
देहू रोड येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1954 रोजी प्रथम बुद्ध रूप बसून धम्माचा प्रारंभ केला असे म्हणणे योग्य होईल,याच परिसरात म्हणजे तळेगाव दाभाडे येथे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 41 एकर जागा खरेदी केली होती व त्या ठिकाणी बंगला बांधून काही काळ त्यांनी त्या ठिकाणी घालावला होता. परंतु त्यांचे विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.सन 1960 रोजी बंगल्यास 41 एकर जागा ऍडमिनीस्ट्रेटर जनरल मुंबई यांनी विक्री केली होती.बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक तळेगाव दाभाडे येथे उभे राहावे यासाठी सहकार्य करा.ऍड.रंजना भोसले अध्यक्ष विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे यांनी जाहीर आवाहन केले आहे.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तळेगाव दाभाडे येथील स्मारकासाठीची चर्चा करण्यासाठी स्मारक समितीचे अध्यक्ष ऍड.रंजना रघुनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली व मान.यशवंत मानखेडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील प्रतिष्ठित नागरिक विविध क्षेत्रातील अधिकारी वर्ग सेवा नियुक्त अधिकारी तसेच विविध क्षेत्र कार्यात असलेले युनियनचे पदाधिकारी यांची एक बैठक रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी 11 वाजता बहुजन हिताय बौद्ध विहार,माता रमाबाई चौक सिद्धार्थ नगर कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आली होती.त्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.तथागत बुध्द व महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूज्य भन्ते अनोमदसी अखिल भारतीय भिक्खु संघ प्रज्ञाभूमी बोधगया गया,बिहार.यांनी त्रिसरण पंचशील दिले.मान्यवरांचा पंचशील शार्फ देऊन सत्कार करण्यात आला.
आम्ही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तळेगाव दाभाडे स्थापना 2004 ला करून कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता केवळ प्रशासकीय स्तरावर आठ वर्षे संघर्ष करून सन 2012 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव केलेल्या बंगल्याला सर्वांसाठी खुले करून नगरपरिषद तळेगाव दाभाडे यांच्या ताब्यात दिला आहे.आज रोजी तो सर्वांसाठी खुला असून या बंगल्याला दररोज आंबेडकर अनुयायी देशभरातून भेट देत असतात.अशी ऍड.रंजना रघुनाथ भोसले यांनी माहिती दिली.

पुढे त्यांनी सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानांना बंगल्या शेजारी भूखंड क्रमांक 29 ते 34 असून स्मारकासाठी आरक्षित करावे म्हणून आम्ही संस्थेच्या वतीने सन 2008 पासून तळेगाव दाभाडे महानगरपालिकडे सतत मागणी करीत आले आहे.तळेगाव दाभाडे नगर परिषदेने आमच्या मागणीनुसार दुसऱ्या नवीन सुधारित विकास योजनेच्या आखाड्यामध्ये वरील भूखंडावर आरक्षित करून महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले होते परंतु महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता 2013 रोजी रद्द केला आहे. तेव्हापासून आम्ही शासनाकडे भूखंड क्रमांक 29 ते 34 हे आरक्षित करावे म्हणून पत्र व्यवहार करीत आहोत परंतु शासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही किंवा बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक तळेगाव दाभाडे येथे उभे राहावे असे वाटत नाही.शासन प्रशासन आम्हाला प्रतिसाद देत नाही.याबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता.परंतु खोट्या आश्वासनाशिवाय काही हाती आले नाही.म्हणून आम्ही वरील भूखंड संस्थेच्या वतीने खरेदी करून त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारकासह बौद्ध प्रशिक्षण केंद्र वाचनालय (ग्रंथालय) भंतेनिवास,स्पर्धा परीक्षेचे वर्ग व इतर बरेचसे उपक्रम राबविण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे. ही सर्व जागा 29 गुंठे अर्थात पाऊन एकर आहे. व त्याची किंमत कोटीच्या घरात आहे आणि ती विकत घेण्याचा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे.हा ऐतिहासिक लढा केवळ तळेगांव दाभाडे च्या रहिवाशा पुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी त्यात तन-मन,धन देऊन सहकार्य करावे.जबाबदारी घ्यावी यासाठी अशा बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.आपणास विनंती तसेच आवाहन करते ते की याकरीता आपल्या सहकाऱ्याची आवश्यकता आहे.असे ऍड.रंजना भोसले अध्यक्ष यांनी सांगितले.
या बैठकीला सागर रामभाऊ तायडे पत्रकार साहित्यिक कामगार नेते,विनोद शामरावजी वावरे,दादासाहेब यादव,दिलीप शिवराम जाधव,अमोल जगधने,माधुरी सपकाळे,शशिकांत सावंत,ऍड.उदय रसाळ,शालिनी औचार,वसंत सपकाळे,परमानंद मेश्राम,राजीव साळवी,अविनाश जाधव,उदय रसाळ माजी नगरसेवक,भागवत बिराडे यांनी या कार्यक्रमास सहभाग घेतला.किसन थुल सचिव यांनी प्रास्ताविक केले,तर सुरेश श्रीपत जाधव यांनी सूत्रसंचालन केले, दादासाहेब यादव यांनी आभार मानले.विश्वस्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर समिती संचालक तळेगाव दाभाडे,दादासाहेब यादव,सुरेश श्रीपत जाधव,अँड.सुरज वासनिक यांची मुंबई समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सागर तायडे यांस कडून