंद्रकांत बावकर ओबीसींसाठी,नवे पुस्तक लिहून मार्गदर्शन करीत आहेत.
वर्तमानात धनगर ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके,माळी समाजाचे ओबीसी तरुण नेते ॲड.मंगेश ससाणे,ॲड मृणाल ढोले पाटील हे ओबीसींसाठी लढत आहेत.अर्थात ओबीसींचे असे अनेक तरुण लढत आहेत.ओबीसी नेते विजय वडेट्टीवार,माझे सहकारी भंडारी नेते मनोज माशेलकर.अनेकांची नावे देणे जागेअभावी कठीण आहे. त्या सर्वावर माझे खूप प्रेम आहे.परंतु आता नम्रपणे विनंती आहे.या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवा.यासाठी मला आपल्या सर्व प्रकारच्या मदतीची गरज आहे.खाली माझा मोबाईल नंबर देत आहे.उद्यापासून देश वाचविण्याचे,हे पवित्र कार्य याच जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत करूया.मृत्यूची भीती नाही.पराभवाची भीती नाही.ज्या मार्गाने फुले शाहू आंबेडकर गेले.तीच आम्हा शूद्रांची मोक्ष, मुक्ती,आणि निर्वाण आहे.सहकार्याच्या अपेक्षेत.आपला ओबीसी भाऊ.
राजाराम पाटील-८२८६०३१४६३.उरण,जिल्हा-रायगड.

