स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत ओबीसींचे गुरु कोण?

बातमी शेअर करा.

लोकसभा विधानसभेत देशातील ५२ टक्के ओबीसींचे पानिपत झाले.आता उरल्या सुटल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बाकी आहेत.या निवडणुकांत आपले अस्तित्व ओबीसी राखतील का? यात ते हरले तर त्यांची घरे गावठाणे रोजी,रोटी धोक्यात आहे.पानिपतची लढाई आम्ही देशासाठी लढलो.असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिमानाने सांगत आहेत.पेशवाई बद्दल महात्मा जोतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सारे सांगतात.शूद्र ओबीसींना गुलाम करणारी,मनुस्मृती नुसार विषमतावादी असलेली,ही अत्यंत क्रूर शोषक शासन व्यवस्था स्त्रीशुद्राती शूद्रांच्या विरोधी होती.भारतीय संविधानाच्या माध्यमातून धार्मिक विषमतेच्या विरोधात सुरू असलेली लढाई आज आम्ही हरलो आहोत.पुन्हा पेशवाई महाराष्ट्रात सुरू आहे.महाराष्ट्रात घडणाऱ्या सामाजिक आर्थिक राजकीय. शोषणाच्या सर्व घटना आम्हा ओबीसी विरोधात आहेत.त्यांचा उल्लेख किती करायचा?आमचे अनेक लोक आज हिंदुत्वाच्या फडणवीस,पवार, शिंदे गटात आनंदाने जगत आहेत.मग गुलामी आहे कुठे ? असा प्रश्न सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांना पडत असेल.

   वर्तमान काळात ओबीसी शिक्षण,आरक्षण,घरे गावठाणे उद्योग,व्यवसाय,धोक्यात आहेत.हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे.ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या अन्याय अत्याचारा बद्दल मी अधिक बोलावे,असे मला वाटत नाही.ओबीसी जागृतीचे अनेक प्रबोधनकार आपल्याकडे झाले आहेत.तरीही ओबीसींची मानसिक गुलामी हीच त्यांच्या शोषणास खरे कारण आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रथम परकियाना हटवावे की देशातील हिंदू ब्राह्मणी धर्माने लादलेल्या विषमते विरोधात लढावे? असा वाद तत्कालीन नेतृत्वात होता.

  ओबीसी जातींनी आज जी काही प्रगती साधली आहे ती भारतीय संविधानाच्या माध्यमातून,समतेच्या तत्वाने मिळविलेले यश आहे.या यशाला हिंदू धर्मगुरु पुरोहित,बुवा बापू,ज्योतिषी,पवार फडणवीस शिंदे या सत्ताधारी राजकीय गुरूंचे यश आहे?.असे आमच्यातील ओबीसी कार्यकर्त्यांचे म्हणणे असू शकते?. निवडणुकांचा फॉर्म काळजी पूर्वक भरण्या ऐवजी ग्रह तारे ज्योतिष,तथाकथित गुरु,गंडे दोरे,भस्म यावर त्याचा अधिक भर असतो.मुहूर्त पाहिले जातात तरीही पराभव होतो.म्हणून या धार्मिक कार्ये,पूजा,पुजारी नवस याविरोधात कुणाचीही तक्रार नसते.समुद्रात बुडालेली नौका सत्य नारायण पूजेने वर येते?.कालच रायगड उरणच्या परिसरात आगरी कोळ्यांच्या दोन मासेमारी नौका आणि खलाशी बुडाले.बुडालेल्या नौका आणि गेलेले जीव पुन्हा कुणी देव,गुरू,पूजा नवस आणून देऊ शकतो का?

   लोकसभा विधानसभेत साऱ्या प्रमुख उच्चजातीच्या पक्षांनी ओबीसींना प्रथम तिकिटे नाकारली.जे सर्व संघर्ष करून लढले. त्यांच्या पराभवाची सर्व मानवनिर्मित व्यवस्था काळजी पूर्वक करूनच निवडणुका जिंकल्या गेल्या.यात नोटबंदी ही आर्थिक नाकेबंदी होती.निवडणूक आयोग,पोलिस,ईडी,यांचा उपयोग म्हणजे आधुनिक मनुस्मृतीचे भ्रष्ट रूप होते. आम्ही भ्रष्टाचारा विरोधी आहोत.असे सांगून त्याचे जागतिक विक्रम सत्ताधारी लोकांनी केले.या साऱ्या प्रकारात ओबीसी निवडून येणार कसे?.राजकीय जीवनात ओबीसींना यशस्वी व्हायचे असेल?.तर सामाजिक आर्थिक समतेची लढाई अगोदर लढावी लागेल.हे आमचे नेते संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सागून गेले.

याच मार्गाने रायगड कोकणात कुळ कायद्यासाठी नारायण नागू पाटील लढले.सेझ विरोधी ॲड.दत्ता पाटील लढले. सिडको विरोधात लोकनेते दि.बा.पाटील साहेब लढले.या मार्गावर तुमच्यासह अनेक कार्यकर्ते लढत आहेत.आज स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये निवडणुका लढण्यासाठी पैसे ओबीसी उमेदवारांकडे नाहीत.या स्थितीस स्वातंत्र्य पूर्व काळातील पेशवाई मनुस्मृतीच्या धार्मिक विषमतेची उपमा योग्य होईल.शूद्रांच्या वाईट स्थितीस त्यांच्या पूर्व जन्मातील पाप कारणीभूत आहे.असे उत्तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य देतात.अर्थात या सर्व खोट्या गोष्टींची धर्म चिकित्सा बुद्ध,चार्वाक, महावीर आणि फुले शाहू आंबेडकर यांनी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण आपल्या संविधानाने दिले आहे.ही गोष्ट हिंदू धर्म प्रमुखांना मान्य नाहीच.म्हणूनच महानगर पालिकेत निवडणूकच होऊ नये? याची काळजी घेतली गेली.महानगर पालिकेत निवडून आलेले नगरसेवक नसताना, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रचंड लूट,नगरविकास खाते करते.याबद्दल साऱ्या महाराष्ट्रात वनमंत्री गणेश नाईक हे आगरी ओबीसी राजकीय नेते प्रचंड आक्रोश करत आहेत.तरीही महाराष्ट्रातील अनेक ओबीसी नगरसेवकांना हा राजकीय नेतृत्वाचा हक्क नाकारणारा,एकलव्यासारखा अंगठा कापण्याचा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य राजगुरूंचा निर्णय समजलेला नाही. 

आम्हाला राजकीय सत्ता नाकारली म्हणजेच आम्ही शूद्र ठरलो.सरकारी नोकऱ्या, शिक्षण,जमिनी पाणी,जंगल मानवी अधिकार,धार्मिक हक्क या सर्व बाबतीत घडले.यासाठी देव,धर्म,धर्मग्रंथ,आडवे आले.ते अनेक शूद्र अतिशूद्र लोकांनी नाकारले.यातील मनुस्मृती विरोधी लोक हेच आमचे खरे गुरू आहेत.त्यांनी केलेला धार्मिक,आर्थिक,राजकीय संघर्ष,हा आमच्या राजकीय संघर्षाचा आधार आहे.तत्वज्ञान आहे.हा विषय समजून न घेतल्यास ओबीसी नगर सेवकांची राजकीय गुलामी निश्चित आहे.

जय ओबीसी.जय दिबा. जय एकवीरा.

राजाराम पाटील.८२८६०३१४६३.उरण ,जिल्हा रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *