
सध्या आपल्या देशातील सर्व सामान्य मतदारांना खुष किंवा आकर्षक करण्यासाठी शासकीय तिजोरीतील पैसातून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत.या योजनांमुळे कष्ट करण्याची ज्यांच्याकडे शारीरिक क्षमता किंवा प्रकृतीने सुदृढ आहेत.ते श्रम करण्या पासून आळशी प्रवृत्तीच्या आहारी दिवसेंदिवस जाताहेत.बिनकष्टाचे बसून खाण्याची सवय निर्माण निर्माण झाली की त्यांची कष्ट करण्याची प्रवृत्ती हळूहळू नष्ट होत जाते.शेतात शारीरिक श्रम करण्याची मानसिकता बदलून आळसी प्रवृत्ती वाढीस लागते आणि तो मानसिक्त गुलाम बनतो.शारीरिक कष्टाचे महत्व कमी होण्यास मदत होवू लागले! बिन कष्टाचे मिळाल्याने व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाच्या विळख्यात सापडतो.
एकीकडे शासन व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.तर दुसरीकडे.गल्ली बोळात सरकारी दारुची दुकान सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात मग्न दिसते.म्हणजे शासनाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे दिसून येतात.कोणत्याही योजना राबविताना त्यांच्या दुरगामी परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.आणि त्या योजनांच्या मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सातत्यानं अभ्यास पुर्वक प्रयत्न केले पाहिजे.
पंतप्रधान कृषी,योजना या योजना प्रत्यक्षात राबविण्यात येतात त्यावेळी शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून अंमलबजावणी करताना पारदर्शकता पाहिजे ती दिसून येत नाही.शासकीय नोकरी करणारी व्यक्ती ही शेतीचा सातबारा उतारा जोडून लाभ घेण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात.त्यामुळे खरोखरच जे गरजू आहेत ते योजनेपासून वंचित राहतात.जे लोक सुज्ञ सुशिक्षित आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तेच लोक खोटी कागदपत्रे सादर करून शासकीय योजनांचा गैर फायदा घेऊन शासनाची दिशाभूल करत असल्याचे दिसून येतात.
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीची योजना चालू करतांना ज्या अटी किंवा नियमावली तयार करून त्यांची योग्य ती अमल बजावणी न केल्यामुळे अनेकांनी त्याचा गैरफायदा घेतला.दर महिन्याला दिड हजार रुपये,मिळत असल्याने अनेक नोकरदारांच्या चार चाकी गाड्या,बंगले,यांच्या पत्नी,सुन,कुंटुबातील अनेक महिलांनी या योजनेचा फायदा करून घेण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने योजनाची लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहेत.बरेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरातील महिलाही या लाभार्थींच्या यादीत नावे दिसून येतात.विशेष म्हणजे या यादीत पुरुषांनी या संधीचा फायदा घेतलेला दिसून येत आहे.तेव्हा यादींची खरोखरच शासनाला तपासणी करायची असेल ! तर अंगणवाडी सेविकांच्या मार्फत शोध मोहीम न राबविता शासकीय सक्षम कर्मचाऱ्यांच्या मार्फतच करावी लागेल! कारण अंगणवाडी सेविकांच्या वर अनेक दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे.असे दिसून येते.
अशा योजनांच्या मुळे माणसांची श्रम करण्याची प्रवृत्ती हळूहळू नष्ट होईल आणि याचे दुरगामी परिणाम होवून देशाची सामाजिक परिस्थिती अतिशय बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोणत्याही योजना राबविताना त्यांच्या होणाऱ्या दुरगामी परिणामांचा विचार केला गेला पाहिजे.माणूस हा नेहमी सवयीचा गुलाम बणत असतो. एकदा कष्ट न करण्याची सवय झाली तर त्याची काबाड कष्टाची क्षमताच नष्ट होवून तो कायमचा श्रम करण्यासाठी वांझोटा होईल! विविध मार्गांनी चार वर्षे नागरिकांची लुटालूट करायची.निवडणुका जवळपास आल्यावर मग मतदारांना लाचार किंवा गुलाम बणविणाऱ्या वांझोट्या योजनेच्या महापूर रात बुडवून काढायचं.लाडक्या बहीणी झाल्या.आता लाकडी आई.लाडकी वैणी,लाडका बाबा,लाडका भाऊ,जावई,सासरा, अशा मतदारांना क्षणिक आकर्षित करण्यासाठी भविष्यकाळात कोणतीही योजना सुरू करण्यात येतील! यालाच म्हणतात मतदार झुकता है ! उसको झुकानेवाला चाहिए !!

आपला देश हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशाची भौगोलिक दृष्ट्या परिस्थिती अतिशय उत्तम आहे.पावसाळा,हिवाळा,उन्हाळा हे तीन ऋतू भारत भुमातेला लाभलेले आहेत.याचा फायदा करून घेण्यासाठी नागरिकांच्या हाताला कामधंदा किंवा रोजंदारी उपलब्ध करून दिली पाहिजे.प्रत्येक व्यक्तीच्या अंगात उपजत कलागुण असतात त्या उपजत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग धंदे उपलब्ध करून त्यांच्या हाताला काम करण्यासाठी रोजंदारी ची संधी उपलब्ध करून दिली तरच नेहमी माणसं कामात गुंतून राहिल्याने त्यांच्या शारीरिक श्रमातून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल.तसेच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल!
