
विशेष प्रतिनिधी वर्धा- जि.प.शिक्षकांमधून केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती करण्यात यावी या एकमेव मागणीसाठी स्वतंत्र समता शिक्षक संघाने निवेदन व चर्चेद्वारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉ.नितु गावंडे व डॉ.धर्मपाल कुमरे यांच्याशी पाठपुरावा करण्यात आला होता.परंतु कार्यालयाच्या कामात गती मिळाली नाही. दि.10 जूनला नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन व नवनियुक्त शिक्षणाधिकारी डॉ.महेंद्र गजभिये यांच्याशी चर्चा करून उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.तरीसुद्धा पदोन्नतीच्या कामात अपेक्षित वेग आला नव्हता.एक महिन्यानंतर निवडणूक व आचारसेहिता तसेच जनगणनेच्या कामामुळे आतासुद्धा पदोन्नती मिळणार नाही अशी शिक्षकांमध्ये भीती निर्माण झाली होती.परिणामी प्रशासनाच्या चालढकलपणामुळे अनेक शिक्षक पदोन्नती न होता सेवानिवृत्त झाले असते.
त्यामुळे मंगळवार दि. 29 जून या नागपंचमीच्या सणापासून स्वतंत्र समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गौतम पाटील यांचे नेतृत्वात आमरण उपोषण व दररोज पाच शिक्षक साखळी उपोषणाला बसले होते.यादरम्यान सचिन शंभरकर यांचे नेतृत्वात स्वतंत्र समता शिक्षक संघाचे तर लोमेश वराडे यांचे नेतृत्वात प्राथमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळ शिक्षणाधिकारी यांच्याशी भेटून उपोषणाची गांभीर्यता निदर्शनास आणून दिली. त्यामुळे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षणाधिकारी डॉ.महेंद्र गजभिये व संबंधित लिपिक यांनी उपोषणकर्ते गौतम पाटील,राज्य अध्यक्ष सुनील तेलतुंबडे व सचिन शंभरकर तसेच संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्यासोबत पदोन्नतीच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली.शिक्षण विस्ताराधिकाऱ्याच्या सात पदोन्नतीमध्ये दिव्यांगांना सामावून घ्यायचे असल्याने सन 2016 पासून रोस्टर तपासण्यास व आक्षेपास दहा दिवसाच्या कालावधीवर सहमती झाली.

याप्रमाणे आठ ऑगस्टपर्यंत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे आदेश काढण्याचे लेखी आश्वासन प्राप्त झाले. तसेच केंद्रप्रमुखांच्या नवीन अध्यादेशामुळे प्रक्रियेला गती देऊन 29 ऑगस्टला पदोन्नतीचे आदेश शिक्षकांना देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांनी घेतले.त्यानंतरच आमरण उपोषण पुढील एक महिन्यासाठी स्थगित केल्याची घोषणा केली.शिक्षणाधिकारी डॉ.गजभिये यांनी गौतम पाटील यांना ज्यूस पाजून उपोषण स्थगित केले.उपोषणाला वेळोवेळी बळ देण्यासाठी लोमेश वऱ्हाडे व अरुण झोटिंग यांचा प्राथमिक शिक्षक संघ,प्रफुल कांबळे व प्रमोद खोडे यांची जुनी पेन्शन हक्क संघटना,रवींद्र खेडकर व अजय इंगोले यांची पदवीधर संघटना,रमेश वानखेडे व आम्रपाल कांबळे यांची कास्ट्राईब कर्मचारी संघटना,जानराव ठोंबरे व सुधाकर जुनघरे यांची बामसेफ संघटना,डॉ.गोपाल थुल व माणिक कांबळे यांची जेष्ठ नागरिक संघटना, राजू थुल व राजेंद्र भोयर यांच्या नेतृत्वातील सेवानिवृत्त संघटना,माया चापले व रवींद्र इखार यांच्या नेतृत्वातील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना,ललित बरसागडे यांच्या शिक्षण विस्तार अधिकारी संघटनांचा पाठिंबा मिळाला.तसेच साखळी उपोषणाला बसलेले सचिन शंभरकर,गौतम वासे,रवींद्र खेडकर, सुनील तेलतुंबडे,गौतम सोनटक्के,संजय मून,गंगाधर भगत,पुष्पराज झिलटे,प्रयोग तेलंग,गोपाल ताजने,घनश्याम थुल,नरेश नगराळे,दिलीप वावरे,महेंद्र आडे,प्रकाश पखाले,संजय गावंडे इत्यादींचे सहकार्य मिळाले.
गौतम पाटील- ९४२३१२०४५९,
अध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघ
