
विशेष प्रतिनिधी – हे पुस्तक म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनाचा व त्याने उभ्या केलेल्या संघर्षाचा जसा इतिहास आहे. तसाच ज्या तीन शस्त्राने त्यांनी संघर्ष उभा केला व प्रतिगामी शक्तींशी लढा दिला त्या तीन संस्थांच्या बामसेफ,डी एस फोर व बसपा यांचाही आरंभापासून आजवरचा इतिहास आहे आणि हा इतिहास कुणा त्रयस्थाने इकडून तिकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारलेला नाही तर कांशीरामजी यांच्याबरोबर सुरुवातीपासूनआजतागायत ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं व या संस्थांच्या उभारणीत त्यांच्या वृद्धीत व आजवरच्या प्रवासात ज्यांनी प्रत्यक्ष सक्रिय भाग घेतला,त्यांनी लिहिला आहे. हे अनुभवाचे बोल आहेत यात नमूद केलेल्या सर्व घटना लेखक प्रत्यक्ष जगला आहे. या घटनांच्या तपशीला बद्दल वा त्यांच्या अन्वयार्थाबद्दल शंका किंवा मतभेद असू शकतील. परंतु त्यांच्या सत्यतेबद्दल शंका घेण्यास वाव नाही हे पुस्तक म्हणजे लेखकाचेही आत्मचरित्र आहे अशा तऱ्हेची पुस्तके समाजाला फार काही शिकवून जातात म्हणून त्याची समाजाला नेहमीच गरज असते या विषयावरील ही गरज भागवल्याबद्दल प्रथमत: डॉ.सी.पी.थोरात यांचे अभिनंदन केलं पाहिजे-न्यायमूर्ती पी.बी.सावंत माजी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण प्रबोधिनी आयोजित डॉ.सी.पी.थोरात लिखित व आर्ष पब्लिकेशन्स पुणे तर्फे प्रकाशित कांशीराम मनुवादापुढचे आव्हान या ग्रंथाचे प्रकाशन व परिसंवाद शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५,सायंकाळी ५ वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह,पहिला मजला,ठाणे महानगरपालिका मुख्य कार्यालय पाच पाखाडी ठाणे वेस्ट,येथे होणार आहे,प्रमुख वक्ते मा.प्रवीणदादा गायकवाड,अध्यक्ष मा.प्रा.विजय मोहिते,विशेष उपस्थिती मा.डॉ.सी.पी. थोरात आणि परिसंवाद वक्ता मा. विनोद निकाळजे प्रमुख ईशान्य भारत रिपाई (आठवले),मा.सत्यजित साळवे उपाध्यक्ष आझाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य,मा. सिद्धार्थ मोकळे प्रमुख वंचित बहुजन आघाडी,मा.डॉ.आशिष तांबे प्रमुख बसपा ठाणे जिल्हा. स्वागत अध्यक्ष मा.राजेश पवार,सूत्र संचालन मा.प्रदीप सावंत प्रास्ताविक मा. एड.संदीप जाधव,आभार मा.दिपिका आंग्रे करणार आहेत. तरी या ग्रंथाचे प्रकाशन व परिसंवाद सोहळ्यात जागरूक वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागत अध्यक्ष मा.राजेश पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण प्रबोधिनी च्या वतीने केले आहे.