
विशेष प्रतिनिधी मुंबई- आज दि.18/12/25 रोजी शासनाच्या वतीने अल्पसंख्याक हक्क अधिकार दिवस साजरा करण्यात आला.यावेळी बुद्धिस्ट मायनॉरीटी मिशनचे प्रतिनिधी मा.राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी मा. संजयकुमार शिंदे यांना भेटून बौद्ध अल्पसंख्याक यांच्या विकासासाठी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
1)- बौद्ध अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे.
2)- बौद्ध समाजातील अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांचा स्तर सुधारण्यासाठी योग्य अशा उपाययोजना, उपक्रम राबवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा.
3)- युवक व महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व्यापार व उद्योग सुरू करता यावेत यासाठी या महामंडळातून अर्थ पुरवठा करता यावा, यासाठी विविध योजना तयार करून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा.
4)- बौद्ध समाजातील कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी सवलती पुरवण्यासाठी अनुदानात रुपये 30 लाखापर्यंत वाढ करण्यात यावी.
5)- बौद्ध भिक्खुंना राज्यात रेल्वे व बस प्रवास करण्यासाठी मोफत प्रवास योजना राबवण्यात यावी. तसेच त्यांना खाजगी रुग्णालयात गंभीर आजारामुळे दाखल केल्यास तेथील झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी तरतूद करण्यात यावी.
6)- बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांना प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने योजना तयार करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
बुद्धिस्ट मायनॉरीटी मिशनच्या माध्यमातून वरील मागण्या करण्यात आल्या.यावेळी बुद्धिस्ट मायनॉरीटी मिशनचे प्रतिनिधी मा.रमेश धिवारे,मा.दामोदर गायकवाड, रतन बनसोडे,अँड.अरियं बौद्ध,योजनताई लोखंडे,जयंत म्हस्के उपस्थित होते.

