
वृक्षारोपण करायचा विचार आला मनात रोपे लावण्यासाठी खड्डे खोदले घराच्या परसात.रोपांची निवड करताना पडलो मी गोंधळात.योग्य वाटली त्यांचीच मी निवड केली परसात. खड्ड्यांमध्ये खतपाणी घालून रोपांची लागवड केली.काळजी पूर्वक त्यांचं संगोपन केल्यावर आनंदाने डोलायला लागली.पावसाळ्यात त्यांना कोणतीच कमतरता जाणवली नाही.तोपर्यंत कधीच माझ्याशी रागावली नाही.सकाळी, संध्याकाळी दोन वेळा त्यांची भेट व्हायची.त्यांना आलेले फुटवे, फुले,फळ, पाहून मन आनंदाने भरून यायची.पाना फुला फळांनी रोपं बहरून आली .अनेक पक्षी,फांदीवर बसून मधूर आवाजात गाऊ लागली.मधमाश्यांची पोळी आणि पक्षांनी घरटी बांधली.पक्ष्यांच्या पिल्लांची गाण्यांची महिपील भरवली.पावसाळा, हिवाळा संपून उन्हाळा आला.जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला. तळपत्या उष्णतेच्या लाटा माझ्या अंगा खांद्यावर झेलतो.सर्व सजीवांना नेहमी माझ्या गडद सावलीच्या कुशीत घेतो .सजीवांची ताहन भागविण्यासाठी ढगांना पाझर फोडतो .पशूपक्षी प्राण्यांनी सोडलेली दुषित हवा शोषून घेतो.सजीवांना लागणारा प्राण वायूचा पुरवठा नेहमी निसर्गच करतो. अशुद्ध हवा एका ठिकाणाहून दुसरीकडे निसर्गच घेऊन जातो.पाचच मिनिटे निसर्गातील हवेचा पुरवठा बंद करतो.पाहू कोणता देव ऑक्सिजन चे सिलेंडर घेऊन,धावत येतो.निसर्गातील समतोल नेहमी मानव बिघडवतो.तरी देखील पर्यावरणाचे समतोल निसर्गच राखतो.माणूस अनेक हत्याराने माझ्या कत्तली करतोय.सर्व प्राण्यांमध्ये स्वतःला अती बुध्दीमान समजतोय. माझ्या कत्तली केल्या तरी जबाबदारी कधी नाही टाळली.पुन्हा नव्याने जोमात फुटवे घेऊन तुमची सेवा केली.जगण्याच्या प्रयत्नांसाठी एक एक पाने गळून पडली. पानांमुळे रोपं पोरकी होवून अनाथ झाली.पाण्यावाचून तडफडून पानं सुकून गेली.सावली नष्ट झाल्याने पशूपक्षी शेजारी ही नाही आली. पालनकर्त्याच्या नावाने ओरडू लागली.आमचं संगोपन करता येतं नसेल तर कशाला लावली.माझी सावली,हवा, फळांचा लाभ घेतांना लाज नाही का वाटली. त्यांच्या सानिध्यात गेल्यावर मला जाब विचारु लागली.मी त्यांची दोन्ही हाताने माफी मागितली.माझी काय चूक पाण्याची कमतरता सर्वत्रच जाणवू लागली. रोपांची अवस्था पाहून मनात वेदनाची काहीली झाली. डोळ्यांतून अश्रुंची धार वाहू लागली.रोपाच्यावर गंभीर परिणाम होवू नये यांची दक्षता घेतली. मिळेल तेथून पाणी घालून वाचविण्यासाठी धडपड केली.जगण्यासाठी रोपांनी मेघ राजाकडे यातना केली.मेघ राजाला ही रोपांची कीव येवून पाऊसाची सरी धावून आली.अवकाशातील गंगा धरतीवर धावून आली.धरणीमाता पावसाने भिजून ओलीचिंब झाली.शेवटी प्रयत्नांच्या यशाची रोपांना पालवी फुटली.निसर्गातील सृष्टी हिरवी साडी नेसून नव्या नवरी सारखी नटली.प्रत्येक पशूपक्षी,जीवजंतू आनंदित झाली.हिरव्या गार मखमली गालिच्यावर आनंदाने नाचू लागली.
देशमुख पी.आर.9921111955