
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनामध्ये चढ उताराचा रस्ता चालत असताना विविध आजारांचा सामना प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त प्रमाणात करावा लागतो.त्याच्या आयुष्यात वैद्यकीय सेवा घेण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते.औषध उपचारांच्यासाठी दवाखान्यात प्रसंगानुसा दाखल व्हावे लागते.दवा म्हणजे औषध आणि ती घेण्यासाठी विविध आजारांवर तज्ञ स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार पद्धती घेण्यासाठी दवाखान्यात दाखल व्हावे लागते.दवाखान्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आजारी व्यक्तीची सेवा किंवा देखरेख करण्यासाठी नियमितपणे वेळेनुसार औषध उपचार देण्यासाठी दवाखान्यात आरोग्य सेविका व सेवकांची.पगारी नियुक्ती करण्यात आलेली असते.
डॉ. प्रभाकर केले हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरे चे ‘KLES’ बेळगाव येथे मला प्रायव्हेट सेक्सन बी 3 रुम नंबर 305 येथे वैद्यकीय सेवेसाठी दाखल करण्यात आले होते.सध्या माझं वय वर्षे 72 (बात्तर) रनिंग चालू आहे.आजपर्यंतच्या इतर ठिकाणच्या दवाखान्यातील आलेल्या अनुभवा पेक्षा KlES. दवाखान्यात प्रवेश केल्यापासून जी आदरयुक्त विचारपूस केली जाते.तसेच दावाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पासून ते सर्वंच वैद्यकीय स्टाफ अगदी घरच्या रक्तातील नात्या पेक्षाही अधिक आपुलकीने, विचारपूस करून वेळच्या वेळी रात्रंदिवस परुग्णांची (दक्षता) काळजी घेतली जाते.त्यामुळे आजारी माणसाला झालेल्या आजारापासून बरं वाटायला मानसिकदृष्ट्या अधिक बळकटी किंवा प्रोत्साहन मिळते.तेथील एकंदरीत सर्व व्यवस्थापन.पाहून अंत्यंत समाधान मिळते.खरोखरचं मला मिळालेल्या सेवेबद्दल आणि आपुलकीने दिलेल्या बद्दल सर्वच स्टाफला माझा कोटी कोटी प्रणाम.
एक गोष्ट मात्र माझ्या मनाला चटके देत होती.दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना ने आन करण्यासाठी ज्या महिला आहेत. त्या अत्यंत वयोवृध्द असल्याचे निदर्शनास आले.मी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर खुर्चीवर बसवून ती खुर्ची ढकलून जी महिला नेत होती.तो प्रसंग पाहून मी त्या मावशीला विचारले आपल्याला मुलं आहेत का?. मग ती आपली सर्व परिस्थिती सांगू लागली.ते ऐकून मनात अनेक विचारांची घुसळण सुरू होवू लागली.घरातून आणलेला जेवणाचा डब्बा देखील खायला वेळ मिळत नाही.जेवतांना डब्बा येथेच ठेवून हाक दिली की जावे लागते.हे तिच्या तोंडून शब्द ऐकून मनात विचार आला की माणसाला परिस्थिती कारणीभूत ठरते.
इतर दवाखान्यातील आलेले अनुभव खाजगी दवाखान्यात दाखल होताच प्रथम आर्थिक परिस्थितीचा प्रथम अंदाज घेतला जातो.त्यांची शेती,उन्हाची म्हणजे बागायत जमिन,व्यवसाय,नोकरी यांच्या माध्यमातून त्याच्या आर्थिक उत्पन्नाचा अंदाज घेऊन मग पुढील टिटमेंट ठरविली जाते.वैद्यकीय अधिकाऱ्यांना दुसऱ्या निदान केंद्रात जाऊन निदान केलेले निदान रिपोर्ट चालत नाहीत.या मागचं गौडबंगाल काय?.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलेली औषधे त्यांच्याच मेडिकल मध्यून खरेदी करायची आणि ती औषधं त्यांच्या कर्मचाऱ्यांना दाखवून मगच बाहेर यायचे.मेडिकल, टेक्नॉलॉजी एक्सरे,प्रयोगशाळा सर्व कांहीं त्यांच्याच फक्त आपण सांगितलं त्या प्रमाणे भरलेला खिसा मोकळा करायचा एवढेच आपल्या हातात.बाकीचं नियोजन त्यांच्या हातात.कारण रिपोर्ट तयार करणारे आणि (लॅब वाले) लायब्रोट्रीवाले निदान किंवा रिपोर्ट तयार करून देणारे एकमेंकांच्या संगनमताने रिपोर्ट तयार करून रुग्णांचे आर्थिक शोषण करण्यासाठी मानसिक व भावनिक वातावरण निर्माण करत असल्याचे दिसून येते.शासनाने सर्व सामान्य माणसाला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्या देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी यंत्रणा सक्षम पाहिजे.ती दिसून येत नाही.
शासकीय रुग्णालयात आपली जबाबदारी टाळण्याचा जास्ती जास्त प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास येते. शासकीय रुग्णालयातील यंत्रणा.जेणे करुन खाजगी दवाखान्यात पाठवून देण्यासाठी सर्रास प्रयत्न करत असतात सदरच्या खाजगी रुग्णालयात दाखल होतानाच विचारले जाते आपणास येथे कोणत्या डॉक्टरांनी पाठवून दिले आहे. त्यांचे नांव काय आहे.याची कटाक्षाने नोंद घेतली जाते.आणि संबधित डॉक्टरांना पाठवून दिलेल्या रुग्णालयातील झालेल्या एकूण बिलातून ठरावीक रक्कम टक्केवारीत दिली जात असल्याचे समजते.आजकाल सर्रास हा व्यवसाय सुरू झालेला आहे.ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.त्यांनी दवाखान्यात दाखल व्हावे.नाही तर सर्व सामान्य माणसाला आजच्या परिस्थितीनुसार शेती जमिन घरदार विकायची पाळी येते.
अलीकडे शासकीय दवाखान्यात किंवा कांहीं खाजगी दवाखान्यात औषध उपचार घेण्यासाठी दाखल झाल्यानंतर तेथील रुग्णांच्या व्यवस्थेसाठी किंवा देखभालीसाठी पगारी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कडून सर्व सामान्य रुग्णांना फार विचित्र अरे राविची वागणुक कांहीं ठिकाणीं अनुभवायला मिळत असल्याचे दिसून येते.आणि त्या वागणुकिला कंटाळून रुग्ण स्वतः हून खाजगी रुग्णालयाकडे वळतात.सर्व सामान्य माणसाला शासकीय रुग्णालयात सहानुभूती पुर्वक वागणुक मिळत नसल्यामुळें रुग्णालयातील रुग्णांना येणाऱ्या अनुभवांना सामोरे जावे लागते.अशा कर्मचाऱ्यांना “सेवा” या शब्दाचा अर्थाशी कांहीं देणं घेणं नसतो तर त्यांना टाईमपास करुन पगाराशी मतलब असल्याचे दिसून येते.तेथील अनुभव पाहून असे मनात विचार येतात.की यांची नियुक्ती रुग्णांची सेवा करण्यासाठी प्रामुख्याने केलेलीं आहे का?. पगार मिळतो म्हणून टाईमपास करण्यासाठी हा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आजारी माणसांचा आजार कमी होण्याऐवजी स्वखर्चातून मानसिक ताण वाढून विकत आजार घेतल्याचं वाटायला लागते.
विविध शासकीय योजना! सर्व सामान्य नागरिकांना शासकीय योजनांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.त्या*शासकीय योजनांच्या माध्यमातून होणारी शासकीय लूट ग्रामीण भागात प्रामुख्याने म्हणतात की शहाण्यांनी कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये.पण काय करणार म्हणतात ना!अडला नारायण धरी गाढवाचे पाय.अशी अवस्था झाली आहे. परिस्थितीनुसार माणसाला गाढवाचे ही पाय धरावें लागतात.शासनाने सर्व सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात सेवा घेता यावी म्हणून अनेक सुविधां शासनाच्या माध्यमातून विविध योजना चालू केलेल्या आहेत.पण कांही रुग्णालयामध्ये निदान केंद्र रुग्णालयाच्या निवासस्थानी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली आणल्यामुळे बोगस रिपोर्ट तयार करून.सर्व सामान्य जनतेच्या नावावर शासकीय योजनांची लुटमार करीत असल्याची चर्चा सर्वत्र होत असल्याच्या शंका वर्तविली जात आहे.रूग्णालये ही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैज्ञानिक ठिकाण आहे.त्या ठिकाणी.सर्व सामान्य माणसाचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी प्रामुख्याने केला गेला पाहिजे.तसं न करता बऱ्याच ठिकाणी सर्व सामान्य माणसाला भावनिक तेच्या जाळ्यात अडकविण्यासाठी रुग्णालयात दाखल होतानाच समोरच्या बाजूला मोठ्या देव देवतांच्या मूर्ती दिसून येतात.यामुळे रुग्ण मानसिक दृष्ट्या भावनिक वातावरणाच्या आहारी जात असल्याचे दिसून येतात.
वैद्यकीय क्षेत्रातील शस्त्रक्रियापासून ते औषध उपचार पद्धती मध्यील सर्वस्वी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारीच असू शकतात.शेवटी रुग्णांना सांगण्यात येते की माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलेले आहे.आता बाकीचे वरच्याच्या हातात म्हणून पळवाट शोधली जाते.वरच्याच्या. हातात सर्व काही असते ! तर रुग्णालयात दाखल व्हायची गरजचं काय? सर्वजण रुग्णालयात दाखल होण्या ऐवजीं मोठ मोठ्या मंदिरात रुग्ण दाखल झाले असते.बरं का ?. रुग्णालयामध्ये रुग्णांचे मानसिक मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतांनाच काही रुग्णालयात रुग्णांचे मनोधैर्य खचिकरण करीत असल्याचे दिसून येते.माणसाला सर्व संकटातून वाचवणारा एकमेव धैर्य असतो.धैर्य खचला की त्याला कोणी वाचवू शकणार नाही.म्हणून धैर्य खचू न देणे सर्वात महत्वाचे आहे.ज्या गोष्टी अस्तित्वातचं नाहीत त्यांच्या पाठिमागे लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येते.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णालयात “रुग्णांची सेवा हाच मानवता धर्म” माणून सेवा करण्याची खरी गरज आहे.सेवेच्या नावाखाली निव्वळ पैसा मिळविण्याच्या हव्यासापोटी रुग्णालयातील आर्थिक शोषण होताना दिसते.अरे माणसा माणसा या धरतीवर आपण सर्वजण चार दिवसाचे भाडोत्री आहोत याची जाणीव असू द्या!येताना मोकळे,जातानाही मोकळे.जिंवतपणी केलेले चांगले किंवा वाईट कर्म मागे ठेवून जाणार आहोत.जो जगासाठी जगला तो कायमचा कार्य रुपी जगला.जो स्वतः साठी जगता तो कायमचा मेला.तेंव्हा तूच ठरलं माणसा कोणासाठी जगायचं?.रुग्णांचे शोषण थांबविण्यासाठी उपाययोजना करणे काळाची गरज आहे.मानवतावादी दृष्टिकोनातून सेवेचं व्रत स्वीकारने आवश्यक आहे.
देशमुख पी.आर- 9921111955