जगामध्ये इतर देशांना तीनही ऋतू लाभलेले नाहीत.तरी देखील त्या देशांची झपाट्याने प्रगती होत असल्याचे दिसून येते.कारण ते प्रयत्नाला,विज्ञानाला,विवेकाला आणि श्रमाला प्राधान्यक्रम देतात.आळस,अज्ञान अंधश्रद्धा हे खरे माणसाचे तीनं शत्रू आहेत.माणसाला स्वावलंबी जीवन जगायचं असेल तर या तीन शत्रू पासून नेहमी सावध राहिले पाहिजे.नाहितर या शत्रूंच्या आहारी गेला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाही.अन्न,पाणी,वस्त्र,हवा,शिक्षण आरोग्य,या मुलभूत गरजा आहेत.या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून शासनाने सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे.
आज शासकीय मदती विना विद्येची मंदिर दिवसेंदिवस उद्ध्वस्त होवून इमारत उद्ध्वस्त होताहेत.कांही इमारती खाली भावी पिढी गाडली जात आहे.शाळेच्या मंदिरात देशाची भावी पिढी घडविली जाते.पिढी घडविण्याचे काम सातत्याने गुरू (शिक्षक)करीत आहेत.देशाची भावी सर्वोत्तम घडवली तरच देशाचा सर्वांगीण विकास होत असतो.ही धुरा सांभाळण्याची खरी जबाबदारी भावी पिढी वरच अवलंबून असते.कारण तेच खरे देशाचे भावी अधारस्तंभ आहेत
दुसरीकडे मात्र प्रशस्त मंदिरांच्या डौलदार बांधकामासाठी शासकीय तिजोरीतून अमाप निधीची खिरापत वाटली जात आहे.समाजाला दैववादी बाणवून भावनिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यापेक्षा विज्ञानवादी,विवेकवादी,परिवर्तनवादी,ध्येयवादी,सक्षम नागरिक घडविण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील विद्या मंदिराला प्रथम प्राधान्य देण्याची आज विज्ञान युगात खरी गरज आहे.
आपल्या देशावर ज्या ज्या वेळी अनेक प्रकारची संकट आली किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात किंवा युध्दाच्या वेळी कोणत्याही तपस्वी नी किंवा दैवी शक्ती नी मदत केलेली नाही.याची सर्व सामान्य माणसाला कल्पना आहे.प्रसंगाच्या वेळी शास्त्रज्ञानाचा,तंत्रज्ञानांचा,इंजिनिअर चां,डॉक्टरांचा,विविध उपकरणांचा,आकाशात सोडलेल्या उपग्रहांचा टेक्नॉलॉजीचा,अग्निशामक दल,भुजल,भुदल,वायुदल सैनिकदल चा,प्रसंगी उपयोग करून घेतला जातो.शिक्षण क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील प्रगती करण्यासाठी प्रामुख्याने शासकीय तिजोरीतील निधी चा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे.तरचं आपला देश महासत्तेच्या मार्गाने वाटचाल करेल!

बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे अनेक बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य,मुलांच्या विवाहाला आर्थिक मदत तसेच कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने त्यांचे जिवन मान उंचावलेले दिसून येते.बांधकाम कामगार हे नेहमी अंत्यंत मेहनतीचं आणि कष्टाचे, जिवितहानी असी धोक्याची काम करत असतात.त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याचं पाहिजे. यांत तीळमात्र शंका नाही.
पण आजकाल या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक एजंटांनी बोगस ग्रामीण भागात अंदाजे सत्तरच्या पट्टीत बांधकाम कामगार म्हणून बोगस लाभार्थींची निवड यादी तयार करण्यात आलेल्या दिसून येतात.आणि त्यांना भांड्यांची आवश्यकता नसतानाही निव्वळ शासकीय योजनांच्या माध्यमातून शासकीय तिजोरीतून लूट करून घेण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने शासकीय नीधीची खिरापत वाटण्यात येत आहे.याची शहानिशा करून सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे.जे खरोखरच बांधकाम कामगार आहेत.त्यांनाच लाभ मिळावा ही अपेक्षा.कारण शासकीय तिजोरी मध्ये सर्व सामान्य कष्टकरी शेतकरी,कामगार,शासकीय कर्मचाऱ्यांच्या,कष्टातून कराच्या माध्यमातून निधी जमा झालेली असते.याची जाणीव झाली पाहिजे.
