
विशेष प्रतिनिधी पैठण – जेव्हा बालक राहुलने आपला पिता भगवान बुद्धांकडे वारसा मागितला तेव्हा बुद्धांनी राहुलला वारश्यात कपिलवस्तुच राज्य न देता, कोणतीही संपत्ती न देता धम्माचा वारसा दिला,तद्वत सम्राट अशोकाने सुद्धा आपली मुलगी संघमित्रा आणि पुत्र महेंद्र यांना वारश्यात आपले अफाट साम्राज्य न देता धम्माचा वारसा दिला.आदी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि जो अंतीही कल्याणकारी आहे असा वारसा त्यांना देण्यात आला श्रमण संस्कृती चा वारसा अर्थात धम्माचा वारसा आपन ही आपल्या मुलांना द्यावा. त्याला सदाचारी निर्भय निर्व्यसनी नितिमान आदर्शयुक्त मानुस बनविण्यासाठी आपन धम्माचा वारसा द्यावा. त्याला 10 दिवस श्रामनेर बनवावे त्यासाठीच बुद्ध जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे ह्याची वर्षी 2 मे ते 12 मे 2024 पर्यन्त जेतवन धम्म संस्कार प्रशिक्षण केंद्र तेलवाडी,पैठण जिल्हा संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आले आहे.१० दिवस श्रामनेर शिबिरात श्रामनेर दिक्षा देऊन श्रमन संस्कृती,जपण्यासाठी आणी प्रबुद्ध माणूस,प्रबुद्ध समाज आणि प्रबुद्ध भारत बनविण्यासाठी ह्या शिबिर मध्ये सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे असे पूज्य भन्ते शाक्यपुत्र राहुल यांनी केले आहे.अधिक माहिती करिता भन्ते शाक्यपुत्र राहुल 9834050603 यांच्याशी संपर्क साधावा.
