नाही व्हायचं गुंडासमोर षंढ,चला पुकारू कायदेशीर बंड

बातमी शेअर करा.

सुज्ञ भारतवासियांनो,

  आज देशभरात हिंसाचाराच्या घटना प्रतिदिन दृष्टिपथात येत आहेत.कधी राजकीय वरदहस्त असलेल्या गावगुंडाकडून एका भारतीय नागरिकाचे हाल हाल करुन त्याची अमानुषपणे हत्त्या केली जाते.तर कधी मंदिरात प्रवेश केला म्हणून एका ठराविक समुदायातील व्यक्तीला गरम लोखंडी सळईने त्याच्या पार्श्वभागावर अमानुषपणे चटके दिले जात आहेत.मागील काही दिवसांपासून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील या अमानवीय घटनांचा पाढा प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं आपल्यापर्यंत पोहचवित आहेत. या घटना अनेकांच्या काळजाचा वेध घेत असतील याबाबत कुणालाही तिळमात्र शंका नसावी.प्रसारमाध्यमं या गावगुंडाचे उदात्तीकरण करीत आहेत की हिंसक घटनांचे हा यक्षप्रश्न आपल्यासारख्या बहुसंख्य मानवतावादी आणि कायद्याला मानणाऱ्या सुज्ञ नागरिकांसमोर आ वासून उभा राहिलेला आहे. 

   आपल्या देशाचे संविधान आपण १९४९ला भारतीय संविधान अंगिकृत आणि अधिनियमित करुन स्वत:ला अर्पण केलेले आहे.आज संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झालेली आहेत.संविधानातील विविध मूलभूत अधिकारांपैकी अनुच्छेद २१ जो कि देशातील हरएक नागरिकाला जगण्याचा अधिकार बहाल करीत आहे.जगणे म्हणजे फक्त श्वास नसून मानवाला त्याच्या सर्वांगीण उत्थानाकरीता आवश्यक त्या सर्व बाबींचा यात समावेश आहे.जसे की संविधानाचा अनुच्छेद २१ हा जगणे आणि व्यक्ति स्वातंत्र्य अबाधित राखण्याची जबाबदारी स्विकारतो.तर अनुच्छेद १४,१९ मध्येही मानवाच्या सर्वांगीण विकासाला अधोरेखित केलेले आहे.जसे की सर्वांना स्वच्छ वातावरण,स्वच्छ पाणी,योग्य शिक्षण,कलागुणांना चालना देण्याकरीता समान संधी, बौध्दिक विकासाची संधी,नोकरी करण्याची आणि रोजगार निर्मिती करण्याची संधी, देशात कुठेही संचार करण्याची संधी, विचार व्यक्त करण्याची संधी आणि समाजात निर्भयपणे जगण्याची संधी. मूलभूत अधिकारांची आपणाला संविधानाने लेखी हमी दिली असली तरी त्याची अंमलबजावणी करणे देखील आपल्याच हातात आहे. कारण ”आम्ही भारताचे लोक“ या संविधानाच्या सरनाम्यातूनच आपण सर्वांनी संविधानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्विकारलेली आहे.प्रशासन आपलं जीवीत आणि मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी कायदेशीररित्या स्विकारत असले तरी “आम्ही भारताचे लोक” म्हणून आपण आपली जबाबदारी स्विकारण्याची वेळ आता आलेली आहे.म्हणून मर्जी संघटना राबवित असलेल्या ’शोषणमुक्त भारत अभियाना“सोबत जुडून आपण आपल्या शहरात,गावात,वाड्या-वस्तींवरील अन्यायग्रस्तांना मदत करण्याकरीता पुढे या.जर स्थानिक गुंडाचे स्तोम माजले असले,जातीय मानसिकतेने डोके वर काढले असेल,दडपशाही,गुंडशाही,झुंडशाही अंमलात आणून ते जर आपल्या मूलभूत अधिकारांचे हनन करत असतील आणि समाजात निर्भयपणे जगण्याचा आपला अधिकार हिरावून घेत असतील तर अशा दुष्ट कृत्याची माहिती आपण मर्जी संघटनेला देऊ शकता.समाजातील कोणत्याही घटकावर शारीरिक,मानसिक, आर्थिक,बौध्दिक,सांस्कृतिक,धार्मिक,सामाजिक अन्याय अत्त्याचार झाला असेल तर षंढासारखे थंड न पडता आपण अन्याय अत्त्याचारग्रस्तांसोबत उभे राहा. पीडीतांना उघडपणे मदत करण्याची आपली तयारी नसेल तर मर्जी संघटनेपर्यंत अन्यायग्रस्तांना पोहचविण्याची जबाबदारी पार पाडा.आपण खाली दिलेल्या वेबसाईट,ईमेलवर अन्यायग्रस्ताची माहिती भरून पाठवा.अन्यायाचे स्वरुप आणि अत्याचार करणार्या समाजकंटकांची त्यात माहिती नमूद करा.

मंगेश सोनवणे 

संपर्क : शोषणुक्त भारत अभियान 

पत्रव्यवहाराचा पत्ता : १६ए, कुर्ला कामगार नगर को.ऑप.हौ.सो.,नंदिकेश्वर मंदिरासमोर,कुर्ला (पूर्व), मुंबई – ४०० ०२४.

संपर्क : ९६१९३३६९८०,९००४५९२१३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *