
(१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले)
१) बुद्ध विहार हे एक ज्ञानपीठ असल्याचे मानवी जीवनाचे संस्कार केंद्र आहे.
२) बुद्ध विहारात गेल्याने जिज्ञासा वाढते त्यामुळे त्याला कोणतेही भोंदू माणसे लुटू शकत नाही.
३) बुद्ध विहारात जाणारा देवाला नवस बोलत नाही.त्यामुळे तो कर्जबाजारी होत नाही.म्हणून त्यांच्या घरात नेहमी आनंदी आनंद असतो.
४) बुद्धविहारात गेल्याने मन स्वच्छ होते,स्थिर होते,त्यामुळे त्यांला कोणत्याही मानसिक आजार होऊ शकत नाही.
५) बुद्धविहारात गेल्याने मानसिक आजारातून मुक्त होण्यासाठी मेडिटेशन इज मेडिसिन आहे.
६) बुद्ध विहार हे शांतीचे प्रतीक आहे.व बुद्धविहार हे बुद्धीचे भंडार आहे.
७) बुद्ध विहारात जाणारे उपासक,उपासिका कोणत्याही देवी देवाला मानत नाहीत.
८) बुद्ध विहारात जाण्याने चिकित्सक वृत्ती वाढते व जीवनातील सर्व मनो कामना पूर्ण होतात.
९) बुद्ध विहारात जाण्याने चित्त शुद्ध होते व एकाग्रता वाढते.
१०) बुद्धविहारात गेल्याने एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते.
११) बुद्धविहारात गेल्याने मान सन्मान प्राप्त होतो व मनुष्य विनयशील होतो.
१२) बुद्धविहारात गेल्याने मनावर चांगले संस्कार होतात.
१३) बुद्धविहारात गेल्याने समाज जागृती कार्य घडते.
१४) बुद्धविहारात गेल्याने आदर्श व्यक्ती बनतो.
१५) बुद्ध विहारात गेल्याने जाती धर्माच्या सर्व मानव कल्याणासाठी कार्यरत होतो.
१६) बुद्ध विहारात गेल्याने जातीय भावने ऐवजी राष्ट्रीय भावना मनामध्ये जागृत होते.
१७) बुद्ध विहारात गेल्याने सर्वांना मानसिक,बौद्धिक आणि वैचारिक विकास साधता येतो.
१८) बुद्ध विहारात गेल्याने मानव व प्राण्या विषयी आदर प्रेम,करुणा व मैत्री निर्माण होते.
१९) बुद्ध विहारात गेल्याने मनात शुद्धता निर्माण होऊन संशयाची भावना कमी होते.
२०) बुद्ध विहारात गेल्याने सर्वजण एकत्र येतील व महामानवांच्या कार्याचे चर्चा होऊन चळवळीचा इतिहास जिवंत राहतो .
२१) बुद्धविहार हे सर्व बहुजन हितासाठी व सुखासाठी आहे.
२२) बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांनी बुद्ध विहारात दर रहिवारी जाण्यास सांगितले होते .
भदंत अनोमदसी मोबाईल -७६७८०३१७०३.
अखिल भारतीय भिक्खु संघ प्रज्ञाभूमी बोधगया गया,बिहार.