रेशनकार्डवर धान्य. फुकट दिले जात असल्याने.जे लोक प्रकृतीने सुदृढ आहेत.ते लोक दिवसेंदिवस कष्ट न करता आळशी बणत असल्याचे दिसून येतात.ज्यांच्याकडे शारीरिक श्रम करण्याची क्षमता आहे.ते देखील शासनाकडून फुकटचे धान्य मिळाल्याने त्यांची श्रम करण्याची मानसिकता बदलून आळशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे.पुष्कळ लोक एकत्र कुटुंब पद्धती राहायला असताना ही कागदोपत्री विभक्त दाखवून विभक्त रेशनकार्ड करून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहेत.सर्व सामान्य नागरिक या धान्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर न करता.किराणा दुकानदारांना विकत असल्याने त्या योजनांचा पुरेपूर फायदा व्यापारी दुकानदार लोक करून घेताहेत.अशीच परिस्थिती देशात वाढत गेली तर देशांची अर्थव्यवस्था बळकट न होता देशावर दिवसेंदिवस परकीय कर्जाचा बोजा वाढत जावून देशांमध्ये व्यसनाधीनता वाढत जावून सर्वत्र अहंकार माजेल.
सर्व सामान्य माणसाला आर्थिक मदत आवश्यक केली पाहिजे.पण त्यातून देशाच्या उत्पन्नात कशी वाढ होईल याचा ही विचार झाला पाहिजे.सर्व सामान्य माणसाला त्या पैशांची किंमत समजली पाहिजे.माणसाला एकदा ही सवय झाली की तो कष्ट करायला त्याच्या मनाची तयारी होत नसते.तो नेहमी आळशी प्रवृतींचा गुलाम बणत असतो.
आणि त्याला शासनकर्ते सातत्याने गुलाम करून मानसिकदृष्ट्या वांझोट्या बणवनाऱ्या योजनांमुळे मानसिकदृष्ट्या अपंग बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रयत्न दिसून येतोय.आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षे होत आली. तरी देखील शासनकर्त्याकडून आर्थिक दृष्ट्या गरिबी कमी करता आलेली नाही.तर ती सातत्याने वाढत चालेली आहे.याचं आत्मपरिक्षण करण्याची खरी गरज आहे.
शासन राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य माणसाला आणि मतदारांना अनेक क्षणिक वांझोट्या योजना जाहीर केल्या जातात. निवडणूका नंतर त्या योजनांचा प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना अनेक अडचणी ना सामोरे जावे लागत आहे.सर्वजण कष्ट न करता आळशी बणत गेले तर देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणार कशी? जे नागरिक आयुष्यभर काबाडकष्ट करून त्यांचे शारीरिक अवयव कमकुवत झालेले आहेत.त्यांची शारिरीक दृष्ट्या प्रकृती कमकुवत झाली आहे.तसेच काही अपंग,आंधळे,दिव्यांग दिर्घकाळ आजाराने त्रस्त झालेले आहेत.अशा लोकांना शासकीय तिजोरीतून दरमहा मदतीचा हात देणे काळाची गरज आहे.
शेतकऱ्यांनी ऊन,पाऊस,थंडी वादळ वारा सहन करत काळ्या आईची सेवा करुन पिकविलेल्या त्यांच्या मालाला दर ठरविण्याचा अधिकार हा शेतकऱ्यांचा असायला पाहिजे.काबाड कष्ट करून शेती टिकवायची शेतकऱ्यांनी आणि किंमत ठरवायची शासनकर्ते त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळत नाही.शेतकऱ्यांच्या मालाला उत्पन्नाशी निगडीत त्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे.योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीच्या संकटात सापडल्या मुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.आणि ती संख्या कमी होण्या ऐवजी ती दिवसेंदिवस वाढतच चालेली आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी साधनसामुग्री अवजारे लागतात.त्यांचा योग्य किंमतीमध्ये पुरवठा करणे अत्यावश्यक आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान,अमाप वाढलेल्या खतांच्या किंमती कमी करुन खत,बी बियाणे,औषध,तसेच लाईट,पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय योजनांच्या मधूनच प्रयत्न झाला पाहिजे.तरच कृषी उत्पादनात सातत्याने वाढ होऊन देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.
आपल्या देशामध्ये इतर देशांच्या तुलनेत सुशिक्षित बेकार तरुणांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. त्यांना श्रमाचे महत्त्व समजले पाहिजे.फुकटचे सर्व कांहीं मिळत गेले तर त्यांच्या आयुष्यात त्यांना श्रमाचे महत्त्व कधीचं समजणार नाही.प्रयत्नाच्या वेलीवरच नेहमी यशाची फुले उमलतात.
कष्टाशिवाय जीवनात दुसरा पर्याय नाही.याची सातत्याने जाणीव झाली पाहिजे.
कोणत्याही योजना राबविताना त्या योजनांमुळे समाजाचीही आणि देशाची ही आर्थिक परिस्थिती यशाच्या शिखरावर यशस्वी झाली पाहिजे.योजनेतून प्रगती साधता येईल अशा योजना राबविताना माणसाला वांझोट्या बणवनाऱ्या योजने पेक्षा माणसाला कायमस्वरूपी स्वावलंबी,स्वयंपूर्ण सुदृढ,सक्षम नागरिक घडविण्यासाठी योजनांचा विचार करावा लागेल तरच आपला देश प्रगतीच्या शिखरावर यशस्वी होवून सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल.जी वस्तू स्थिती दिसून येते ती मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.
देशमुख पी.आर.
9921111955

